About

Monday 20 July 2015

हल्ला की वैचारिक मुस्कटदाबी ?



काल सांगलीत झालेल्या शिवसन्मान जागर परिषदेवर संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून जितेंद आव्हाड यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. कालपासून चेह्रापुस्तीकेवर याविषयी उलट सुलट पोस्ट चा पाउस पडतोय. आव्हाडांना फोडला, तोडला, अडला, नडला वगैरे भाषेत. आता या पोस्ट खऱ्या आहेत असे गृहीत धरू. संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांवर हल्ला करून आव्हाडांना मारले. तिथल्या स्टेजवरील सन्माननीय लोकांना मारले. त्यांची गाडी फोडली वगैरे. यात समर्थन करण्यासारख काय आहे ? किंवा अभिमानाने सांगण्यासारखे काय आहे? जितेंद्र आव्हाड हे त्यांची बाजू ती चूक असेल किंवा बरोबर असेल...लोकशाही मार्गाने मांडत आहेत. त्यांच्यावर हल्ला करणे हा मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न नाही का ? कि हा प्रकार म्हणजे त्यांच्या विचारांचा सामना विचाराने करता येत नाही या पराभूत मानसिकतेतून झाला आहे ? जितेंद्र आव्हाड हे खरेच बोलत आहेत याचे प्रमाणपत्र तर नव्हे ना हे ?



अश्याच पोस्ट जेव्हा दाभोळकर आणि पानसरे यांचा नृशंस भ्याड खून करण्यात आला (कि वध ?) तेव्हाही पडत होत्या. त्याचे समर्थन करणारे आणि कालच्या घटनेचे समर्थन करणारे एकाच मानसिकतेचे लोक आहेत. किती दिवस चालणार आहे हि ऐतिहासिक मुस्कटदाबी अजून ? त्यावेळेसही आव्हाडांना धमक्या दिल्या जात होत्या. आता तिसरा नंबर आव्हाडांचा अश्या स्वरूपाच्या पोस्टही काही लोक फेसबुकवर टाकत होते. आणि दाभोळकर पानसरे आव्हाड यांचे फोटो एका ओळीत..दाभोळकर पानसरे यांच्या फोटोवर एलीमिनेटेड च्या खुणा व आव्हाडांच्या फोटोवर प्रश्नचिन्ह हा प्रकारही अनेकांनी पाहिला असेल.

प्रश्न कोणाची बाजू बरोबर किंवा चूक हा नाही. तर ती बाजू कशी मांडली जाते हा आहे. आपल्या लोकशाहीने आपल्याला अभिव्यक्तीस्वातंत्र्य दिले आहे.प्रत्येकजण त्याला पटणारी बाजू मांडू शकतो. अस असताना हे हिंसक हल्ले करणे, धमक्या देणे असे प्रकार का करावे लागतात ? जर तुमच नाण खणखणीत आहे जर तुमची बाजू योग्य आहे तर ती लोकशाहीप्रधान मार्गाने मांडा. काय चूक काय बरोबर याचा फैसला लोक करतील. ही वैचारिक मुस्कटदाबी हा अंतर्गत दहशतवादाचाच प्रकार आहे. बाह्य दहशतवाद मोडून काढता येऊ शकतो. पण हा अंतर्गत दहशतवाद त्याहून घातक आहे. यात अनेकांचे हितसंबंध गुंतले असल्याने भारतासारख्या देशात तो मोडून काढणे खूप कठीण आहे. तो फोफावायच्या आतच त्याचा बिमोड करणे गरजेचे आहे.



आता काल प्रत्यक्षात काय झाले ते पाहू आव्हाड हे संभाजी भिडेंना अपशब्द वापरतात. अपशब्द काय तर एकेरी उल्लेख करतात असे कारण देऊन भिडेंच्या गुंडांनी शिवसन्मान जागर परिषदेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आधी बाहेर उभी असलेली आव्हाडांची गाडी फोडली. तेव्हा आव्हाड हे अर्थातच स्टेजवर होते. नंतर हे पाच पंचवीस गुंड मोठ्या आवेशात स्टेज वर घुसले. लगेच तिथे असलेल्या चार दोन पोलिसांनी त्यांना अटकाव केला. आव्हाडांना त्यांचे वारेदेखील लागले नाही. त्यांचा प्रयत्न हाणून पाडत स्टेजवरील आणि प्रेक्षकांतील कार्यकर्त्यांनी त्यांच्या गचांड्या धरून स्टेजवरून खाली फेकले. आणि गराडा घालून लाथा बुक्क्यांनी त्यांना यथेच्छ बडवले. खुर्च्यांचा त्यांच्यावर पाउस पडला. tv9 मराठी, मी मराठी, एबीपी माझा, झी न्यूज जय महाराष्ट्र सर्व चानेल वर हे फुटेज कालपासून दाखवत आहेत. इच्छुकांनी प्रत्यक्ष बघून खात्री करून घ्यावी. एक पांढरा शर्ट आणि एक चटयापट्याचा टी शर्ट घातलेल्या गुंडाला तर कपडे फाटेस्तो फोडलेले फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे.

