About

Sunday 26 August 2012

आसामी नागरिकांची ससेहोलपट


                      रामायणात एक कथा आहे. प्रभू श्रीरामचंद्र जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा रामावर प्रेम करणारे अनेक अयोध्यावासी जन त्यांच्यासोबत निघाले. अयोध्येच्या सीमेवर आल्यावर श्रीरामप्रभूंनी त्यांना परत जायला सांगितले. त्यावर बरेच लोक परत गेले. काही मात्र गेले नाहीत. १४ वर्षांचा वनवास भोगून रामचंद्र जेव्हा परत आले तेव्हा हे परत न गेलेले लोक त्यांची वाट पाहत तिथेच बसलेले त्यांना आढळले. त्यांनी आपली घरे दारे सोडून तिथेच मुक्काम ठोकला होता. प्रभू श्रीरामचंद्र त्यांच्यावर, त्यांच्या श्रद्धेवर, त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना एक वर दिला कि एक दिवस इथे तुमचेही युग येईल.

     ते लोक होते तृतीयपंथी. इथ भारतात मागील महिना-पंधरवड्यातला घटनाक्रम पाहिला कि हि दंतकथा खरी तर नाहीये नं अशी शंका आल्यावाचून राहत नाही. एक एक निंदनीय घटना आणि सरकार आणि एकूणच प्रशासन व्यवस्थेच्या क्षमतेवर आणि हेतूवर शंका उपस्थित करणारी आणि खरच हे षंढयुग तर नव्हे असा विकल्प मनात निर्माण करणारी आहे.

     या घटनांच्या मालिकेची सुरवात आसामपासून झाली. तिथ बांगलादेशी मुस्लीम तिथल्या स्थानिक आदिवासींना त्यांच्या स्वत:च्या हक्काच्या प्रदेशातून हुसकून लावण्यासाठी जिहाद पुकारतात काय आणि सरकार त्यावर केवळ बघ्याची भूमिका घेत स्वस्थ बसते काय ? इतकी सगळी यंत्रणा असून या बांगलादेशी राष्ट्र्द्रोह्यांना आवर घालणे त्यांना अशक्य होते काय ? हा सगळा प्रकारच अनाकलनीय आहे. मुळात इतक्या प्रचंड प्रमाणात बांगलादेशी घुसखोर इथ घुसखोरी करत होते तेव्हा हे सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा काय करत होती हा खरा प्रश्न आहे.

     आणि त्यानंतर झालेले एस एम एस सत्र तर देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलीन करणारे आणि एकूणच व्यवस्थेच्या देशाप्रती असणाऱ्या निष्ठेबद्दल प्रश्न उपस्थित करणारे होते. हे एसेमेस पाठवणारे जे कोणी होते त्यांना देशभर विखुरलेल्या नेमक्या आसामी लोकांचेच नंबर कसे मिळाले ? दुरध्वनी कंपन्या यात सामील असल्याशिवाय हे शक्य नाही कारण कायद्याने कोणत्याही क्रमांक धारकाचा नंबर हा ती दूरध्वनी सेवा पुरवणारी कंपनी आणि तो क्रमांक धारक ग्राहक यांच्यातल्या गोपनीय कराराचा भाग असतो. तो त्रयस्थ व्यक्तीला कळणे शक्य नाही. अर्थात दूरध्वनी कंपन्या यात गुंतलेल्या नसतील तोवर. या आसामी नागरिकांचे दूरध्वनी क्रमांक हस्तगत करून त्यांना हा पवित्र महिना संपल्यावर तुम्हाला ठार करण्यात येईल, तुमचे घरदार सोडून पळून जा अशा आशयाच्या धमक्या मिळत होत्या.



     हे एसेमेस कसे येत आहेत कोठून येत आहेत याचा काही केल्या आपल्या गुप्तचर यंत्रणांना तपास लागेना, सीबीआयने तर या एसेमेस संबंधी माहिती देणाऱ्याला लाखो रुपयाचे इनाम जाहीर केले. इथेच यांची कार्यक्षमता(?) उघडकिला आली. आय बी, सीबीआय , ra^ अशा कोट्यावधींचा निधी ज्यांच्यावर खर्च केला जातो त्या संस्थांनी हात टेकल्यावर अखेर खाजगी नेट तज्ञांची मदत घेऊन या एसेमेस चा माग काढण्यात आला तेव्हा हे एसेमेस पाकिस्तानातून पाठविल्याचे उघडकीला आले.    

