About

Sunday 26 August 2012

आसामी नागरिकांची ससेहोलपट


                      रामायणात एक कथा आहे. प्रभू श्रीरामचंद्र जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा रामावर प्रेम करणारे अनेक अयोध्यावासी जन त्यांच्यासोबत निघाले. अयोध्येच्या सीमेवर आल्यावर श्रीरामप्रभूंनी त्यांना परत जायला सांगितले. त्यावर बरेच लोक परत गेले. काही मात्र गेले नाहीत. १४ वर्षांचा वनवास भोगून रामचंद्र जेव्हा परत आले तेव्हा हे परत न गेलेले लोक त्यांची वाट पाहत तिथेच बसलेले त्यांना आढळले. त्यांनी आपली घरे दारे सोडून तिथेच मुक्काम ठोकला होता. प्रभू श्रीरामचंद्र त्यांच्यावर, त्यांच्या श्रद्धेवर, त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना एक वर दिला कि एक दिवस इथे तुमचेही युग येईल.

     ते लोक होते तृतीयपंथी. इथ भारतात मागील महिना-पंधरवड्यातला घटनाक्रम पाहिला कि हि दंतकथा खरी तर नाहीये नं अशी शंका आल्यावाचून राहत नाही. एक एक निंदनीय घटना आणि सरकार आणि एकूणच प्रशासन व्यवस्थेच्या क्षमतेवर आणि हेतूवर शंका उपस्थित करणारी आणि खरच हे षंढयुग तर नव्हे असा विकल्प मनात निर्माण करणारी आहे.

     या घटनांच्या मालिकेची सुरवात आसामपासून झाली. तिथ बांगलादेशी मुस्लीम तिथल्या स्थानिक आदिवासींना त्यांच्या स्वत:च्या हक्काच्या प्रदेशातून हुसकून लावण्यासाठी जिहाद पुकारतात काय आणि सरकार त्यावर केवळ बघ्याची भूमिका घेत स्वस्थ बसते काय ? इतकी सगळी यंत्रणा असून या बांगलादेशी राष्ट्र्द्रोह्यांना आवर घालणे त्यांना अशक्य होते काय ? हा सगळा प्रकारच अनाकलनीय आहे. मुळात इतक्या प्रचंड प्रमाणात बांगलादेशी घुसखोर इथ घुसखोरी करत होते तेव्हा हे सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा काय करत होती हा खरा प्रश्न आहे.

     आणि त्यानंतर झालेले एस एम एस सत्र तर देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलीन करणारे आणि एकूणच व्यवस्थेच्या देशाप्रती असणाऱ्या निष्ठेबद्दल प्रश्न उपस्थित करणारे होते. हे एसेमेस पाठवणारे जे कोणी होते त्यांना देशभर विखुरलेल्या नेमक्या आसामी लोकांचेच नंबर कसे मिळाले ? दुरध्वनी कंपन्या यात सामील असल्याशिवाय हे शक्य नाही कारण कायद्याने कोणत्याही क्रमांक धारकाचा नंबर हा ती दूरध्वनी सेवा पुरवणारी कंपनी आणि तो क्रमांक धारक ग्राहक यांच्यातल्या गोपनीय कराराचा भाग असतो. तो त्रयस्थ व्यक्तीला कळणे शक्य नाही. अर्थात दूरध्वनी कंपन्या यात गुंतलेल्या नसतील तोवर. या आसामी नागरिकांचे दूरध्वनी क्रमांक हस्तगत करून त्यांना हा पवित्र महिना संपल्यावर तुम्हाला ठार करण्यात येईल, तुमचे घरदार सोडून पळून जा अशा आशयाच्या धमक्या मिळत होत्या.



