About

Tuesday 16 October 2012

चार्वाक दर्शन : कर्मकांड आणि धार्मिक शोषणावर करडा प्रहार

साधारणत: इसवी सनाच्या सहाव्या शतकापर्यंत भारतीय धर्म परंपरा अतिशय उदार राहिलेली आहे. अनेक धार्मिक विचारधारा अतिशय प्राचीन काळापासून इथे उदयास आल्या, विकसित झाल्या . काही काही कालखंडात तर एकाच वेळी भिन्न भिन्न परंपरा आणि धर्म इथे एकाच वेळी नांदत असलेले दिसून येतात. या वैचारिक परंपरा एकमेकांच्या विचारांचे खंडणमंडन करीत असलेल्या दिसतात. यातील बहुधा सर्व वैचारिक आणि धार्मिक परंपरांचे अनेक ग्रंथ आणि वाङमय उपलब्ध आहे. वेदांहून वेगळा विचार करणारी अनेक दर्शन शास्त्रे आहेत. त्यांची विचारधारा स्पष्ट करणारे देखील अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. सामान्यत: आपली धार्मिक परंपरा उदार राहिलेली आहे. एका धर्माने दुस-या धर्माचे किंवा एका विचारपरंपरेने दुस-या विचारपरंपरेचे ग्रंथ वाङमय जाळून नष्ट केल्याचा रानटी प्रकार आपल्याकडे किमान इ स ६ व्या शतकापर्यंत तरी दिसून येत नाही.


याला अपवाद एकमात्र विचारधारेचा, लोकायत दर्शन किंवा चार्वाक दर्शन.

चार्वाक दर्शन जे लोकायत दर्शन म्हणूनही ओळखले जाते त्याचा एकही ग्रंथ आज उपलब्ध नाही. अभ्यासूंना चार्वाक दर्शन शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी उपनिषदादी ग्रंथात त्याच्यावर केलेल्या टीकेवर विसंबून त्याचा अभ्यास करावा लागतो. चार्वाक दर्शनाचा एकही ग्रंथ उपलब्ध नसण्याचे गौडबंगाल काय असावे बुवा? सर्वसमावेशक अश्या उदार भारतीय धार्मिक परंपरेला चार्वाक दर्शनाचे ग्रंथ नष्ट करण्याची काय गरज भासली असावी? हे कोणाचे कारस्थान असावे ? या प्रश्नांच्या संभाव्य उत्तरांचा आणि चार्वाक दर्शनाच्या विचारधारेचा वेध घेऊ या नव्या लेखमालेतून.



             



चार्वाक मुनी हे सामान्यत: नास्तिक आणि भोगवादी विचारधारेचे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांची ही ओळख विकृत आहे आणि वैदिक धर्ममार्तंड महाब्राह्मणांनी  हेतुपुरस्पर निर्माण केलेली आहे. त्यांचे तत्वज्ञान त्याहून कितीतरी व्यापक आणि बहुधा वेदांहूनही प्राचीन आणि पुरातन आहे. तसे पाहू जाता इतर सर्व दर्शनशास्त्रांमध्ये जन्म-बंधन-मोक्ष यांचे महत्व तर आहे पण ईश्वर किंवा देव या संकल्पनेचे निर्णायक महत्व नाही. जसे आपणास मुस्लीम किंवा ख्रिश्चन धर्मात दिसते. सांख्य दर्शन तर देवाचे अस्तित्वच अमान्य करते तथापि त्यांना नास्तिक म्हटले गेलेले नाही. सांख्य ,न्याय ,वैशेषिक ,मीमांसा ,वेदांत ,शीख ,नाथपंथी ,या आणि भारतीय परंपरेतील एकूण एक विचारधारा या आस्तिक सदरात मोडतात. मग स्वत:ला भारतीय परंपरेचे उत्तराधिकारी म्हणवून घेणा-यांनी चार्वाक दर्शन शास्त्राला नास्तिक का म्हटले असावे? याचे एक प्रमुख कारण म्हणजे चार्वाकांनी केलेली वेदांची निंदा. इतर कोणत्याही विचारधारेने वेदांची निंदा केलेली नाही.