     या वेळी एकही पक्ष किंवा नेता संघटना या आसामी बांधवांनी सहाय्य देण्यास पुढे आली नाही. त्यांच्या जखमांवर फुंकर कोणी घातली नाही. किंवा हा भारत देश तुमचा आहे. इथ वाटेल तिथ तुम्ही सुखाने नांदू शकता, राहू शकता असे त्यांना छातीठोकपणे सांगणारा एकही नेता पुढे आला नाही. आसामी नागरिकांचा देशात कुठेही सुखनैव वास्तव्य करण्याचा घटनात्मक अधिकार हिरावून घेण्यात आला. आणि एकच अभूतपूर्व पळापळ सुरु झाली. अशातच या आसामी नागरिकांवर दुर्दैवाचा आणखी एक घाला बसला. १९ Aa^gasT ला बंगळूरहून गुवाहटी एक्सप्रेसने आसामला स्वगृही निघालेल्या या आसामी नागरिकांना अज्ञात(?) देशद्रोह्यांनी लुटले. त्यांना बेदम मारहाण केली आणि नंतर त्यांपैकी नउ जणांना धावत्या रेल्वेतून बाहेर फेकले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सातजण गंभीर जखमी आहेत.

     तिकडे आसामात बोडो नागरिकांवर अन्याय आणि अत्याचारांचा कळस आणि इथे हि परिस्थिती. या बिचाऱ्या आसामी देशबांधवांवर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करणे त्यांना धीर देणे, त्यांच्या जीवित व वित्ताची हमी घेणे तर दूरच राहो पण या सर्व अत्याचारांच्या बातम्या दडपन्यातच सरकार आपला वेळ आणि श्रम खर्ची घालत होते. कारण काय तर म्हणे असंतोष भडकू नये. या षंढ प्रशासनव्यवस्थेने एकूणच या आसामी बांधवांना वाऱ्यावर सोडले हेच खरे.....!!

                                                ( क्रमश:)

                                      सुहास भुसे
                                       (२६-८-२०१२)   

Saturday 25 August 2012

इस्लामी धर्मग्रंथातील जिहाद




      कुराण, हादिसं, शरियत अशा प्रमुख इस्लामी धर्मग्रंथांतून इस्लामची अनेक तत्वे सांगितली असली तरी जिहाद फी सबील्लीलाह अर्थात अल्लाह च्या मार्गातील संघर्ष हाच इस्लामचा गाभा आहे. जिहादला उपरोक्त ग्रंथांतून असलेले भक्कम पाठबळ आपण या लेखातून काही निवडक आयातीच्या आधारे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

      जिहाद चे पाच मुख्य घटक आहेत.
१)      इस्लामचा बळाने विस्तार
२)     श्रद्धाहीनांचा (जे मुस्लीम नाहीत ) निपा:त
३)     जिझिया
४)     श्रद्धाहिनांची मालमत्तारूपी लुट
५)    श्रद्धाहिनांची बायकामुले रूपी लुट (घनिमह )

आता या प्रत्येक घटकासंदर्भात हे पवित्र ग्रंथ काय म्हणतात ते पाहुयात.
कुराण पाचवा अध्याय (सुरह तौबाह ) पाचवी आयत
आणि हे पवित्र महिने संपल्यावर तुम्हाला मूर्तिपूजक जेथे सापडतील तेथे त्यांना ठार मारा. त्यांना कैद करा. त्यांना वेढा घाला. त्यांच्यासाठी मोक्याच्या ठिकाणी दबा धरून बसा. परंतु जर त्यांनी पश्चाताप व्यक्त केला आणि नमाज अदा केला व जकात दिली तर त्यांना जाऊ द्या.

जिहाद विषयक पहिल्या दोन घटकांचे स्पष्टीकरण देण्यास हि आयत पुरेशी बोलकी आहे. इतिहासाला ज्ञात आहे कि इस्लामचा विस्तार तलवारीच्या बळावर झाला आहे. इस्लाम धर्माची तत्वे पटली म्हणून इस्लाम स्वीकारला असे एकही उदाहरण सापडणार नाही. आता हा विस्तार कशाप्रकारे करायचा याचे निसंदिग्ध मार्गदर्शन वरील आयत करते. माणसाची मूळ मानसिकता शांतताप्रिय असते त्यामुळे काही मुस्लिमांना हा रक्तपात नकोसा वाटू शकतो. त्यांना खास मार्गदर्शन पुढील आयतीत केले आहे.

अबू हुरेरा यांच्या अधिकारावर अल्लाहच्या प्रेषितांनी म्हटल्याचे सांगण्यात येते: जो अल्लाच्या कार्यासाठी लढाई न करताच मृत्यू पावतो, किंवा जिहाद करण्याची (दृढ) इच्छा व्यक्त न करताच मरतो त्याचे मरण हे दांभिकाचे असते. (सहिह मुस्लीम. क्र. ४६९६ )

अर्थात जिहाद करण्याची इच्छा नसणारा आणि जिहाद न करणारा मुस्लीम अल्लाहच्या कृपेला पात्र ठरत नाही. थोडक्यात शांतताप्रिय मुस्लीम हा मुस्लीम असूच शकत नाही.

