About

Thursday 6 September 2012

फेसबुक आणि जातीयवाद

     फेसबुकवर अनेक समूह आहेत. यापैकी बहुतांश समूहातून चक्कर मारल्यास एक धक्कादायक चित्र समोर येते. बहुतांश समूहात जातीभेद अगदी पराकोटीला पोहचलेला दिसून येतो. एकमेकांच्या जातीपातीवर टीका करूनच हि मंडळी थांबत नाहीत. आपण एका सोशल कम्युनिटी साईट वर आहोत याचे कोणतेही भान न ठेवता अर्वाच्च शिवीगाळ केली जाते. एखाद्याने एका विशिष्ट जातीवर टिपण्णी केली कि त्या जातीचे इतर सदस्य भावनाप्रधान होऊन त्या वादात ओढले जातात आणि तेही आपल्या जातभाईची सारासार विचार न करता बाजू घेऊन समोरच्या व्यक्तीला शिवीगाळ करू लागतात. खूप दिवसांपासून अनेक समूहांत हे चित्र वारंवार पाहत आहे. अशा गोष्टी पहिल्या कि खूप निराश वाटायला लागत. समाज कुठे भरकटत आहे ? अर्थात फेसबुक म्हणजे काही समाज नव्हे. किंवा ते समाजाचे एक प्रातिनिधिक रूपही म्हणता येणार नाही. फेसबुक वापरणारे बहुधा कॉलेज ला जाणारे युवक- युवती आणि ज्यांना सोशल सर्फिंग ची आवड आहे असे लोक असतात. आता यातील अनेक जन उच्च शिक्षित असतात. अडाणी किंवा अशिक्षित माणसाने फेसबुक वापरण्याचा प्रश्नच येत नाही. या दृष्टीने पाहीले तर फेसबुक हा आजच्या युवा पिढीचा आणि बुद्धीजीवी समाजाचा आरसा म्हटल तर फारस वावग ठरणार नाही.

        
          आता अशा बुद्धीजीवी लोकांमध्ये इतक्या हिडीस प्रकारे हे जातीयवादाचे बीज या समूहांच्या माध्यमातून रोवले जात आहे हे चिंताजनक आहे. अशा समूहामध्ये वावरणारा जातीभेद विरोधी व्यक्तीही अशा वातावरणात राहून काही काळाने जातीयवादी होण्याची शक्यता दाट ......किंबहुना अनेक जन असे जातीयवादी बनत आहेत या समूहांच्या माध्यमातून. बहुतांश ब्राम्हण आणि दलित हे दोन वर्ग यात टार्गेट होत आहेत. विशेषत: यात ठळकपणे उठून दिसते ते एका संघटनेचे नाव ...संभाजी ब्रिगेड. अनेक खरे खोटे आयडी वापरणारे ब्रिगेडी कार्यकर्ते फेसबुकवर कार्यरत आहेत. किंबहुना यातील अनेकांना खास पगार देऊन या कामासाठी नेमले आहे कि काय अशी शंका यावी इतक्या सातत्यपूर्ण रीतीने हे लोक इथे जातीवाद पसरवना-या पोस्ट करत असतात. यांचे ठरलेले एकच काम. इतिहासाची पुरावाहीन मोडतोड आणि ब्राम्हणद्वेष. इतिहासकालीन ब्राम्हणांची पापे आता सुशिक्षित समाजापासून लपून राहिलेली नाहीत. तथापि काही धर्ममार्तंडांच्या पापांसाठी सर्वच ब्राम्हणांना दोषी धरणे कितपत सयुक्तिक आहे. आणि या मध्ययुगीन घटनांचे खापर सध्याच्या ब्राम्हण समाजावर फोडणे तर अतिशय निंदनीय आहे. सतत होणा-या या बोच-या प्रचारामुळे काही ब्राम्हण कृष्णाजी भास्कर सारख्या दुष्मनाचे समर्थन करताना दिसले तर यात दोष कोणाला द्यायचा ?
        