दाभोळकरांवर पानसरेंवर हल्ला करणारे वेगळे असतील पण कालचा हल्ला आणि त्यामागील मानसिकता तीच आहे. पण इथ गोम अशी आहे की दाभोळकर किंवा पानसरे यांच्यासारखे जितेंद्र आव्हाड हे असंरक्षित सामाजिक कार्यकर्ते नाहीत. राजकीय नेते असल्याने आणि त्यांची बाजू खरी असल्याचे कालच्या हल्ल्याने सिद्ध झाल्याने त्यांच्यामागे भरपूर जनाधार आहे. तेव्हा “ इथे उपाय केलिया अपाय होईल !” असा संदेश कदाचित हल्ला करणाऱ्या गुंडांना नक्कीच मिळाला असावा.  

6 comments:

  1. सुहास जी, छान विश्लेषण. आता जितेंद्र जी आव्हाड यांनाच नव्हे तर त्यांच्यासारख्या अनेक सामाजिक प्रबोधनाचे काम करणाऱ्यांना स्थानिक लोकांनी संरक्षण द्यावे.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद प्रल्हाद जी.
      अगदी रास्त सुचना 👍
      आपल्या प्रबोधनसाठी काम करणाऱ्याना संरक्षण देणे हे जनतेचे कर्तव्य ठरते.

      Delete
  2. काल शिवसन्मान जागर परिषदेच्या नावानं संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाने कार्यक्रम घेतलेला.. त्या निमित्ताने सांगलीत जीत्या आव्हाड आणि श्रीमंत कोकाटे सह मोगली फ़ौज सांगलीत दाखल झालेली...
    ही हांडगी फ़ौज इथे येवून आमच्या श्रद्धास्थानाचा अर्थात आमची माउली गुरुवर्य श्री संभाजीराव भिड़े गुरूजी यांचा अवमान करणारच हे जाणून घेवून आम्ही आधीच त्याने अशा आशयाचे भाषण करू नये असे निवेदन दिलेले... 
    पोलिस आणि प्रशासनाने देखील त्याला याची कल्पना दिली असतानाही त्याने मुद्दाम पोलिस प्रशासनाच्या विनंतीचा अनादर करत गुरुजींचा चुकीचा, एकेरी आणि अपमानजनक उल्लेख केला...

    त्याचा या कृत्याचा जाब विचारण्यासाठी (हो विचारण्यासाठीच,जर त्याला मारहाणच करायची असती तर 30-40 नाही तर 300 - 400 गोळा होऊन गेलो असतो) 30-40 धारकरी कार्यक्रमच्या ठिकाणी व्यासपीठावर गेले... तिथे जावून ते जितेंद्र आव्हाडला गुरुजींच्या बाबत अपशब्द उच्चारु नको अशी विनंती करताच, जित्याने आपल्या बगलबच्च्याना 'मारा याना,फोड़ा, जिवंत सोडु नका' अशी चिथावणीदिली.. त्यांनी मारहाण करायला सुरुवात करताच आपल्या धारकऱ्यानी जित्याची कॉलर धरून त्याच्या गालावर शिवसूर्यजाळ काढला... यात एक गोष्ट लक्षात घ्या... श्रीशिवप्रतिष्ठान,हिन्दुस्थानला गुरुजीनी दिलेली अनमोल गोष्ट म्हणजे शिस्त, कायदे पाळण्याची शिकवण त्याच प्रमाणे आम्ही त्याला समज द्यायला गेलो होतो.. मारहाणीची सुरुवात त्याने केली... अशा स्थितीत 'कुणी वीट मारे दगड हेच उत्तर' या न्यायाने आम्ही 2500 च्या संख्येवर 30 -40 लोक भारी पडलो .. 

    जित्याला मार बसताच तो मागे सरकला आणि बायकाना पुढे केले.. धारकरी स्त्रियांना हातही लावत नाहीत हे माहीत असल्याने त्याने स्वतः ला वाचवायला स्त्रियांच्या आसरा घेतला.. 