     
जिझिया हा शब्द आपणास औरंगजेबाने इथल्या हिंदू जनतेवर लादलेला एक जुलमी कर म्हणून माहित आहे. मुस्लीम शासक-प्रचारकांना सगळे जग हिरवे बनवायचे आहे. आता काही मुर्तीपुजकांना लुटीच्या बदल्यात दिलेली हि सुट आहे. खराजगुझार (जिझिया )भरणारी आणि झिम्मी ( आश्रित ) म्हणून हिंदू प्रजेला कनवाळू अंतक:रणाच्या इस्लामने दिलेली उदार सुट, सवलत म्हणजे जिझिया.     

घनिमह अर्थात युद्धात मिळालेल्या लुटीसंदर्भात हे पवित्र धर्मग्रंथ काय सांगतात ते पाहू .हि लुट मुर्तीपुजकांची मालमत्ता असेल वा त्यांची बायकामुले असतील.

आणि तुमच्या उजव्या हाताच्या मालकीच्या(कैदेत असलेल्या) स्त्रिया सोडून सर्व विवाहित स्त्रिया तुम्हाला वर्ज्य आहेत (कु.४/२४)
आता हा संदर्भ सन्माननिय पुनर्विवाहाचा नाही तर बळजबरीने ठेवावयाच्या संबंधाबाबत आहे हे सांगण्यासाठी तज्ञाची आवश्यकता नाही.
आपल्याआधी कोणत्याही लोकसमूहासाठी युद्धातील लुट कायदेशीर नव्हती. आपला दुबळेपणा आणि विनम्रपणा पाहून अल्लाहने ती आपल्यासाठी कायदेशीर केली. (सहिह मुस्लीम. क्र. ४३२७)
एखाद्या कोमल हृदयाच्या मुसलमानाला हि रक्तलांच्छित लुट नको वाटत असेल तर त्याच्या मनात काही संदेह राहू नये म्हणून
युद्धातील लुटीचा उपभोग घ्या ती कायदेशीर आणि शुद्ध आहे “( कु.८/६९ )


जिहादचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी या प्रातिनिधिक आयती पुरेशा आहेत. माझे या आधीचे दोन लेख आणि हा तिसरा मिळून वाचल्यानंतर वाचकांच्या लक्षात पुरेपूर आले असेल कि जिहाद हि चीज काय आहे.

(क्रमश:)
अधिक माहितीसाठी जिज्ञासू वाचकांनी सुहास मुझुमदार यांचा जिहाद हा ग्रंथ वाचावा. या ग्रंथाचे शरद मेहेंदळे आणि श्रीरंग गोडबोले यांनी केलेले मराठी भाषांतर देखील उपलब्ध आहे.

                            सुहास भुसे
                          (२५-८-२०१२)

       


         

Wednesday 22 August 2012

राज, राजकारण आणि हिंदुत्व


राज ठाकरे यांनी काढलेला विराट मोर्चा आणि राजजींनी घेतलेली पोलीस आणि माध्यमांचे मनोबल वाढवणारी भूमिका यांचे सर्व थरांतून कौतुक होत आहे. मुंबई दंगली आणि त्याला जबाबदार असणार्या समाजविघातक प्रवृत्तीबाबत सर्वच राजकीय पक्ष आणि नेतेमंडळी मुग गिळून गप्प असताना राजजींनी मांडलेली भूमिका आणि त्यांना जनतेचा मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद निश्चितच स्तुत्य आहे. मरगळलेली शिवसेना, अंतर्गत कलहात गुरफटलेला भा ज प आणि त्यांनी केलेले मुंबई दंगलींमुळे हिंदू समाजात निर्माण झालेल्या प्रचंड असंतोशाकडे दुर्लक्ष यामुळे जी एक रिकामी जागा तयार झाली होती ती निश्चितच राज आणि मनसे ने भरून काढली आहे कालच्या मोर्चामुळे.