           या भीषण प्रचाराचे टार्गेट सावरकरांसारख्या पराकोटीच्या देशभक्त नेत्याला केले जाते तेव्हा विषाद वाटतो. टीका करावी पण ती कोणत्या हीन पातळीपर्यंत ? सावरकरांच्या सागरातील त्या सुप्रसिद्ध उडीमुळे त्यांचे नाव क्रांतिकारकांच्या इतिहासात अजरामर झाले ती उडी त्यांनी संडासाच्या खिडकीतून मारली होती म्हणून सावरकरांचे वर्णन संडासवीर केशरी पुठ्ठा असे केले जाते हि कुठली संस्कृती आहे ? हि कसली देशभक्ती आहे ? ही कसली इतिहासाची पुनरर्चना आहे ?
        

           या जातीभेदाने हिंदू धर्माचे प्राचीन काळापासून अपरिमित नुकसान केले आहे. सध्याच्या समाजात ज्या काही समस्या आहेत त्या सर्वांची मुळे या जातीभेदात आहेत असे माझे मत आहे. या परस्पर विद्वेषाने हिंदू समुदायात कधी म्हणावी अशी एकजूट होऊ शकली नाही. याचा फायदा परकीय आक्रमकांनी घेतला. सध्याची परिस्थिती पाहता या इतिहासाची पुनुरावृत्ती होऊ नये इतकीच हिंदू धर्माचा एक सच्चा पाईक म्हणून माफक अपेक्षा !! 





 

12 comments:

  1. शर्म से कहो हम हिंदू है.आताच खरा बहुजन वर्ग जागा होत आहे त्यात सोशल नेटवर्किंग चाही हातभार लागत आहे.

    ReplyDelete
  2. आपली कमेंट अज्ञानाधारित आहे .
    आपण हिंदू धर्माला दोषी धरू शकत नाहीत .
    बहुजन समाजावर अन्याय हिंदू धर्माने नाही तर तथाकथित धर्माच्या स्वयं घोषित ठेकेदारांनी केला आहे .
    आपण माझी हिंदू धर्म : एक मुक्त चिंतन ही लेखमाला अवश्य वाचा .

    ReplyDelete
  3. श्री. भिसे तुम्ही अज्ञानी आहात. फेसबुकवर ब्राह्मणांचे closed ग्रुप आहेत. त्यावर काय कारवाया चालतात, याची माहिती आपणास नाही. किन्वा आपण मुद्दाम अज्ञानी असल्याचे दाखवित असावेत.

    सावरकरांची उडी तुम्हाला माहिती आहे, पण त्यांनी बहुजनांच्या नेत्यांवर जी चिखलफेक केली आहे, ती तुम्हाला माहिती नाही. सावरकरांनी शिवाजी महाराजांना दुय्यम ठरविले आहे, भोसल्यांपेक्षा पेशव्यांना मोठे केले आहे. याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही.

    आधी नीट वाचन करा आणि मग लिहा.

    ReplyDelete
  4. श्री. भिसे,
    मुळात ब्राह्मणांनीच इतिहासाची मोडतोड केलेली आहे, पण त्याबाबत तुम्ही अज्ञानी आहात. ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या खोट्या गोष्टींचे तुम्ही बळी आहात. याचे एक ज्वलंत उदाहरण तुमच्या ब्लॉगवरच दिसून येते. तुमच्या ब्लॉगचे डिस्क्रिप्शन म्हणून तुम्ही जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या ओळी वापरलेल्या आहेत. ही ओळ तुम्ही ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी' अशी लिहिली आहे. ही मूळ ओळ ‘भले तरी देऊ गांडीची लंगोटी' अशी आहे. वारक-यांच्या गाथ्यात ती आजही तशीच लिहिली जाते. पण विष्णूशास्त्री चिपळूणकर नावाच्या एका ब्राह्मणाला ही ओळ अश्लिल वाटली. त्याने तिच्यात बदल करून ‘कांसेची लंगोटी' असे केले. मूळ ओळ बाजूला पडून ही चुकीची ओळ त्यामुळे रूढ झाली. तुकोबांना अश्लिल म्हणणारा हा ब्राह्मण तुम्हाला अर्थातच माहिती नसणार.