नास्तिको वेदनिन्दक:’ 

अर्थात जो वेदांची निंदा करतो तो नास्तिक. आणि चार्वकांनी तर वेदांना धूर्त आणि लबाड लोकांचे षडयंत्र म्हटले, राक्षसांची व्यर्थ बडबड देखील म्हटले. अब्राह्मण अब्राह्मण !! हे तर मोठेच महापाप झाले कि राव मग ! यामुळेच चार्वाकांना नास्तिक ठरवले गेले. वस्तुत: भारतीय तत्वज्ञानाचा कोणताच ग्रंथ निर्भेळ राहिला आहे यावर माझा विश्वास नाही. वेद म्हणजे ज्ञानाचा धबधबता प्रवाह. निसर्गातील विविध चमत्कारांना देवतास्वरूप मानून त्यांच्यावर रचलेल्या पवित्र ,उत्फुल्ल ऋचांचे संकलन आहे. वेद म्हणजे त्याकाळच्या वैदिक समाजाचा आरसा आहेत. तथापि वेदांचे निर्भेळ आणि शुद्ध स्वरूप कालौघात तसेच टिकून राहिले असेल याची अजिबात शाश्वती नाही. अनेक स्वार्थी आणि लबाड लोकांनी देव आणि धर्म यांच्या नावावर लोकांचे शोषण करण्यासाठी त्यात भेसळ केली आहे. आणि चार्वाक तर समाजातील धर्माच्या नावावर आपली पोळी भाजून घेणा-यांचे कट्टर दुश्मन. त्यांच्या तोंडी हे श्लोक धर्माच्या ठेकेदारांनी घुसडले असण्याची दाट शक्यता आहे. हे धर्म मार्तंड स्वत:च्या पोटाची खळगी भरण्यासाठी आणि समाजातील आपले उच्च स्थान अबाधित राहावे यासाठी नीच पातळीवर जाऊन इतिहास-पुराणांची मोडतोड कशी करत असत याचे अनेक दाखले आणि पुरावे आता हाती लागत आहेत. चार्वाकांच्या एका श्लोकाचे उदाहरण धर्माच्या दलालांच्या हरामखोरीचे उदाहरण म्हणून पुढे देत आहे.


चार्वाकांचा हा श्लोक अतिशय सुप्रसिद्ध आहे. किंवा कुप्रसिद्ध आहे म्हटले तरी चालेल. याच श्लोकाचा आधार घेऊन त्यांना भोगवादी ठरवण्यात आले. खर तर इतके तर्कशुद्ध आणि जीवनाचे यथार्थ नीतीमान तत्वज्ञान रचणारा विद्वान असे बेजबाबदार विधान करेल हेच मुळात शंकास्पद आणि हास्यास्पद आहे. पण कुटील ब्राह्मणांनी त्या श्लोकाची मोडतोड करून चार्वाकांना कसे बदनाम केले आहे पहा.

तो श्लोक ज्या रुपात प्रसिद्ध आहे तो असा-

यावज्जीवेत्  सुखंजीवेत् ऋणंकृत्वा घृतंपिवेत्।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुत:।

याचा अर्थ असा कि जोवर जीवन आहे तोवर सुखात जगा. खा ,प्या ,ऐश करा. ऋण काढून तूप प्या. ऋण परत फेडण्याची चिंता करू नका. मानवी शरीर नश्वर आहे. एकदा मेल्यानंतर पुन्हा इथे येणे कोठले?

याच श्लोकाच्या आधारे चार्वाकांचे जडवादी तत्वज्ञान भोगवादी आणि चंगळवादी ठरवण्यात आले. चार्वकांनी वस्तुत: नीतीमान समाजव्यवस्था कशी असावी याविषयी आपल्या तत्वज्ञानात खूप उहापोह केला आहे. असले समाजात अनीती पसरवणारे विधान असला महान तार्किक विचारवंत करू शकेल का? नवव्या शतकात होऊन गेलेल्या जयंत भट्ट या चार्वाक परंपरेतील महान चार्वाकाच्या ग्रंथात हा मूळ श्लोक पुढील प्रमाणे येतो.


यावत् जीवेत् सुखम् जीवेत्, नास्ति मृत्युः अगोचरः,
भस्मिभूतस्य देहस्य पुनरागमनम् कृतः 


यातील ‘नास्ति मृत्यू: अगोचर’ हा चरण गाळून तिथे ‘ऋणकुत्वा घृतपिवेत’ या ओळी घुसडून हा श्लोक आणि त्यामागचा विचार विकृत स्वरुपात लोकांपुढे आणण्यात आला. आणि याचा परिणाम म्हणजे आता चार्वाक म्हटल कि त्यांचा हा भेसळयुक्त श्लोक लोकांना लगेच आठवतो. अशी किती पौराणिक गोष्टींची मोडतोड करून हिंदू धर्माचे किती अपरिमित नुकसान हिंदू धर्माला स्वत:ची जहागीर समजणा-यांनी केले असेल याची आपणास उपरोक्त उदाहरणावरून कल्पना येऊ शकेल.


     हे वैदिक लोक चार्वाकांना इतके का घाबरत होते? अस काय तत्वज्ञान होत चार्वाकांच? 