मलाही या मोर्च्याबद्दल आणि राजसाहेबांच्या भाषणाबद्दल मोठे औस्तुक्य होते. एरव्ही तास तास अशा सभांमधून गर्जणाऱ्या राज नी भाषण १५ मिनिटातच आटोपले हि गोष्ट काहीशी खटकली. पण त्याहून खटकली ती त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला दिलेली बगल. तसा मनसेच्या पक्ष घटनेतच धर्मनिरपेक्षता हा मुद्दा आहे. त्यामुळे खर तर या गोष्टीचा विषाद वाटायचे काही कारण नव्हते. पण माझ्या कट्टर हिंदुत्ववादी मनाला उगीच एक आशा होती कि आपला आवडता नेता बाळासाहेबांची हिंदुत्वाची पताका खांद्यावर घेऊन त्यांच्याच शैलीत गर्जेल. पण माझा काहीसा भ्रमनिरास झाला.

अर्थात आज सर्वच हिंदुत्ववादी पक्षांना हिंदुत्व हा मुद्दा अडचणीचा वाटत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सत्ता खेचून आणता येत नाही हे लक्षात आल्यानंतर या पक्षांची हिंदुत्वाची धार काहीशी बोथट झाली आहे. हे मतांच्या जोगव्याचे राजकारण आहे असे मी म्हणणार नाही. शेवटी कोणत्याही राजकीय पक्षाचे सत्ता हे ध्येय असणे काही चुकीचे नाही. हा सर्व दोष मी उलट परंपरागत हिंदू मानसिकतेला देईन. का या देशात ..या हिंदुस्तानात हिंदुत्ववादी पक्षांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सत्ता मिळत नाही ? मुस्लीम समाज जसा त्यांचे लांगुलचालन करणाऱ्या तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांच्या मागे आपली ताकद एकजुटीने उभी करतो हे हिंदूंना का अशक्य आहे ? जिथल्या जनतेतील ८० % लोकांचा धर्म हिंदू आहे त्या देशात हिंदुत्वाचा मुद्दा अस्पृश्य व्हावा यापेक्षा हिंदूंसाठी लाजिरवाणी गोष्ट ती कोणती ?

आणि जर एखाद्या नरेंद्र मोदींसारख्या नेत्याने आपल्या पोलादी हिंदुत्वाची एखादी झलक जगाला दाखवली तर ते मोदी अनेकांच्या टीकेचे लक्ष होतात. अमेरिकेने व्हिसा नाकारण्यासारख्या भयंकर अपमानाला त्यांना सामोरे जावे लागते. मुस्लीम दंगली घडवून आणत असताना मुग गिळून गप्प बसणारे मिडीया आणि मानवाधिकारवाले मोदींवर मात्र तुटून पडतात. देशाच्या पंतप्रधानपदासाठी भडक प्रतिमा असणारा नेता म्हणून त्यांना स्वत:च्या पक्षातूनच विरोध होतो. अशा पार्श्वभूमीवर राजजी सारखा बाळासाहेबांच्या तालमीत वाढलेला, नसानसात हिंदुत्व खेळत असलेला नेता जर धर्मनिरपेक्ष भूमिका तीही दंगलींच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्च्यात घेत असेल तर दोष कोणाचा ? त्यांचा कि जनतेच्या गुळमुळीत आणि पर्यायाने धर्मद्रोही मानसिकतेचा ??   


                                            सुहास भुसे 
                                          (२२-८-२०१२ )  

इस्लामी दहशतवादाची पाळेमुळे


    संपूर्ण जगाला आज प्राधान्याने भेडसावणारी समस्या म्हणजे इस्लामी दहशतवाद होय. आज जगात अनेक जाती धर्म सुखनैव व शांततामय सहजीवन जगत असताना इस्लाम धर्मच दहशत वादात इतका अग्रेसर का ? या गोष्टीची कारणमीमांसा फारशी केली जाताना दिसत नाही. या सर्व गोष्टींचे मुळ इस्लामच्या शिकवणुकीत आहे यावर बहुसंख्य जणांचा विश्वास बसणे कठीण आहे. कोणताच धर्म वाईट शिकवण देत नाही हे आमचे इतर धर्मांबद्दलचे मुलभूत ज्ञान असते. किंवा आमच्या इथले मुसलमान चांगले आहेत अशी अनेक हिंदूंची भोळी समजूत असते. माझा एक फेसबुक  मित्र टिपू सुलतानला महापुरुष समजतो किंबहुना टिपू म्हणजे म्हैसूरचा शिवाजी अशी त्याची समजूत आहे. इतकेच नव्हे तर विजय मल्ल्या यांनी टिपूची तलवार भारतात आणली म्हणून त्यांनाही तो हिरो मानतो. मी त्याला टिपू कोण होता आणि त्याने कुर्द प्रांतातील ५०,००० हिंदूंना साखळदंडाला बांधून म्हैसूरला कसे आणले व त्यांना कसे बाटवले हे सांगितले तेव्हा तो जवळजवळ बेशुद्धच पडला. अकबर हा चांगला बादशहा होता असे अनेक जणांना वाटते पण याच अकबराने बालवयातच हिमू या  युद्धात जखमी झालेल्या व असहाय्य हिंदू योद्ध्याला मारून ' गाझी ' हि पदवी प्राप्त केलि होती व हि खास पदवी फक्त मूर्तिपूजक काफिर लोकांना मारणाऱ्या थोर योद्ध्यांनाच दिली जाते याचे ज्ञान फारच कमी हिंदूंना असते. मुसलमान हा इथून तिथून सारखाच आणि तो जाईल तिथे जिहादच करेल हे मुलभूत ज्ञान आज हिंदूंनी प्राप्त करून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.