     हे एसेमेस कसे येत आहेत कोठून येत आहेत याचा काही केल्या आपल्या गुप्तचर यंत्रणांना तपास लागेना, सीबीआयने तर या एसेमेस संबंधी माहिती देणाऱ्याला लाखो रुपयाचे इनाम जाहीर केले. इथेच यांची कार्यक्षमता(?) उघडकिला आली. आय बी, सीबीआय , ra^ अशा कोट्यावधींचा निधी ज्यांच्यावर खर्च केला जातो त्या संस्थांनी हात टेकल्यावर अखेर खाजगी नेट तज्ञांची मदत घेऊन या एसेमेस चा माग काढण्यात आला तेव्हा हे एसेमेस पाकिस्तानातून पाठविल्याचे उघडकीला आले.    

     या वेळी एकही पक्ष किंवा नेता संघटना या आसामी बांधवांनी सहाय्य देण्यास पुढे आली नाही. त्यांच्या जखमांवर फुंकर कोणी घातली नाही. किंवा हा भारत देश तुमचा आहे. इथ वाटेल तिथ तुम्ही सुखाने नांदू शकता, राहू शकता असे त्यांना छातीठोकपणे सांगणारा एकही नेता पुढे आला नाही. आसामी नागरिकांचा देशात कुठेही सुखनैव वास्तव्य करण्याचा घटनात्मक अधिकार हिरावून घेण्यात आला. आणि एकच अभूतपूर्व पळापळ सुरु झाली. अशातच या आसामी नागरिकांवर दुर्दैवाचा आणखी एक घाला बसला. १९ Aa^gasT ला बंगळूरहून गुवाहटी एक्सप्रेसने आसामला स्वगृही निघालेल्या या आसामी नागरिकांना अज्ञात(?) देशद्रोह्यांनी लुटले. त्यांना बेदम मारहाण केली आणि नंतर त्यांपैकी नउ जणांना धावत्या रेल्वेतून बाहेर फेकले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सातजण गंभीर जखमी आहेत.

     तिकडे आसामात बोडो नागरिकांवर अन्याय आणि अत्याचारांचा कळस आणि इथे हि परिस्थिती. या बिचाऱ्या आसामी देशबांधवांवर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करणे त्यांना धीर देणे, त्यांच्या जीवित व वित्ताची हमी घेणे तर दूरच राहो पण या सर्व अत्याचारांच्या बातम्या दडपन्यातच सरकार आपला वेळ आणि श्रम खर्ची घालत होते. कारण काय तर म्हणे असंतोष भडकू नये. या षंढ प्रशासनव्यवस्थेने एकूणच या आसामी बांधवांना वाऱ्यावर सोडले हेच खरे.....!!

                                                ( क्रमश:)

                                      सुहास भुसे
                                       (२६-८-२०१२)   

3 comments:

  1. इथ भारतात मागील महिना-पंधरवड्यातला घटनाक्रम पाहिला कि हि दंतकथा खरी तर नाहीये नं अशी शंका आल्यावाचून राहत नाही
    hi danta katha nahi , ha apala itihas ahe. ramachya asthitwache anek purave ahet. pan tyachya atishyokti mule to khota vatato. eg. hanumanache havet uadane. pan mi eka kirtanat aikale ahe ki to havet udat nase tar apalya afat shaktichya joravar khup dhavat yeun to udi marayacha. like that hollywood film hulk.

    ReplyDelete
  2. बंधू Sann
    ..
    मित्र मला रामाच्या अस्तित्वाबाबत काहीही शंका नाहीये .
    रामायण खरच घडल असाव असे दर्शवणारे खूप पुरावे उपलब्ध होत आहेत .
    उदा . रावणा कडे जे पुष्पक विमान होते ...त्यात बसून सीता आणि राम अयोध्येला परत आले .
    त्यावेळी राम आणि सीता यांच्यात जो संवाद झाला ...सीतेने पाहिलेल्या दृश्याचे जे वर्णन केले आहे ते वर्णन जमिनीवरून प्रत्यक्ष आकाशात गेल्याशिवाय करणे अशक्य आहे इतके हुबेहूब वर्णन तिने केले आहे .
    शिवाय राम सेतू तर आहेच ..
    ..
    दंत कथा मि वरती दिलेल्या षंढ लोकांच्या कथेला म्हटले आहे न कि रामायणाला .

    ReplyDelete