     चार्वाक हे प्रत्यक्षाला प्रमाण मानणारे विचारवंत होते. प्रत्याक्षावरून काढले जाणारे अनुमान देखील त्यांनी प्रमाण मानले होते. त्यांनी महत्वाची मानलेली ही दोन प्रमाणे तर आजच्या प्रगत विज्ञानाची दोन महत्वाची प्रमाणे आहेत. प्रत्यक्ष आणि प्रमाण या दृष्टीने चार्वाक हे पहिले वैज्ञानिक विचारांचे तत्वज्ञ ठरतात. (तथापि नेहमी महापुरुषांची कुत्सित चेष्टा करण्याची पुरातन सवय असणा-यांनी चार्वाक समोर असेल तर त्याची बायको सधवा आणि तो डोळ्याआड झाला कि विधवा ,अशी बोचरी टीका त्याच्यावर केली.)


चार्वाकांची विचारसरणी संक्षेपात पुढील प्रमाणे –

१)     जे प्रत्यक्ष आहे तेच प्रमाण.
२)   आत्मा आणि देह वेगळे नाहीत अर्थात देह संपला कि आत्मा संपला. देहातील चैतन्य म्हणजेच आत्मा. ( A body with soul is consciousness)
३)   मृत्यू म्हणजेच मोक्ष. ( Death is a salvation )
४)   न स्वर्ग आहे, न नरक आहे ,न अंतिम मोक्ष ,न शरीपासून वेगळा आत्मा, न चार आश्रमी व्यवस्थेचे कोणते कर्म फळ मिळते.

त्यांच्या विज्ञाननिष्ठ विचारसरणी विषयी अधिक विस्तृत पणे जाणून घेऊया पुढील लेखात.

                             -सुहास भुसे
                             (रोखठोक साठी)

36 comments:

  1. चरवाक मुनी एक रहस्य आहे..अधिक माहिती मिळाल्यास आवश्य पोस्ट करा

    ReplyDelete
  2. Nakkich
    aaj ratrich dusra lekh post krto.

    ReplyDelete
  3. चार्वाकच काय , तर आज अनेक ग्रंथ इस्लामी आणि इतर आक्रमकांमुळे सध्या उपलबध नाहीयेत. अनेक ऋषी-मुनिंनी व अभ्यासकांनी आपले आयुष्य खर्ची करुन तयार केले ग्रंथ यामध्ये नष्ठ झाले .. हे एक कारण असु शकेल, किंवा तत्कालीन सनातनवादी लोकांनी नष्ट केले असावेत. दोन्हिंपैकी दुसरे कारण जास्त जवळचे वाटते.

    ReplyDelete
    Replies
    1. सुरज महाजन जी
      आपण म्हणता ती इस्लामी आक्रमणाची देखील शक्यता नाकारता येत नाही .
      पण आपल्या सर्व धार्मिक परंपरांचे किमान काही ग्रंथ तरी मिळतात पण चार्वाकांचा एकही नाही .
      ही विचार करण्याची बाब आहे .
      सनातन वाद्यांची शक्यता जास्त तार्किक वाटते .
      या गोष्टी इस्लामचा उदय होण्यापूर्वीच्या आणि त्याचे हिंदुस्थानवर आक्रमण होण्यापूर्वीच्या आहेत. चार्वाकांचे विचार जर असे दाबले गेले नसते तर इस्लामचे आक्रमण आपण तेव्हाच थोपवले असते.

      Delete
    2. This comment has been removed by the author.

      Delete
    3. मला देखील हे मत योग्य वाटते.👌👌

      Delete
  4. छान लेख. पुढील लेखाची प्रतीक्षा.

    ReplyDelete
    Replies
    1. उदय काशीकर सर
      धन्यवाद ..!!
      पुढील लेख लवकरच टाकेन .
      या मालेत किमान चार लेख लिहिण्याचा मनोदय आहे .
      आपण अवश्य भेट द्या व चार्वाक दर्शन समजून घ्या .

      Delete
    2. होय सर आपले खूप आभार💐

      Delete
  5. याअज्ञाश्रध्धानाश ् साव्शायात्मा विनाशिती II नाय लोकस्ती न परो न सुख
    संश्यात्न्मान II ४० II
    अर्थ : अज्ञानी श्रद्धाहीन
    व्यक्ती शास्त्रांवर शक करते त्याला भूलोक
    आणि परलोक शांती मिळत नाही
    तात्पर्य :अनेक प्रमाणित आणि आदर्श शास्त्रापैकी भगवद गीता हि सर्वोत्तम
    आहे..पशुवत मनुष्यांना प्रमाणित शास्त्रांवर
    विश्वास नसतो आणि त्याचे ज्ञान
    हि नसते
    आणि त्यांच्यापैकी काही लोकांना जरी शास्त्राचे
    ज्ञान असले किवा शत्रामधील संदर्भ देता येत असले
    तरी त्याची वास्तविकपणे स्तरांवर
    श्रद्धा नसते .अशा मनुष्यांना कृष्णाभावनेचे
    काहीच ज्ञान नसल्यामुळे त्यांचे पतन
    होते ..वर सांगितलेल्या सर्व मनुष्यापैकी जे
    श्रद्धाहीन आणि संवषयी , ते मुळीच प्रगती करू शकत नाहीत भगवानतांवर
    आणि भगवंतांच्या शब्द्ज्ञानावर
    श्रद्धा नसलेल्या व्यक्तीचे या इहलोकात
    किवा परलोकातही कल्याण होत
    नाही.त्यांना कोणत्याच
    प्रकरची सुखप्राप्ती होत नाही दुसर्या शब्दात सांगावयाचे
    तर संशयखोर मनुष्यांना अध्यात्मिक
    उधराच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे स्थान
    नाही