    ReplyDelete
  5. अनामिक
    .
    [श्री. भिसे तुम्ही अज्ञानी आहात. फेसबुकवर ब्राह्मणांचे closed ग्रुप आहेत. त्यावर काय कारवाया चालतात, याची माहिती आपणास नाही. किन्वा आपण मुद्दाम अज्ञानी असल्याचे दाखवित असावेत. ]
    .
    आपण आम्हास अज्ञानी ठरवताना थोडी घाई आणि अतिरेक करत आहात असे वाटते.
    ब्राह्मणांच्या क्लोज्ड आणि ओपन ग्रुपवर काय चालते याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे .
    आम्ही हा लेख सर्वजातीय समुहावर जे चालते त्यावर लिहिला आहे .
    आणि काहीही असले तरी तुम्ही ब्राह्मण समाजाविरुद्ध जो विषारी प्रचार करता आणि जी भाषा वापरता त्यामुळे अनेकांना मराठा समाजावर तोंडसुख घेण्याची संधी मिळते .
    आपल्या असल्या प्रचाराचा उलट परिणाम होऊन उलट जे ब्राह्मण समता वादी विचारांचे आहेत किंवा जातीभेद विरोधी आहेत ते देखील सुरक्षेसाठी अशा जातीयवादी ब्राह्मणांच्या कंपूत शिरत आहेत .
    ..
    [ मुळात ब्राह्मणांनीच इतिहासाची मोडतोड केलेली आहे, पण त्याबाबत तुम्ही अज्ञानी आहात. ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या खोट्या गोष्टींचे तुम्ही बळी आहात.]
    .
    ब्राह्मणांनी केलेल्या इतिहासाच्या मोडतोडी बद्दल आम्हाला पूर्ण कल्पना आहे .
    हिंदू धर्माचा खराखुरा इतिहास लिहिण्याचा आम्ही या ब्लॉग वरून प्रयत्न करणार आहोत
    हिंदू धर्मातील अनिष्ट गोष्टींचा समाचार आणि बलस्थानांचा उदो उदो आमच्या हिंदू धर्म एक मुक्त चिंतन लेखमालेत वाचत राहा .
    .
    [ तुकोबांना अश्लिल म्हणणारा हा ब्राह्मण तुम्हाला अर्थातच माहिती नसणार.]
    .
    प्रत्येक गोष्ट स्वत:लाच ठाऊक आहे असा आपला दुराग्रह दिसतो .
    अर्थात आम्ही तुकोबांचे भक्त आणि अनुयायी असल्याने आम्हाला हा बदल ज्ञात आहे आणि जवळ जवळ प्रत्येक तुकोबा भक्ताला तो ज्ञात असतो .
    तुकोबांच्या अभंगांत असे अनेक शब्द आहेत ,
    गांड रांडा वगैरे
    अर्थात तो समाज जुन्या काळातील होता त्यावेळच्या अश्लील तेच्या परिभाषा निराळ्या होत्या .
    लोक सहज बोलताना असे अनेक शब्द वापरात असत .
    पण सध्या तो शब्द इथे जसाच्या तसा वापरणे आम्हाला योग्य वाटले नाही (अर्थात वैयक्तिक पातळीवर )
    आम्ही मूळ शब्द न वापरता विश्नुशास्त्रींनी बदल केलेला शब्द वापरला आहे हा आपला आक्षेप मि मान्य करतो.

    ReplyDelete
  6. श्री. भुसे,
    तुम्ही लिहिलेय की - "तुम्ही ब्राह्मण समाजाविरुद्ध जो विषारी प्रचार करता आणि जी भाषा वापरता त्यामुळे अनेकांना मराठा समाजावर तोंडसुख घेण्याची संधी मिळते..."

    तुम्ही वस्तुस्थिती उलटी करून सांगत आहात. ब्राह्मणांबद्दल आम्ही केव्हापासून असे बोलत, लिहित आहोत? जेम्स लेन प्रकरण झालयनंतर ब्राह्मणांच्या विरोधात लाट आलेली आहे. त्या आधी कोणीही ब्राह्मणांना दुषणे देत नव्हते. पण म्हणून ब्राह्मण समाज मराठ्यांबद्दल चांगले बोलत, लिहित होता का? नाही. शिवाजी महाराजांच्या काळापासूनच ब्राह्मण लोक मराठ्यांच्या विरोधात गरळ ओकत आहेत. त्यांनी महाराजांची बदनामी केली. संभाजीराजांना बदफैली ठरविले. त्याच्या आधी १ हजार वर्षांपूर्वी ब्राह्मणांनी वारकरी संतांचा छळ केला. ज्ञानेश्वरांपासून तुकोबा, बहिणाबाईपर्यंत सर्वांना ब्राह्मणांनीच छळले.

