About

Saturday 8 September 2012

अ. भा. म.साहित्य संमेलन आणि जातीपातीचे राजकारण

अखिल भारतीय साहित्य संमेलनात होणारे वाद काही नवे नाहीत. तथापि या वेळी होऊ घातलेल्या साहित्य संमेलनात उपस्थित झालेला वाद हा अखिल मराठी सारस्वताला काळीमा फासणारा आहे. ह मो मराठे यांनी एक वादग्रस्त पत्रक प्रसिद्ध करून या वादास सुरवात केली आहे. निवडणूक प्रचारात उसळून वर येणारा जात हा मुद्दा राजकारणात नवा नाही. तथापि निवडणूक आचारसंहितेने त्यावर काही बंधने घातली आहेत. पण अशा जातीय राजकारणावर ही स्वत:ला सुसंस्कृत म्हणवणारी साहित्यिक मंडळी नेहमी टीकेची झोड उठवत असतात. आता खुद्द साहित्य संमेलनात असा प्रचार खुद्द या साहित्यिकांनीच करावा हि दुर्दैवाची गोष्ट आहे.

   
ह मो मराठेंच हे निवडणूक पत्रक अतिशय किळसवाणे गलिच्छ मुद्दे आणि जातीयवादी विखाराने भरलेले आहे. लोक अनेक गोष्टींचा स्वत:च्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतात. ह मो नी इथ जातीला आपले हत्यार बनवले आहे. एकूण मतदारांमध्ये ४०% लोक ब्राम्हण आहेत असे ह मो सांगत असले तरी साधारण ५५ ते ६० टक्के मतदार ब्राम्हण आहेत असा अनेक जाणकारांचा अंदाज आहे. आता या बहुसंख्य वर्गाला जातीच्या कारणावरून आणि ते हि लपून व छुपे नाही अगदी उघड आणि उजळ माथ्याने ह मो नी मत मागितले आहे. समस्त ब्राम्हण समाजाचे आपणच एकटे तारणहार आहोत, संभाजी ब्रिगेड आणि तत्सम संघटनांकडून होणा-या विखारी प्रचारापासून आपणच ब्राम्हण समाजाचे रक्षण करू शकतो अशी स्वत:ची भ्रामक छबी या पत्रकाद्वारे त्यांनी उभी केली आहे.

आणि सगळ्यात किळसवाणा मुद्दा म्हणजे जेम्स लेन चे त्यांनी केलेल निर्लज्ज समर्थन. केवळ समर्थनच करून ह मो थांबले नाहीत तर आपल्या पत्रकात जेम्स लेनचे ते वादग्रस्त उतारे जसेच्या तसे उधृक्त करून त्यांनी निर्लज्जपणाची परमावधी गाठली आहे. या कळीच्या मुद्द्याला तोंड फोडून आपण ब्राम्हण समाजाची मते खेचू असे त्यांना वाटत असेल तर सध्याच्या समाजातला जातीयवाद कोणत्या थराला गेला आहे ते कळून येण्यासारखे आहे. ह मो यांना समाजातील अनेक थरातून विरोध होत आहे. संभाजी ब्रिगेड ने तर त्यांच्याविरुद्ध रान उठवले आहे. ह मो ही या विरोधाला न जुमानता ही निवडणूक लढवतील कि नाही, लढवली तर ते त्यात विजयी होतील कि नाही हा पुढचा भाग आहे. पण त्यांच्या या पत्रकाने खूप नवे प्रश्न उभे केले आहेत.

मुळात ह मो ना असे का वाटावे कि जेम्स लेन च्या मुद्द्यावरून आपण ब्राम्हण समाजाची मते खेचू ? जेम्स लेन च्या मुद्द्याचे जे समर्थन करतात ते या छत्रपतींच्या पुण्य पावन महाराष्ट्रात राहण्यास लायक तरी आहेत का ? राजमाता, माहेरी सासरी कुलवंत घराण्यातल्या जिजाऊवर, साक्षात महाराष्ट्राची माता असणा-या, समस्त शिवभक्तांना आदिशक्ती जगदंबेच्या ठिकाणी असणा-या जिजाऊ च्या चारित्र्यावर संशय घेणा-या जेम्स लेनच निर्लज्ज समर्थन करणारांना स्वत:च्या सख्ख्या मातेच्या चारित्र्याची तर किमान खात्री आहे ना ? स्वत:च्या मुठभर स्वार्थासाठी आपण किती लोकांच्या श्रद्धा पायदळी तुडवत आहोत याची या तथाकथित सुसंस्कृत समजल्या जाणा-या हरामखोरांना जाणीव आहे का ?
 