            जिहाद बद्दल देखील आपल्या भोळ्या हिंदुजनांच्या खुपच भोळ्या समजुती असतात. जिहाद म्हणजे धर्मयुद्ध असा सरळ साधा अर्थ काढला जातो . पण हि अतिशय चुकीची समजूत आहे. आपले धर्मयुद्ध आणि जिहाद यात फार मोठा फरक आहे.जिहाद आणि जिहादची तत्वे यासंदर्भात मी माझ्या पुढच्या लेखात सविस्तर विश्लेषण करणार आहे.  नि : शस्त्र शत्रूला अभय देणे, शरण आलेल्याला सोडून देणे, युद्धात बायका-मुले, धर्मस्थाने  यांना हात न लावणे हे हिंदूंचे धर्मयुद्ध आहे. आणि जिहाद म्हणजे याच्या बरोबर उलट. हजारो हिंदूंची कत्तल करणे, हाती आलेल्या हिंदू राजांना त्यांची कातडी सोलून त्यांना झाडावर फाशी देणे, त्यांच्या राण्यांना व राजकुमारींना जनानखान्यात खेचणे, स्रीयांना- पुरुषांना गुलाम बनवून त्यांची विक्री करणे, त्यांना बाटवणे, मंदिरे फोडून तिथे मशिदी उभारणे व तिथेच या बाटवलेल्या हिंदूंना नमाज पढायला लावणे, हा जिहादचा खरा चेहरा आहे. वानगीदखल हिंदूंच्या पृथ्वीराज चौहान या महान सम्राटाचे देता येईल.


             महमद घोरीने पृथ्विराजावर एकूण ९ वेळा स्वारी केली. त्यातील आठ वेळा पृथ्विराजाने घोरीचा पराभव केला. चार वेळा हाती आलेल्या घोरीला त्याने शरण आलेल्याला अभय द्यावे या मुर्ख समजुती खातर सोडून दिले. नवव्या वेळी घोरीने पृथ्विराजाचा फंदफितुरीने पराभव केला आणि त्या वेळी मात्र त्याने पृथ्वीराज ला सोडले नाही. त्याला बांधून आपल्या देशात अफगाणिस्तानला नेले. त्याचे डोळे काढून त्याला हाल हाल करून मारले. त्याला अग्नी न देता त्याचे दफन केले. त्या जागी त्याचा एक हिडीस अर्धपुतळा उभा केला. तेथे एक जोडा ठेवला आणि येणाऱ्या जाणार्या मुसलमानाने त्याला थोबाडावे असा एक लेख लिहून ठेवला.
            
           हे मुस्लीम संस्कार आहेत. ही त्यांची रानटी संस्कृती आहे. मागील हजारो वर्षांपासून हिंदूस्थान इस्लामच्या या आक्रमक टापांखाली रगडला जात आहे. जगातल्या इतर कोणत्याही देशाला झाला नसेल इतका त्रास आणि अन्याय अत्याचार हिंदुस्तानातील हिंदू जनतेने सोसले आहेत.


             या नउशे ते हजार वर्षाच्या कालखंडात मुस्लीम सतत विजय संपादन करत गेले. मुस्लीम हे शूर नव्हते तर क्रूर होते. त्यांच्या हिडीस आणि बिभत्स छळाची दहशत हिंदूंना बसली होती. ती दहशत मोडून काढली ती आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. अफजलखानचा पराभव करून त्यांनी दाखवून दिले कि मुस्लीम पराजित होऊ शकतात. फक्त आपली ती सुप्रसिद्ध सहिष्णुता गुंडाळून ठेवणे  आणि शामळू धर्मयुद्धाचे नियम कालानुरूप धाब्यावर बसवणे गरजेचे आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या अजेय आणि तेजस्वी पराक्रमाने मुस्लिमांची हजार वर्षाची दहशत लुळी पांगळी करून टाकली . पण राजांनी केलेला हा इस्लामचा अभ्यास आज आपण विसरलो आहोत. आणि आज हिंदुस्तानात सर्वत्र सुरु असलेला जिहाद चा गरादोळ हे त्याचेच फलित आहे.