    ReplyDelete
  6. महोदय अनामिक ,
    आपण दाखला दिला आहे कि ,
    [ वर सांगितलेल्या सर्व मनुष्यापैकी जे श्रद्धाहीन आणि संवषयी , ते मुळीच प्रगती करू शकत नाहीत भगवानतांवर आणि भगवंतांच्या शब्द्ज्ञानावर श्रद्धा नसलेल्या व्यक्तीचे या इहलोकात किवा परलोकातही कल्याण होत नाही.]
    .
    आपल्या म्हणण्याप्रमाणे चार्वाक अश्रद्ध नाहीत .
    श्रद्धा कशावर हा वेगळा प्रश्न आहे .
    चार्वाकांची उच्च जीवन मूल्यांवर श्रद्धा आहे . देव या कल्पनेला त्यांचा विरोध ध्वनयार्थाने आहे . मुळात तो देव आणि धर्म यांच्या नावावर सामान्य लोकांचे जे शोषण केले जाते त्याला केलेला विरोध आहे .
    आपण कृपया १० व्या शतकातील मानसिकतेने या तत्वज्ञानाकडे पाहू नये .
    जरा मुक्त दृष्टीने विचार करून पाहा . चार्वाक समजणे फारसे कठीण नाही . ते लोकायत म्हणजे सर्वसामान्य लोकांचे जीवनाभिमुख तत्वज्ञान आहे .
    ..
    आता राहिला प्रश्न परलोकातील कल्याणाचा ...
    आधी इह लोकातील जीवन तर जगा मनापासून ....परलोकाचे पाहू मग ...
    .
    जमल्यास एका प्रश्नाचे उत्तर द्या ..
    .
    परलोकात कल्याण कोणाचे होते ?
    .
    एक मनुष्य जो समाजात उच्च नीतिमूल्ये पाळून समाजाभिमुख जीवन जगला .
    त्याने हयात भर कोणाला त्रास दिला नाही .
    समाजाला जमेल तशी मदतच केली .
    मात्र त्याने आयुष्यात कोणतेही कर्मकांड केले नाही .
    कोणतेही व्रत केले नाही ...कधी सत्यनारायण घातला नाही ...कधी कोणा पुरोहितला दक्षिणा दिली नाही. कधीही मुक्ती वा मोक्ष यांचा विचार करून जीवनातील सुखांकडे पाठ फिरवली नाही .
    .
    तर त्याचे परलोकात कल्याण होईल का ?
    उत्तराच्या प्रतीक्षेत ...

