About

Monday 10 September 2012

एका जातीयवादी तथाकथित ब्राह्मणाचा पर्दाफाश

नुकताच एक महाभयंकर, जातीयवादी ब्लॉग वाचनात आला. या ब्लॉग वरील लेखन कोणत्याही सुसंस्कृत माणसाला चीड आणेल असेच होते. माझे तर डोकेच सरकले ते सर्व वाचून. इथ कोहम महोक नावाचा (फेक नाव ) एक विकृत इसम जातीयवादी गरळ ओकत असतो. संभाजी ब्रिगेड हि एक ब्राम्हण द्वेष करणारी संघटना आहे हे सर्वश्रुत आहे. कोणत्याही सुसंस्कृत मराठा व्यक्तीला असला उग्र जातीयवाद मान्य होणार नाही. माझ्या फेसबुक आणि जातीयवाद या लेखात मी या संघटनेवर खरमरीत टीकाच केली आहे.




 मराठा ही महाराष्ट्रात बहुल असणारी जाती आहे. मुठभर मराठे बिग्रेड संघटनेत असतील. उलट इतर जातीय लोकच या संघटनेत अधिक आहेत. प्रश्न तो नाही. पण हा कोहम महोक नामक विकृत इसम ब्रीगेडींना प्रत्युत्तर देण्याच्या मिषाने या ब्लॉग वर संपूर्ण मराठा जातीवर शेरेबाजी करत असतो. आणि ब्राम्हण ही एक सुसंस्कृत जाती आहे बाकी सर्व जाती असंस्कृत आहेत अशी प्रौढी मिरवत असतो. ब्राम्हण सुसंस्कृत आहेत, ठीक आहे , यावर आम्ही भाष्य करण्याचे कारणच नाही पण मराठे असंस्कृत आहेत असे जर हा विकृत इसम म्हणत असेल तर यातूनच त्याची संस्कृती आणि संस्कार कळून येतात.

याने अनिता पाटीलचे कोहम ला प्रेमपत्र नावाचा एक विकृत लेख लिहिला आहे. अनिता पाटील या संभाजी ब्रिगेड च्या एक कार्यकर्त्या आहेत. आता खेडेकर वगैरे मंडळी ब्राम्हण स्त्रियांवर ज्या पातळीवर जाऊन टीका करतात ते पाहता त्याचे येथे काहीसे खालच्या पातळीवर जाणें देखील समजून घेता येईल की ती फक्त एक प्रतिक्रिया होती म्हणून पण याच लेखात त्याने समस्त मराठा जातीबद्दल जे आपले अकलेचे तारे तोडले आहेत ते चीड आणणारे आहेत. तुम्ही जी एकमेकांवर चिखलफेक करायची ती करा ना. यात सबंध जातीला मध्ये आणून तुम्ही नवे जातीयवादी बनवण्याचे काम करत आहात याचे ही जरा भान ठेवा.

मी केवळ नमुन्यादाखल ह्या विकृत महाभागाची विकृत वाणी त्याच्याच शब्दात पुढे देत आहे. त्यावरून या इसमाबद्दलचे आपले मत आपणच बनवा.



मला तडफदार पुरुष फारच आवडतात. त्यात विद्वत्ता आणि तडफ एकत्र आली की पुरुष काय सुंदर दिसतो, अगदी हवाहवासा वाटतो. त्यात परत विद्वत्ता आम्हा मराठ्यांत कमीच आणि तडफ  तर फक्त तोंडात.
आमच्या मराठा समाजात तोंडात फार बळ, स्वतःला लढवैय्ये, धडाडीचे, शूर वीर आणि काय काय म्हणतात, सारखा सारखा धोशा लावतात. पण इतिहास बघता मराठ्यांनी लढायचे साधारण १८५७ सालापासूनच सोडले. ब्राम्हण कसे पूर्वीपासून ते आत्तापर्यंत बहुतेक सर्व क्षेत्रात पुढे, एकही असे क्षेत्र सापडणार नाही जिथे ब्राम्हण तज्ञ सापडणार नाही.  
सांगायचा मुद्दा असा की, आमच्या मराठा जातीतच इतके उपप्रकार आहेत की सांगायची बात नको. आता ब्राम्हणांनी हे उपप्रकार तयार केले असे म्हणणे हा मूर्खपणा आहे हे मला समजते. आणि उच्च निचीची कल्पना मराठ्यांत अतिशय रुजलेली. जर का ९६ कुळी देशमुख असेल तर त्याला साधा ९६ कुळी पाटील चालत नाही, आमच्यासारखे साधे मराठा तर सोडाच. पंचकुळी तर स्वतःला देवच समजतात. तर सांगायचा मुद्दा असा की जातीयवादात ब्राम्हण नाही तर मराठे पुढे आहेत, ते साळ्या-माळ्यावर रोब दाखवतात आणि महार मांग बौद्ध लोकांची यथेच्छ नालस्ती करतात. ह्याउलट ब्राम्हण लोक अतिशय मोकळ्या मनाचे असतात आणि तडफदार असतात. हुशार असतात, उंच दिमाखदार रुंद छातीचे असतात, नाहीतर आमचे मराठा पुरुष, बिनडोक किरकोळ काटक्या नुसत्या. तुम्ही ब्राम्हण पुरुष निर्व्यसनी असता तर आमचे पुरुष नुसते पेताड, फुकट मिळेल तिथे दारू प्यायची आणि मिळेल त्या गटारात पडायचे. नाहीतर घरी येऊन बायकोला मारहाण करून रोब दाखवायचा. त्यामुळे मला मराठा पुरुषाशी लग्न करायचेच नव्हते. मराठा पुरुषाच्या तोंडाला दारूचा नाहीतर गाय छापचा घाणेरडा गलिच्छ वास, तर ब्राम्हण पुरुष कायम स्वच्छ. मराठा पुरुष उगाच कर्जे काढून, उधार उसनवार करून निर्वाह करतील तर ब्राम्हण अतिशय नीतीने काटकसरीने राहून पैसा गाठीला बांधून ठेवतील आणि मग बायकोला महाबळेश्वरला फिरायला नेतील. उगाच खोटा आव नाही की खोटी तरफदारी नाही. किंबहुना ब्राम्हण जातीत एकूणच खोटेपणा कमी दिसतो.
आणि हेही माहित आहे की मराठ्यांचे आरक्षणाची भीक मागणे ही लबाडी आहे.