             हिंदुस्तानात आजपर्यंत झालेल्या दंगली काय किंवा आज आसाम किंवा मुंबईत झालेल्या दंगली काय ...यांचे विश्लेषण प्रशासन किंवा मिडिया काही ठराविक आणि गोंडस शब्दात करत असते. शांततामय समुदायातील काही माथेफिरू आणि समाजविघातक प्रवृत्तींचे कृत्य. मला सांगा एखाद्या तात्कालिक घटनेची प्रतिक्रिया म्हणून काही मुस्लिमांचा समुदाय बाहेर पडतो काय आणि पाहता पाहता त्याचे ५०,००० च्या विराट समुदायात रुपांतर होते काय , अचानक त्यांच्याकडे पेट्रोल बोंब , तलवारी .कोयती , जाळपोळ करण्यासाठी केरोसिन आणि पेट्रोलचा साठा , लाठ्या काठ्या इ सामान सुमान येते काय ...सगळेच डोक्याच्या बाहेरचे आहे. हे काय गौडबंगाल असावे बर बुवा ??

     
         माझ्या जागृत हिंदू बांधवांनो या सर्व दंगलींचा जर अभ्यास केलात तर हा काही माथेफिरू आणि समाजविघातक गटाचा संताप उद्रेक नसून दंगल हा एक पूर्वनियोजित व व्यवस्थित आखणी केलेला एक कट असतो. काफर , मूर्तिपूजक लोकांविरुद्ध पुकारलेला एक सर्वंकष जिहाद असतो हे आपल्या ध्यानात येईल. दगडाला विटेने कसे उत्तर द्यायचे आणि सतत होणाऱ्या या जिहादी आघातांना कसे रोखायचे हे समस्त हिंदू समुदायाने एकत्र येऊन ठरवण्याची वेळ आता येऊन ठेपलेली आहे. हिंदू बांधवानो सावध व्हा. जिहाद आता देशात कुठेतरी वा रस्त्यावर राहिलेला नाही. तो तुमच्या आमच्या घराची दारे थोठावत आहे.                         




                                                                                                                                                        

                                                                                             सुहास भुसे.
                                                                                          ( ११ -०८ -२०१२ )           

जिहादचा इतिहास


वाचक मित्रहो,

देशभर फोफावत असलेला इस्लामी दहशतवाद, त्यामागची मुस्लीम आणि त्याला बळी पडणार्या हिंदूंची मानसिकता या संदर्भात माझा इस्लामी दहशतवादाची पाळेमुळे हा लेख आपण वाचलाच असेल. याच मालिकेतील या दुसऱ्या लेखात हा दहशतवाद या दंगली कशा संचालित होतात वा केल्या जातात ( इथे संचालित हा शब्द पूर्ण विचार करून वापरला आहे ) या दंगली घडवून आणण्यामागे कोणाचा हात असतो, आणि या पाठीमागचे इस्लामचे तत्वज्ञान काय आहे या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत.

साधारणत: प्रत्येक कुटुंबवत्सल माणूस हा शांतताप्रिय असतो असे एक मानसशास्त्रीय निरीक्षण आहे. सर्वसामान्य नागरिकांना मग ते कोणत्याही धर्माचे असोत चाकोरीबद्ध जगणे प्रिय असते. मग अस काय होत कि एखादा मुल्ला, मौलवी जिहादची हाक देतो आणि दहा हजार, पन्नास हजार , लाखांच्या संख्येने मुस्लीम समुदाय त्याला प्रतिसाद देतो. जाळपोळ, हिंसा, बलात्कार घडवून आणले जातात? देश , हि भूमी जिने आपल्या बापजाद्यांच्या लाखो पिढ्या पोसल्या आहेत तिच्यावरची निष्ठा, उच्च नैतिक मुल्ये पायदळी तुडवली जातात ? इतके सामर्थ्य त्या मुल्ला, मौलवींच्या हाकेला कोठून प्राप्त होते ? एखाद्या हिंदू धर्मीय साधूने किंवा एखाद्या संताने अशी इतर धर्मियांवर हल्लाबोल ची हाक दिली तर त्याला कितपत प्रतिसाद मिळेल ? एखाद्या हिंदू संघटनेने दंगल घडवून आणायची म्हटले तर काय होईल ? किती हिंदू घरे सोडून रस्त्यावर उतरतील ? आज पर्यंत हिंदूंच्या हिंसेची किती उदाहरणे इतिहासाला माहित आहेत ? हिंसात्मक कृत्यांमध्ये हिंदूंचा सहभाग असतो तो मुस्लीम हल्ल्यांची प्रतिक्रिया किंवा प्रत्युत्तर म्हणून . हिंदूंनी सुरु केलेल्या दंगलींचे एकही उदाहरण सांगता येणार नाही. आणि मुस्लीम धर्माचा इतिहास हिंसेने भरलेला आहे. रक्तरंजित, बिभत्स कृत्यांनी भरलेला आहे. वानगीदाखल हिंदुस्तानात अलीकडच्या काळात झालेल्या मोठ्या जिहादी दंगलींवर व घातपाती दहशत वादी कारवायांवर एक नजर टाकूया.