    ReplyDelete
  7. सुहास राव लेख वाचला...लेख उपलब्ध असलेल्या ग्रंथ मालेतील सर्व ग्रंथांच्या निर्भिळतेबद्दल पुन्हा एकदा विचार करण्यास भाग पाडतो..
    हि शक्यता नाकारता येत नाही कि ग्रंथ बाळगणार्यांनी त्या त्या काळात स्वार्थासाठी त्यात बदल केले असतील.. एखादा चांगला व्यक्ती असेल तर त्याने बदल समाजहितासाठी केला असेल आणि जर समाजकंटक असेल तर स्वार्थासाठी केला असेल..
    आपल्या लेखातून चार्वाकांचे जे प्रतिबिंब दिसले ते अतिशय प्रभावित करणारे आहे.. कारण ज्या कालखंडात चार्वाक हे होते तो पूर्णपणे धार्मिक कालखंड म्हणता येईल.. आणि त्या कालखंडात कुणी वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करणे म्हणजे एक अविश्वसनीय बाबच म्हणावी लागेल किंवा चमत्कारिक बाब,...
    चार्वाकांची विचारसरणी हि एका ठराविक कालखंडाला अनुसरून नसून ती मानवसृष्टीच्या शेवटपर्यंत समान राहील अशी आहे.
    धर्म अनुयायांनी चार्वाकांना दोषी ठरवणे साहजिक बाब आहे कारण जर एकदा आपल्या स्वार्थाच्या आड येत असेल तर तो दोषी हे समीकरणच आहे..
    चार्वाक दर्शन हे स्वार्थासाठी नष्ट केले यात काहीच शंका नाही कारण जर चार्वाक दर्शन आज आपल्यात असते तर त्याचा एक वेगळा समूह निर्माण झाला असता व त्याने धार्मिकतेच्या नावावर खेळ चालवणार्यांना आव्हान दिले असते..
    सुरज महाजन यांनी सांगितल्या प्रमाणे इस्लामी आणि इतर आक्रमकांमुळे देखील ग्रंथ नष्ट झाले असू शकतात. परंतु पहिली शक्यता सुद्धा नाकारता येणे शक्य नाही....
    दिवसेंदिवस आपण विज्ञाननिष्ठ होत आहोत,, सर्वसामान्यांना धार्मिक खेळ आणि वास्तविकता यातील फरक कळायला लागला आहे.. न कळतपणे "चार्वाक दर्शन" धार्मिक अनुयायांच्या कुटील खेळामुळे पुन्हा सर्वांसमोर येत आहे.. पण वस्तुरूपी नाही तर वैचारिक रूपाने...
    इतिहासात गाडली गेलेली अशी कधीच उघडकीस न येणारी बाब आपण आमच्या समोर ठेवलीत या साठी "मंडळ आभारी आहे" लेख खरच पुन्हा विचार करायला लावणारा आहे..
    सुहास भाऊ आपल्या पुढच्या लेखाची आवर्जून वाट पाहत आहे...

    ReplyDelete
    Replies
    1. अत्यंत संयंत आणि समतोल प्रतिक्रियेबद्दल आभार अनिलराव.
      नक्कीच
      चार्वाक मत हे सार्वकालिक आहे .
      त्याच इह वादी असण, जडवादी असण कोणत्याही विज्ञाननिष्ठ समाजात त्याला श्रेष्ठत्व प्राप्त करून देत राहील यात शंकाच नको .
      तथापि समाजावर धर्माचा फार मोठा पगडा असतो .
      त्यामुळेच आज २१ व्या शतकात देखील लोक चार्वाक मताचे उच्चारण करण्यास धजत नाहीत .
      चार्वाक मत समजून घेणे ही आपल्या समाजाची सर्वात मोठी गरज आहे असे माझे मत आहे .
      यासाठीच हा लेखन प्रपंच.
      ..
      पुढील लेख पोस्ट केला आहे .
      चार्वाक दर्शनावर अधिक प्रकाश टाकणारा ..

      Delete
  8. तरी सुद्धा ग्रंथांचे महत्व नाकारता येत नाही, ग्रंथ हि एक नियमावली आहे असे माझे वैयक्तिक मत आहे..जेणेकरून मानवाला काही मर्यादा घालून दिल्या आहेत. ज्या एका विशिष्ट चौकटीत त्याला बांधून ठेवतात. व सामाजिकतेचे ज्ञान देतात.. त्यात बदल केले असतील तर हि अतिशय निंदनीय बाब आहे.. ग्रंथात जरी स्वार्थासाठी बदल केले असले तरी मानव आज वैज्ञानिक तसेच धार्मिक यांचा मेळ घालून योग्य तो निर्णय घेण्यास समर्थ झालेला आहे..

    ReplyDelete
    Replies
    1. रंथांविषयीचे आपले मत अत्यंत योग्य आणि रास्त आहे अनिलराव .
      अगदी शब्दश: मान्य .
      आपले प्राचीन ग्रंथ ( अपवाद वगळता ) म्हणजे ज्ञानाचे अखंड प्रपात आहेत .
      त्यातली भेसळ सोडली तर त्यांचे शुद्ध रूप नक्कीच काळाच्या शेवटच्या टोकापर्यंत समाजाला ज्ञान प्रकाश देत राहील .
      ..
      [ ग्रंथात जरी स्वार्थासाठी बदल केले असले तरी मानव आज वैज्ञानिक तसेच धार्मिक यांचा मेळ घालून योग्य तो निर्णय घेण्यास समर्थ झालेला आहे.]
      ..
      अगदी बरोबर .
      हा या काळाचाच महिमा आहे कि या ब्लॉग वर आपण इतकी परखड धर्मचर्चा करत आहोत .
      जुन्या काळात आपणा दोघांना एखाद्या रामेश्वर भटाने वा मंबाजी गोसाव्याने ठोकून काढले असते कदाचित . किंवा गायब देखील केले असते ...आणि आपण दोघे देवाच्या विमानात बसून वैकुठाला गेलो अशी पुडी सोडून दिली असती ..असो
      .
      आज लोकांना भ्रामक कल्पनांत गुरफटवून टाकणे समाज आणि राष्ट्र यांच्या हिताला बाधक आहे .
      धार्मिक सुधारणांची गरज आहे .
      आणि त्या वेळोवेळी करत राहिल्याने हिंदू धर्म आजही काळाच्या कसोटीवर टिकून आहे.
      आधुनिक विज्ञान युगात चार्वाक मताचा सन्मान आणि आदर केल्याने हिंदू धर्म आपल्या श्रेष्ठ्त्वाने असाच दिगंता पर्यंत झळाळत राहील.

