About

Monday 18 January 2016

जिजाऊची लेक प्रीटी झिंटा

साधारण 2001-03 च्या आसपास बॉलीवुडशी सबंधित एक खटला खुप गाजला होता.

बॉलीवुड आणि अंडरवर्ल्ड चे लागेबांधे सर्वांनाच ठाऊक होते पण यावर भाष्य करण्याची कोणाची हिंमत नव्हती. कारवाई तर दूरची बात.

अशात बॉलीवुड मधला एक मोठा फायनांसर भरत शाह पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याची कुंडली बाहेर येत गेली. जाळ फैलावत गेल. चोरी चोरी चुपके चुपके या सिनेमाचा निर्माता नसीम रिजवी हा छोटा शकीलचा हस्तक असल्याचे सिद्ध झाले. त्याने या सिनेमासाठी छोटा शकीलचा काळा पैसा वापरल्याचे सिद्ध झाले.

या खटल्यात बॉलीवुड मधील नामचीन अश्या  13 व्यक्तींनी साक्षी दिल्या होत्या.
त्यात सलमान ख़ान, शाहरुख़ ख़ान, राकेश रोशन, महेश मांजरेकर, अली मोरानी , संजय गुप्ता आदींचा समावेश होता.

यातील सर्व च्या सर्व जणांनी आपली साक्ष कोर्टात फिरवली आणि ते होस्टाइल झाले. हेच हीरो पडद्यावर शुर वीर नायक रंगवतात. 50 -50 जणांची एकट्याने धुलाई करतात. व्हिलन चे प्रचंड साम्राज्य एकहाती लढा देऊन संपवतात.

पण अंडरवर्ल्डच्या धमक्यांनी त्यांचे सगळे शौर्य बाहेर निघाले.

आणि त्यावेळी अख्ख्या बॉलीवुड मधून एकच रणरागिणी आपल्या साक्षीवर अटळ अडिग ठाम राहिली .

ती म्हणजे प्रीटी झिंटा.

तिने शेवटपर्यन्त सर्व दबाब झुगारुन देत, सगळ्या डॉन लोकांच्या धमक्या फाट्यावर मारत आपली साक्ष बदलली नाही.

तेव्हा मी कॉलेजला होतो. प्रीटीचा आधीच चाहता होतो. या गोष्टीमुळे तर प्रिटिने मनात घर केले.
कालांतराने प्रिटिच्या कुटुंबाचा इतिहास समजला. आणि तिच्या या शौर्याचे आणि मोडेन पण वाकणार नाही बाण्याचे रहस्य देखील समजले.
..
सन 1761 रोजी  झालेल्या पानीपतच्या महासंग्रामानंतर अनेक मराठा कुटुंबे पानीपतच्या परिसरातच स्थायिक झाली.  पानिपत, कुरुक्षेत्र, कर्नाल, जिंद या निवडक जिल्ह्यांत ती राहतात. अनेक पिढ्या उलटल्या तरी आपण मूळचे मराठी आहोत, याचे त्यांना कधीही विस्मरण झाले नाही. त्यांची आडनावेही भोसले, चोपडे, झाकले, चौधरी, राणे, इंगोले अशी आहेत. कोल्हापूरचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. वसंतराव मोरे यांच्या निरीक्षणानुसार, त्यांची संख्या तब्बल सात लाख आहे.

तर प्रिती झिंटा ही मराठा वीरांगणा..
मुळ आडनाव झांटे रत्नागिरी जिल्ह्यातील..
..
 शौर्य हा मराठ्यांचा जेनेटिक गुणधर्म आहे हे सिद्ध करणारा प्रीटी झिंटा हा मोठा पुरावा.
पानीपतच्या शौर्यदिनाची आठवण होताना यापुढे या जिजाऊच्या तेजस्वी लेकीची प्रीटीचीही आठवण अवश्य ठेवावी.
©सुहास भुसे.


No comments:

Post a Comment