१)             १९२१ चे कुप्रसिद्ध मोपल्याचे बंड
२)            १९४६ चे नौखालीचे दंगे
३)            १९४७ फाळणीच्या वेळच्या अमानुष दंगलीत झालेले बीभत्स अत्याचार  
४)            काश्मिरात १९४७ पासून आजतागायत सुरु असलेला हिंदूचा वंशविच्छेद
५)           संसदेवरील हल्ला
६)             मुंबईचे बॉम्बस्फोट
७)           गोध्राचे जळीतकांड
८)            पुण्यातले बॉम्बस्फोट
९)             आसाम मधला वांशिक हिंसाचार
१०)         रझा अकादमी कृत मुंबईची दंगल

आता हि सर्व बीभत्स आणि माणुसकीला काळीमा फासणारी कृत्ये म्हणजे  माथेफिरू अविचारी समाजकंटकांची कृत्ये आहेत. दहशतवाद्याला कोणताही धर्म नसतो अशी लोकांची चुकीची समजूत  आपले अनेक नेते, मिडीयावाले , मानवाधिकारवाले करून देत असतात. पण जिहादी दंगली म्हणजे यापैकी काही नाही. जिहादला एक निश्चित अशी तात्विक बैठक आहे. जिहाद हे एक थंड डोक्याने डोक्याने विचारपूर्वक केलेले पूर्वनियोजित कृत्य असते. वांशिक हिंसाचार आणि दंगली हे जिहादचेच दृश्यमान रूप आहे.

जिहाद हि संकल्पना आणि त्याला कुराण, हादिसं आणि शरियत या तीन प्रमुख इस्लामी ग्रंथामध्ये असणारा आधार प्रत्यक्ष त्या मध्ये असणार् या आयातींच्या अनुवादाच्या पुराव्याधारे मी पुढच्या लेखामध्ये मांडेन .

                                   
                              सुहास भुसे
                              (१८-८-२०१२)


      

Monday 20 August 2012

कायम विनाअनुदानित शिक्षकांना कोणी वाली आहे का नाही ?


            महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य म्हणून एके काळी प्रगतीपथावर होते. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र , टिळक गोखले आगरकरांचा महाराष्ट्र कर्मवीर भाऊराव पाटील, मामासाहेब जगदाळेंचा महाराष्ट्र अशी महाराष्ट्राची ओळख होती. शिक्षणाची गंगोत्री हि या प्रगतीचा पाया होती. पण शिक्षण क्षेत्रात आज माजलेली बजबजपुरी पाहता " हेची फळ काय मम तपाला ?? " अस म्हणत हे महापुरुष  डोक्याला हात लावल्याशिवाय राहणार नाहीत.

            या शिक्षणाच्या खेळखंडोबातला ऐरणीवरचा प्रश्न म्हणजे कायम विनाअनुदानित शाळांचा प्रश्न.
मुळात या निर्णयाचा पायाच इतका तकलादू आहे कि या निर्णयाचे तात्विक, प्रशासकीय, सामाजिक वा माणुसकीच्या ....अशा कोणत्याच दृष्टीकोनातून समर्थन करता येत नाही. राज्यभरात सुमारे ४५०० शाळा आणि ५५००० शिक्षक या शासनाच्या जुलमी निर्णयाच्या खाईत होरपळत आहेत. एखाद्याचे श्रम फुकट घेववतात तरी कसे या निर्दयांना ? आणि मग आपल्या समाजात श्रमप्रतिष्ठा राहिली नाही म्हणून बोंब मारायचा काय अधिकार या समाज धुरिणांना ?
         