      Delete
    2. छान प्रतिक्रिया 👌👌

      Delete
  9. छान लेख. पुढील लेखाची प्रतीक्षा.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अभिराम जी
      एक दोन दिवसांत पुढील लेख पोस्ट करतो .

      Delete
  10. धन्यवाद अविनाश जी

    ReplyDelete
  11. हा आणि इतर सगळेच लेख छान आहेत.

    मला इथे नरहर कुरुंदकरांचे मत आठवते आपण लोक एखाद्या विचारवंताला मखरात बसवतो मग त्याची पूजा अर्चा जयंती मयंती करायला सदा सर्वदा मोकळे राहतो !

    कोणतीही व्यवस्था स्वतःचे हितसंबंध जपायचे आणि वृद्धींगत करायचे काम इमाने इतबारे करतच राहते हि आदिम वस्तुस्थिती आहे.

    हिंदू काय, मुस्लीम काय ,चर्च काय ,अगदी बुद्ध फुले आंबेडकर शाहू ते मार्क्स आणि अगदी आज काल उदो उदो करणाऱ्या आणि नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या महाकाय कंपन्या असोत

    या सर्वाना आपण लोक मखरात फीट्ट करून मोकळे झालोय आणि त्यांचा नावावर दुकानदारी सुरु केलीये एकदा हे सुरु झाले कि त्याच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट साम दाम दंड भेद

    याने हटवणे हे गरजेचे होऊन बसते .याला प्रवाहाविरुद्ध जाणारा कोणीही झेपत नाही .शेवटी कालाय तस्मैन महा हेच खरे !

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अरुणजी ...
      आणि आपले मत अगदी योग्य आणि चिंतनीय आहे .
      मुळात भारतीयांची व्यक्तीपुजक मानसिकता इतरांपेक्षा अधिक आहे .
      आणि तिचे परिणाम आपण प्राचीन काळापासून अद्याप भोगत आहोत .
      स्वतंत्र बुद्धीने विचार करून काहीतरी कष्ट साध्य गोष्टी साध्य करण्यापेक्षा आपल्याला हस्तक्षेप आवडतो .
      हस्तक्षेप मग तो ईश्वरी असो वा ज्याला आपण पुजतो त्या मानवी महात्म्यांचा .

      Delete
  12. anakhi ek jara vegle ahe patrika , bhavishya yavar apale kay mat ahe apan lihinar ahat ka jar ekhadi grahshanti vagere karane yavar mala bolayache ahe

    ReplyDelete
  13. lekh prapancha baddal dhnyawad, aani visheshtah budhhipramanyawadi vicharanchya prasara baddal shubhechha, parantu maza aaj paryant cha samaj aahe ki prachin bhartiya oop khandat nirman zalelya sarv dharmani charwak matancha aanshtah angikar kelela asava ex.Hindu- yadny paddhtit zalele badal Budha- anatmawad Jain- sayyam ahinsa ityadi. ya tatwadnyanas purntah manyata denyas kahi samajik asthirtechya samsya asavyat ase mala watate...

    ReplyDelete
  14. charwak vaidik kalkhanda peksha prachin asavet ase mala watat nahi, karan lokayat tatwadnyan he vaidik karmkand aani thotand yanwar tika karte tyamule ved nasate tar tyanwar tika karnycha prashnach nahi

    ReplyDelete
  15. वेद हे आर्यांनी काढले. आर्य हे मुळात हिंदूस्थानातले नाहीच. पूर्वी इथे द्रविड, उत्कल, वंग आणि आदिवासी समाज हेच राहायचे आणि ते त्यांच्या संस्कृतीत सुखी-समाधानी होते. त्यांच्यात कुठलाही भेदभाव नव्हता. परंतु आर्यांनी हिंदुस्थानात पाय ठेवल्यानंतर ही संस्कृती नष्ट झाली. कृष्णाने वैदिक धर्मात सुधारणा केली. पण आर्यांनी यादववंशींच्या दुष्कृत्यांचा फायदा घेऊन ती संस्कृती नष्ट करून परत मनमानी कारभार सुरू केला. श्री कृष्णाच्या मृत्यूनंतर तर त्यांना रान मोकळा मिळाला.