    त्यामुळे "आम्ही लिहितो बोलतो, म्हणून ब्राह्मण लोक मराठ्यांवर तोंड सुख घेतात", हे तुमचे म्हणणे चूक आहे. आम्ही ब्राह्मणांची पूजा केली, तरी ते आम्हाला वाईटच म्हणणार आहेत.

    इतिहासातील ब्राह्मणांच्या चुकांची शिक्षा आताच्या ब्राह्मणांना का? हा तुमचा प्रश्न बघून मला हसू आले. जेम्स लेन प्रकरण इतिहासातील आहे असे तुम्हाला वाटते की काय? ह.मो. मराठे याने महाराजांवर गरळ ओकली, त्यालाही तुम्ही इतिहासातील घटना म्हणता का? ब्राह्मण लोक मराठ्यांना आपले शत्रू समजतात हे ह.मो. मराठे याला माहिती आहे. त्यामुळेच त्याने ब्राह्मण मते मिळविण्यासाठी महाराजांची बदनामी केली, हे उघड आहे. तरीही तुम्ही ब्राह्मणांची बाजू घेता. मग तुम्हाला अडाणी नाही, तर काय शहाणे म्हणायचे?

    जरा डोळे उघडा आणि सत्य समजून घ्या.

    ReplyDelete
  7. ब्राह्मण अजूनही शिवरायांची बदनामी करीत आहे. बदनामी किती खालच्या पातळीवरची असू शकते, हे जाणून घ्या. चाफळच्या रामदासी मठाचे साहित्य एकदा वाचा. ही पुस्तके वाचल्यानंतर या देशातील प्रत्येक ब्राह्मण कापून काढला पाहिजे, असे तुमचे मत बनेल.

    ReplyDelete
  8. @anonymous - udaharan dya chafal chya mathachae. ugach havet golibaar nako

    ReplyDelete
  9. महोदय अनामिक
    [ इतिहासातील ब्राह्मणांच्या चुकांची शिक्षा आताच्या ब्राह्मणांना का? हा तुमचा प्रश्न बघून मला हसू आले. जेम्स लेन प्रकरण इतिहासातील आहे असे तुम्हाला वाटते की काय? ]
    .
    खर तर मि हिंदू एकतेचा पुरस्कर्ता आहे .
    त्यामुळे मि जातीय वा विद्वेषी लिखाण पूर्वी फारसे वाचत नसे .
    तथापि हा लेख लिहिल्यानंतरच्या काळात माझ्या वाचनात बरेचसे आपणास इथे अभिप्रेत आहे असे लिखाण आले .
    फेसबुक, ब्लॉगर सारख्या सोशल साईट वर देखील काही दुर्दैवी अनुभव आले .
    आपले बरेचसे म्हणणे खरे आहे .
    .
    [तुम्ही वस्तुस्थिती उलटी करून सांगत आहात. ब्राह्मणांबद्दल आम्ही केव्हापासून असे बोलत, लिहित आहोत? जेम्स लेन प्रकरण झालयनंतर ब्राह्मणांच्या विरोधात लाट आलेली आहे. त्या आधी कोणीही ब्राह्मणांना दुषणे देत नव्हते. पण म्हणून ब्राह्मण समाज मराठ्यांबद्दल चांगले बोलत, लिहित होता का? नाही. ]
    .
    आपले म्हणणे बिनशर्त मान्य .
    .
    [मुळात ब्राह्मणांनीच इतिहासाची मोडतोड केलेली आहे, पण त्याबाबत तुम्ही अज्ञानी आहात]
    .
    माझे या लेखानंतरचे लेख आपण वाचावेत . विशेषत: चार्वाक दर्शनावरचा लेख .कर्मकांडा वरचे लेख .
    .
    मि जो हा लेख लिहिला आहे तो विखारी जातीय प्रचाराविषयी आहे बराचसा .
    शेंडी जाळो अभियान किंवा ब्राह्मणांच्या बायकान्विषयी जे लिखाण केले जाते ते कोणाही समाजाभिमुख माणसास खटकेल असेच आहे बाकी तो कोणत्याही जातीचा असो .
    .
    सावरकरांविषयी मि आजपर्यंत तरी चांगलच वाचल आहे .
    त्यांच्या कथित वर्नाभिमानी भूमिकेविषयी मि अपरिचित आहे .
    मी यासंदर्भात अधिक माहिती घेत आहे . वाचनस्रोत शोधत आहे .