             शिक्षणक्षेत्र हे अनुत्पादित क्षेत्र आहे असे शासनाचे मत हा या निर्णयाचा पाया आहे. आगस्ट २००२ च्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तत्कालिक प्रशासकांच्या किंवा त्यांना असा बद्सल्ला देणार्या त्यांच्या सल्लागारांची कीव करावी तेवढी थोडी आहे. शिक्षण क्षेत्र हे अनुत्पादित क्षेत्र आहे म्हणता मग शिक्षण करापोटी वर्षाला हजारो कोटींची रक्कम वसूल करून तीजोर्या भरता त्या कशा ? आणि इथल्या कारखान्यांत कंपन्यात लागणारा प्रशिक्षित कामगार वर्गतंत्रज्ञ इंजिनियरस , डॉक्टरस आणि दूर कशाला तुमचे स्वत: चे आय ए एस झालेले पी ए अथवा सचिव  कोणत्या न कोणत्या शाळेत शिकतात कि हे ज्ञान त्यांना जन्मत:च प्राप्त असते तुमच्या कोणत्याही कंपनीत अथवा कारखान्यात तयार होणाऱ्या उत्पादनापेक्षा शाळांमध्ये तयार उत्पादन हे निश्चितच महत्वाचे असते. शिक्षणक्षेत्र अनुत्पादक क्षेत्र आहे इतके हास्यास्पद विधान दुसरे नसावे.

           या शाळा प्रामुख्याने खेड्यापाड्यांत ज्या गावात शाळा नाही अशा ठिकाणीच आहेत. जिथे शिक्षणाचा गंध देखील नव्हता तिथे  मागील सुमारे १० वर्षांपासून निस्पृह ज्ञानदानाचा यज्ञ या शाळांनी अव्याहत धगधगता ठेवला आहे. या शाळांमधून मागील दहा वर्षांत हजारो- लाखो विद्यार्थी विद्यार्जन करून बाहेर पडले आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीला हातभार लावत आहेत. तथापि हे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारा इथला शिक्षक मात्र उपेक्षित आणि वंचित राहिला आहे. आज ग्रामीण भागात चालणार्या या शाळांमध्ये काम करणार्या शिक्षकांची मागील दहा वर्षाची मिळकत शून्य आहे म्हटल तर कदाचित अनेकांचा विश्वास बसणार नाही. पण होय हे जळजळीत दाहक वास्तव आहे. या शाळांमध्ये या हजारो शिक्षकांना व हजारो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ रुपयाहि मानधन दिले जात नाही. ऐन उमेदीत हि नोकरी धरली. आज न उद्या पगार चालू होईल या आशेवर दिवस रेटले. आज अनेकांचे संसार आहेत, मुलेबाळे आहेत खर्च वाढले आहेत. ३०-३५-४० वर्षे वये झाली आहेत. आईवडिलांच्या अथवा बायकांच्या जीवावर बोज बनून हे शिक्षक जगत आहेत. आणि डोळ्यांतली आशा विझत चालली आहे. उमेद आता कोसळून पडत आहे. प्रशासनावरचाच नव्हे तर या समाजावरचा, चांगल्या मुल्यावरचा देखील त्यांचा विश्वास उडत चालला आहे.

             बर ज्या शाळांमध्ये हे काम करतात त्या शाळांना धड इमारती नाहीत. पत्र्याच्या अथवा कुडाच्या खोल्यांत वर्ग भरवले जातात. अलीकडच्या- पलीकडच्या वर्गात चाललेल्या गोंधळात कंठशोष करत  शिक्षक अध्यापनाचे कार्य करत असतात. इथे नां फलक धड असतात नां कधी वेळेवर खडू उपलब्ध होतात. अध्यापनाच्या साधनाचे तर नावच नको. एकीकडे शिक्षणाच्या जागतिकीकरणाच्या गप्पा आणि दुसरीकडे हि दुरावस्था असा विरोधाभास फक्त आपल्या देशातच पाहायला मिळू शकतो. 

             पदोपदी अवहेलना, अपमान, वंचना यांना या शिक्षकांना सामोरे जावे लागत आहे. आज ग्रामीण भागात जिथे एका स्त्री मजुराची दिवसाची मिळकत १५० रुपये व महिन्याची मिळकत ४५०० रुपये आहे आणि एका पुरुष मजुराची दिवसाची मिळकत ३५० रुपये व महिन्याची मिळकत १०५०० रुपये आहे तिथे या पदवीधर ,द्विपदवीधर शिक्षकांची दिवसाची तसेच महिन्याची मिळकत शून्य आहे. या देशात गुंजभर तरी न्याय उरला आहे कि नाहीसर्वसामान्य लोकांना कोणी वाली उरला आहे कि नाही ? आयुष्यभराच्या निस्पृह सेवेची फळे या उत्तर आयुष्यात तरी चाखायला मिळणार कि नाही  असा आर्त सवाल या शिक्षकांच्या आयुष्याच्या फलकावर आहे ? शासनाकडे वा तथाकथित लोकप्रतिनिधींकडे याचे उत्तर आहे काय ?