    ReplyDelete
  16. आता श्री कृष्णाबद्दल मी सविस्तर सांगतो त्यापूर्वी रामाबद्दल थोडे ऐका. राम हा आदर्शवादी होता, तसेच तो समाजसुधारक होता. परंतु काही ऋषींमुनींच्या नादी लागून त्याने भलताच आदर्श बाळगला. त्याच्यात अहंकार ( मी पणा) निर्माण झाला. त्याने स्वतःवर प्रेम करणार्‍या पत्नीवर दाट संशय घेतला. त्याच्यासाठी लंकेत आसवा गाळणारी पत्नी त्याला व्यभिचारीण वाटली. त्यासाठी सीतेला अग्नीपरीक्षा द्यावी लागली. हे सर्व ऋषिमुनींचीच शिकवण होती. त्यानंतर परत संशय घेऊन त्याने आपल्या पत्नीचा त्याग केला. त्याचा परिणाम पत्नी कायमची सोडून गेली. त्यावेळी ऋषींसाठी तो आदर्शच होता. आणि एक गेली की दुसरी करणे परंतु राम या मूर्खांच्या नादी लागलाच नाही. तो एकपत्नीच राहिला. संशयवृत्ती किती घाणेरडी आहे हे त्याला कळून चुकले. त्याच्या राज्यात तर सर्व सुखी-समाधानी होते. रामाने अवतार संपवल्यानंतर वैदिक लोकांनी त्याचा अर्थ परत चुकीचा काढला. उलट रामानेच त्याच्या राज्यात भेदभाव आणि पत्नीवर संशय घेणार्‍याला कडक शिक्षा केली होती. रामामध्ये युद्धात भलतेच साहस निर्माण झाले होते. त्याने वालीला कपटाने मारले. यात त्याची चूक नाही ऋषींनी युद्धात कुठलीच नीती शिकवली नव्हती त्याचाच तो परिणाम. कुणाला धरायचा आणि कुणाला मारायचा हेच त्याला कळलं नाही. पत्नीसाठी तो पूर्ण स्वार्थी झाला आणि ओळख न पाळख त्याने वालीला संपवला. वाली हा रावणाचा शत्रू म्हणजे शत्रूचा शत्रू हा आपला मित्र हे पण त्याला कळले नाही. पण फायदा काय झाला. पत्नीसाठी एव्हढा घडवून पत्नी जवळ राहिलीच नाही. भलत्याच आदर्शवादाने त्याला गुन्हेगार बनवला.

    ReplyDelete
  17. आता श्री कृष्णाबद्दल बोलू. कृष्णाचा जन्म रामाच्या सर्व चूका खोडण्यासाठी झालेला आहे. राम हा एकपत्नी होता. पण कृष्ण हा बहुपत्नी होता. रामाने आदर्श बाळगला पण कृष्णाने भलता आदर्श न बाळगता स्त्री-पुरूष समानता बाळगली. कृष्णाच्या मुख्य चार पत्नी आणि इतर सोळा हजार पत्नी यांच्याबाबतीत तो अगदी उदारमतवादी होता. त्या कुठे जातात आणि काय करतात याचा त्याने कधी कानोसा घेतला नाही. आपल्या पत्नींवर त्याचा इतका विश्वास होता की त्या कुठे ही गेल्या तरी माझ्याकडेच परत येणार हे त्याला माहीत होते. पत्नींचाही तितकाच विश्वास होता. ह्यालाच म्हणतात स्त्री-पुरूष समानता. द्रोणाचार्याने युद्धाभ्यास शिकवला खरा पण युद्धनीती (कुणाला,कधी,कोठे, केव्हा आणि कसे मारायचे) कृष्णाने शिकवली. तीच युद्धनीती द्रोणाचार्यास महागात पडली. द्रोणाचार्याला युद्धनीती माहीत होती पण अर्जुनला शिकवली नाही. भीमाला लघुयुद्ध सहाय्य आणि अर्जुनाला गीतेचा उपदेश. रुक्मिणीशी प्रेमविवाह हे सुद्धा काही ऋषींमुनींच्या मते चुकीचे होते. कृष्णाने धर्मात सुधारणा आणि स्त्री-पुरूष समानता आणली परंतु सर्व यदुवंशी दारू पिऊन धिंगाणा घालायचे आणि स्त्रियांची छेड काढत त्यांच्यावर जबरदस्ती करू लागले. कृष्णाने खूप समजावलं पण यदुवंशी काही ऐकायचे नाही हे पाहून ऋषींमुनींनी फायदा घेतला. कृष्णाच्या विरूद्ध काही ऋषींमुनी होते त्याकाळी. कृष्ण एकदा हळू आवाजात यादवांशी बोलत होते. त्यांना ते समजावत होते की स्त्री वर जबरदस्ती करून योनीसुख घेणे पाप आहे. परंतु मूर्खांनी अर्धवट ऐकून स्त्री योनी पाप आहे असे वेदांमध्ये लिहून टाकले. द्वापारयुगात स्त्रीयांना पूर्णपणे स्वातंत्र होते हे कळून येते राधा आणि कृष्णाचे लपून-छपून भेटणे परंतु त्या काळी राधेला कुणी कलंकित केली नव्हती आजच्या युगात स्त्रीयांना का कलंकित केलं जातं. सावित्री ही पत्नी नंतर प्रेमिका पहिली होती. प्रियकराशी विवाह हेच खरे स्त्री स्वातंत्र्य होते त्याकाळी. परंतु आज प्रेमिकेला महत्त्वच राहिले नाही. संस्कृतीच्या नावाखाली सरळ साध्या मुलीचं लग्न कुठल्याही माकडछाप मुलाबरोबर लावून देतात. यात मुलीच्या इच्छेचा विचार केला जात नाही. ही या मूर्खांनी विवाह पद्धती काढली. पतिव्रता नावाचे नवीन खूळ जबरदस्ती नकोनकोत्या स्त्रियांमध्ये भरले. ह्यात कित्येक प्रेमिकांना त्यांच्या प्रियकरांपासून वेगळे केले. त्यांचा भलत्याच पुरूषाशी विवाह करवून त्यांना पतिव्रता धर्म बाळगायला लावला. माणसापेक्षा संस्कृती महान आहे ह्या मूर्खांसाठी. कृष्णाने इंद्रोत्सवावेळी सांगितले होते की संस्कृती आणि परंपरा ह्या काळानुसार बदलत असतात. ज्या प्रमाणे माणूस जूने कपडे काढून फेकतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो त्याप्रमाणे जूनी संस्कृती लोप पावून नवीन संस्कृती उदयास येते.