    स्त्रिया पुढे आल्याने आणि जमावात स्त्रियांची धावाधाव झाल्याने आपले धारकरी मागे सरकले, याचाच फायदा घेवून त्या बायकी बी ग्रेडयानी शेवटी असलेल्या आपल्या धारकऱ्याला घेरले.. एकावर शंभर तुटून पडले.. हा प्रकार आपल्या बाहेरील कार्यकर्त्यांना समजताच बाहेर जो बी ग्रेडचा दिसेल त्याचे फोड़काम झाले.. आणि पोलिसांनी आम्हाला ज़रा दूर हटवले आणि कार्यक्रम बंद केला.. 

    रात्री 2 पर्यन्त गुन्हे दाखल करण्याचे काम चालले.. आणि सकाळी सांगली बंद झाली...

    आम्ही कायदा पाळतो कायदा पाळला जेव्हा त्यांनी मारहाण केली तेव्हाच आम्ही हात उचलला, आमच्या धसक्याने जीत्या 4 तासात ठाण्याला पोचला... 

    लक्षात घ्या... आजवर जिथे ही परिषद् झाली तेव्हा त्याला विरोध करण्याचे धैर्य कोणीच दाखवले नाही... सुरुवात आम्ही केली... आणि ही फक्त सुरुवात आहे... इथून पुढ जिथ जीथ हा भड़वा जाईल तिथे त्याला हीच वागणुक मिळेल याची दक्षता आता महाराष्ट्रातील सर्वच शिवशंभुभक्तानी घ्यावी हीच अपेक्षा... 

    ।। जयतु हिंदुराष्ट्रम ।।

    -एक धारकरी
    श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

    ReplyDelete
    Replies
    1. अच्छा ....पण न्यूज चॅनेल वरचे वीडियो फुटेज तर आपण सांगत आहात तस काहीच दाखवत नाही. तर याच्या बरोबर उलट न्यूज येत आहेत.
      आणि नाव नाही तुमच कमेंट मध्ये

      Delete
  3. अत्यंत बारकाईनें वाचा.कालच्याच पोस्टचा दुसरा भाग:गुलामीचा
    संबंध मानसिकतेशीं आहे.गुलामीनें फक्त
    वैयक्तीक स्वातंत्र्य लोप पावतें
    एवढंच खरं नाही,तर ग़ुलामी माणसांचे मनें विकलांग
    करतें,परावलंबित्वांत वाढ करते,इच्छाशक्तीच खाऊन
    टांकतें,अस्मिता नष्ट करतें,स्वाभिमानाचे नामोनिशाण
    ठेवत नाही,संवेदनाशीलता बधीरच करतें,पुरुषार्थाशी
    नातेंच संपवते.गुलामीची
    एवढीं संवय होते कीं ती अपरिहार्य वाटूं लागतें,
    तिच्याशिवाय आपण जगूच
    शकणार नाही अशी मानसिकतांच तयार होते.
    परिणामी गुलामाला गुलामीची
    जाणीव करूंन देणं अशक्यप्राय होते.याकामी आपलें
    आयुष्य देणारांना ग़ुलाम आपले शत्रु समजू लागतों व
    त्याच्या शत्रुला तो आपला देवच समजतों.प्रसंगी
    या समाज प्रबोधकांना आपले आयुष्य फुकट
    वाया चालल्याची ( वाया गेल्याचाच )
    जाणीवच होऊं लागते.तसा त्यांना
    भास होतो.ज्यांनी गुलामाला ग़ुलाम केले ते सहज
    समोर स्पष्ट दिसतांत व त्यांच्याशी लढणे सोपे दिसते.
    परंतु त्याला हरवणं म्हणजें
    गुलामाला गुलांमीतून बाहेर काढणें हे लक्षांत येतं व
    बुध्दीला धक्काच बसंतों.
    कारण गुलामांचं मन मेलेलेच असतें.त्याचं प्रबोधन
    करणें ही गोष्ट अशक्य
    कोटीतली वाटतें.शिकलेलेच फार वाट चुकलेल्या वाटेने
    जातांना दिसतांत.सर्वच धर्मांतील फापटपसारा उदा.स्वर्गाची
    लालूच व नरकाची भिती यावर ते विश्वास ठेवतांत.
    सत्यानारायणाच्या पुजेंसाठी वाचलेल्या
    १००% खोट्या पोथीची ते पूजा करतांत.इतरही
    धर्मांतील धर्मांधाची नंग्यानाचाची कीवच करावी वाटतें.धन्य ते बुध्द,सम्राट अशोक,चार्वाक,रोहिदास,कबीर,तुकाराम,छ.
    शिवाजी,संभाजी,फुले-शाहू-आंबेडकर व शेवटी गाडगेबाबां इ.इ. अनेंक असंख्य.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खर बबन जी
      एखाद्याला मुर्ख बनवण सोप असत...पण तो मुर्ख बनलाय हे पटवन कठिन असत :)

      Delete