पुरोगामी म्हणवल्या जाणा-या महाराष्ट्रात चालवलेले हे जातीयवादाच थैमान आपण स्वस्थ बसून पहायचं का इतकाच रोखठोक सवाल आमच्या वाचकांना करून या प्रसंगी पुर करतो.

जय भवानी...!! जय जिजाऊ ..!! जय शिवाजी ...!!    

    







ह  मो मराठे यांच्या लेखातील आम्हाला खटकलेले मुद्दे .

१) ह मो यांनी ब्राम्हण मतदार डोळ्यापुढे ठेऊन उघड उघड जातीच्या आधारावर मागितलेली मते. मी ब्राम्हण आहे ब्राम्हणांनी मलाच मत दिले पाहिजे अशी थोडक्यात हमोंची भूमिका आहे. अशी जातीयवादी भूमिका लोकशाहीविरोधी आहे.

२) ह मो यांनी लेम्स लेन चे आक्षेपार्ह्य विधान जसेच्या तसे उधृक्त करून या आधी अनेकांनी केलेल्या चुकीची पुनरावृत्ती 

३)जेम्स लेन आणि ब्राम्हण यांचा बादरायण संबंध जोडण्याचा केलेला प्रयत्न  (इथे आम्ही मुद्दाम असे म्हणत आहोत कारण हमोना आपल्या निवडणूक पत्रकात जेम्स लेनचा उल्लेख करण्याची निकड भासली आहे ब्राम्हण मते खेचण्यासाठी)

४) जेम्स लेन ला कोर्टाने निर्दोष मुक्त केले आहे असे सांगून त्याचे निर्दोषत्व ठासून सांगण्याचा केलेला निंदनीय प्रयत्न .

    भलेही कोर्ट किंवा हमोंना  जेम्स लेन निर्दोष वाटत असेल. इथले कोटी कोटी शिवभक्त जेम्स लेनला कधीही माफ करणार नाहीत. त्यांच्या भावनांना निष्कारण स्वत:च्या स्वार्थाची पोळी भाजण्यासाठी कोणी हात घालत असेल तर त्याला आमचा मराठी बाणा आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही.

हमोंच्या लेखातील सर्वात जास्त खटकणारा भाग 

 

10 comments:

  1. खूप खूप धन्यवाद प्रतिभाजी ..
    येत राहा वाचत राहा.

    ReplyDelete
  2. Kamal aahe ya lokanchi, Ajunhi jatiywad chaluch aahe,
    asha ritine kharech samaj ghadvyala madat hoil ka, navhe
    to jastach bighadla jail, arthat aajkalchi pidhi ya
    asha prkarchya jatiyawadakade Durlaksha kartil,hi asha aahe

    ReplyDelete
  3. माझ्या मनातल काही
    आपण अगदी योग्य बोललात
    आजकालच्या पिढीने अशा जातीय वादात न अडकता अशा जातीयवाद्यांचे पर्दाफाश करायला हवेत.

    ReplyDelete
  4. ह मो सारखे निर्लज्य माणसाचा पाठीराखा कोहम सारखा निर्लज्यच असणार.

    ReplyDelete
  5. खर आहे आपल
    अश्या जातीयवादी माणसांची आम्हाला फार चीड येते
    हिंदू समाजात फुट फाडून धर्म कमजोर करत आहेत ही माणसे ....!!

    ReplyDelete
  6. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  7. ह. मो. मराठे ह्यांची चूक झाली हे निश्चित. जेम्स लेन ला ना कोर्टनी निर्दोष मानले आहे ना त्याला महाराष्ट्रातले कोणीही माफ करेल (ब्राह्मणांसकट). ह. मो. ना जर त्यांचे ब्राह्मणांसाठी केलेले काम नुसते लिहायचे असते तरी चालले असते पण त्याच्यात त्यांनी जेम्स लेन चा उल्लेख टाळायला हवा होता. शिवाय त्याची निर्दोष मुक्तता केली हा तर चुकीचा प्रचार आहे. बाकी त्यांचा दृष्टीकोन कळू शकतो पण लिखाणाचे समर्थन करता येत नाही.

    ReplyDelete
  8. केची जी
    जेम्स लेन चा उल्लेख तर अनाठायी आणि संतापजनक होताच शिवाय उघड उघड जातीच्या आधारावर मते मागणे हि गोष्ट तर निव्वळ निंदनीय आहे.
    ह मोंनी आजपर्यंत जी कमावली होती ती त्यांनी या कृतीने सगळी घालवली आहे असे आमचे स्पष्ट मत आहे .
    ..
    आणि धन्यवाद शिवाजीराव .....!!

    ReplyDelete