    ReplyDelete
  18. चार्वाक ही व्यक्ती काल्पनिक होती, एकच होती का त्या विशिष्ट जीवनवादी तत्त्वज्ञानाच्या पुरस्कर्त्यांकरिता वापरलेली उपाधी होती, या बाबत तज्ज्ञांत वेगवेगळी मते आहेत. असे असले तरी हे चार्वाक जडवादी व जीवनवादी अशा लोकायत नावाच्या अवैदिक तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते या बाबत दुमत नाही. तत्कालीन इतर धर्मीय तत्वचिंतकांनी त्यांच्या या अनीश्वरवादी विरोधकांवर उपभोगवादी असल्याचा शिक्का मारून त्यांना टीकेचे लक्ष्य बनवले. महाभारतात चार्वाक नावाच्या कौरवांच्या बाजूने असलेल्या एका व्यक्तीचा उल्लेख आढळतो, पण तिथे लोकायत तत्त्वज्ञानाची कोणतीही चर्चा किंवा त्या व्यक्तिरेखेचा कोणत्याही विशिष्ट तत्त्वज्ञानाशी संबध असल्याचे आढळून येत नाही

    ReplyDelete
  19. ज्यांच्या विचारां बद्दल काही ठोस माहिती नाही

    त्यांच्या बद्दल तर्क लावून उगाच ब्राम्हण म्हणा किंवा अजुन कोणाला म्हणा शिव्या देण्याचा मार्ग सुकर होतो

    ReplyDelete
  20. एकदम रोखठोक. आवडले बुवा !....MBR

    ReplyDelete
  21. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  22. आदरणीय सुहास भुसे सर लेख खूप आवडला पुढील लेख pls लवकर येउद्या. आपले खूप आभार सर!💐💐

    ReplyDelete
  23. आयुर्वेद अभ्यासताना चार्वाक दर्शन ओळख झाली होती
    त्याविषयी असे सुंदर विचार वाचायला आवडले

    ReplyDelete
  24. फक्त खाणे-पिणे, मौजमजा करणे यासाठी जगणे म्हणजे जनावरांसारखे जगणे आहे. आहार, निद्रा, भय आणि मैथुन या गोष्टी तर पशुदेखील करतात. मग पशुंमध्ये आणि माणसामध्ये फरक काय राहिला? माणसाला विचार करण्याची शक्ती लाभली आहे हेच माणसाचे वैशिष्टय आहे. सत्याचा शोध करणे हेच माणसाचे ध्येय असले पाहिजे. सत्याचा शोध करण्यासाठीच भारतात प्राचीन काळापासून सोळा दर्शने तयार झाली. उपनिषदांसारखे सुंदर सत्यशोधक ग्रंथ जगात इतर कोठेही सापडणार नाहीत. चार्वाकांच्या भोगवादी विचाराप्रमाणे आमचे पूर्वज वागले असते तर भारतीय तत्त्वज्ञानाची इतकी प्रगती झाली नसती.

    ReplyDelete