    ReplyDelete
    Replies
    1. श्री. भिसे साहेब,
      तुमचा दृष्टी निकोप आहे, याची खात्री पटली. आनंदही वाटला.

      खटकलेल्या काही गोष्टी मी तुमच्या निदर्शनास आणून दिल्या. त्या तुम्ही फार खळखळ न करता, मान्य केल्या. यातून तुमच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. ख-याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणण्याचे धारिष्ट्य तुमच्यात आहे, हे दिसून आले. आपले म्हणणे चुकीचे असले, तरी ते रेटण्याकडेच लोकांचा कल असतो. विशेषत: लेखकांमध्ये हा अहंभाव फार असतो. तुम्ही त्याला अपवाद आहात.

      अनिता पाटील ताई यांच्या ब्लॉगवर तुमच्या ब्लॉगची लिन्क मिळाली. तुम्ही ब्लॉगसाठी निवडलेले विषय वेगळे आहेत, तसेच तुमची शैलीही निकोप आहे. त्यामुळे तुमच्या ब्लॉगने विशेष लक्ष वेधून घेतले. अनिता ताई यांच्या ब्लॉगप्रमाणेच तुमचा ब्लॉगही लवकर लोकप्रिय होईल, यात शंका वाटत नाही. तुम्हाला मनापासून शुभेच्छा.

      तुम्ही सावरकरांचा विषय काढला, म्हणून येथे नमुद करू इच्छितो की, अनिता ताइंच्या ब्लॉगवर सावरकरांवर एक चांगला लेख माझ्या वाचनात आला होता. तो तुम्ही अवश्य वाचा.

      जाता जाता एक सूचना करू इच्छितो. ब्लॉगच्या कॅचलाईनमधील तुकोबांचा अभंग मूळ स्वरूपात द्या. संतांच्या ओळी बदलण्याचे पाप चिपळूणकरांनी केले. अशा पापापासून तुमच्यासारख्या सूज्ञ लेखकाने दूर राहावे, असे मनापासून वाटते. आणखी असे की, ब्लॉगवरील उत्तम लेखांचे पुस्तक काढा.

      तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा.

      Delete
    2. धन्यवाद अनामिक
      आपण थोडीशी जास्तच स्तुती केली आमची ..
      एखादी अनवधानाने घडलेली चुकीची गोष्ट कोणी निदर्शनास आणून दिली तर ती मान्य करण्यात कसला कमीपणा आलाय ?
      मी आधीच स्पष्ट केले आहे कि आपल्या परखड प्रतिक्रियेचा मला राग आला नाही .
      उलट अश्या वादविवादांमधून आपल्या पायाभूत संकल्पना स्पष्ट व्हायला मदत होते .
      ..
      आमची विषयांची निवड आणि शैली यांच्या आपण केलेल्या स्तुतीने लेखनास नवे बळ मिळेल.
      अनिता ताईंचा ब्लॉग वाचला मी.
      त्यांनी केलेली बरीचशी विधाने आणि त्यांचे बहुतेक लेख पुराव्यावर आधारित आहेत .
      छान माहितीपूर्ण ब्लॉग आहे त्यांचा .
      आपण सुचवलेला लेख मी अवश्य वाचेन तिथ .
      ..
      आणि कॅचलाईन संदर्भात आपण केलेल्या सूचनेवर मी विचार करत आहे .
      ..
      जाता जाता ...आपण आमच्या नाम्मोलेखात थोडीशी चूक करत आहात " भुसे " अस आडनाव आहे आमच .
      ..
      आणि आपलेही विचार आवडले .
      आपल्याशी ओळख वाढवायला आवडेल .
      नावानिशी संपर्क केल्यास आनंदच वाटेल .

      Delete
  10. तुमचे वादविवाद आणि त्यातील सत्य जाणून खात्री पटली सद्विवेक जगा ठेवून वागनारि मंडळी अजुन आहेत धन्यवाद तुम्हादोघाविचारवंतांचे

    ReplyDelete