आता हे तारे या इसमाने केवळ एकाच लेखात तोडले आहेत. सबंध ब्लॉगवर त्याने असे किती तारे तोडले असतील ते वाचण्याची इच्छाशक्ती आमच्यात तर नव्हती.
आणि एक विशेष या लेखात मराठा जातीवर टीका केल्याने खवळलेल्या मराठा ब्लॉगरनी खाली कमेंटमध्ये या इसमाची अतिशय बेइज्जत केली. याच्या आईबहिणींवर अतिशय खालच्या पातळीवरून कमेंट केल्या. असल्या कमेंट देखील याने डिलीट केल्या नाहीत. कारण काय तर इतर जातींची असंस्कृतता आणि ब्राम्हण जातीची सुसंस्कृतता इतरांनी पहावी म्हणून. स्वत: ची सुसंस्कृतता सिद्ध करणे कोणते मोल देऊन ? स्वत:च्या  आई बहिणींवर केलेली हीन टीका इतरांना वाचण्यासाठी उपलब्ध करून देऊन ?? त्यांच्या अब्रुचे मोल देऊन ?? आम्ही जुने नेटिझन असल्याने आणि इथ सर्व सोशल साईटवर नेमके काय चालते याची कल्पना असल्याने आम्हाला ब्राम्हण जातीबद्दल चीड आली नाही . कारण हा एक नालायक इसम म्हणजे समस्त ब्राम्हण जाती नव्हे याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. अर्थात मला या सडक्या बुद्धीच्या कोहम महोक चा अतिशय राग आला आणि लेख वाचून आलेली शंका की हा इसम विकृत आहे, कमेंट वाचून खात्रीत बदलली. माझा माझ्या ब्राम्हण मित्रांना देखील आग्रह आहे त्यांनी समस्त ब्राम्हण वर्गाबद्दल चीड उत्पन्न करणारे लेखन करणा-या आणि समाजात जातीयवादी तेढ वाढवणा-या या इसमाला रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावेत. आणि सर्वांनी मिळून हिंदू धर्माच्या ऐक्याला हातभार लावावा.

जय भवानी .......!! जय शिवाजी ....!! जय महाराष्ट्र .......!!

29 comments:

  1. भूसेजी - आपला माझ्याबद्दलचा लेख वाचला. माझे पाय जमिनीवर टेकले. एक गोष्ट खरी की माझी टीका सर्व मराठा जातीवर दिसते, पण ती तशी नाहीये तर ती फक्त खेदेकारी बी-ग्रेडी मराठा (आणि इतरांवर) आहे.
    माझ्या ब्लोगवरील आपल्या टीकेला उत्तर मी दिलेले आहे, ते आपल्या रेफरन्स साठी परत पेस्ट करत आहे.
    - आपला मित्र कोहम

    [पण या लेखात तु मराठा जातीची बदनामी केली आहेस ]
    भूसेजी - हा लेख विनोदी आहे. ह्यात मला अनिताने ब्राम्हनांवर केलेल्या अनाठायी टीकेला उत्तर द्यायचे होते, आणि अनिता खरोखरीच खरी व्यक्ती असेत तर तिच्या मनातील द्वंद्व दाखवायचे होते. बर्याच लोकांना हे कळलेच नाही. असो, पण आपल्या रागाचा मुद्दा मी सर्व मराठा जातीच्या विरुद्ध आहे असा असेल तर, राग सोडून द्या. मी सर्व मराठा जातीच्या विरोधात नाही. मी फक्त ब्राम्हण विरोधी मराठ्यांच्या विरोधात आहे. माझ्या पूर्वीच्या लेखांबाबत पण लोकांनी "तुम्ही सर्व मराठा जातीला जबाबदार धरू नका वगैरे सुचवलेले आहे" आणि ते बरोबर पण आहे. मी लेखक नाही, त्यामुळे मुद्द्यांची कित्येकदा गल्लत होते, पण मी बी-ग्रेड, मूलनिवासी नालायक पसरवत असलेल्या ब्राम्हन्द्वेश्च्या विरोधात नक्की आहे.

    [मराठ्यांची बदनामी तु केली आहेस त्याने माझ्यासारखे ब्रिगेडला विरोध करणारे मराठे देखील तुझे विचार हे ब्राम्हणांचे प्रातिनिधिक विचार समजून ब्रिगेड कडे वळले तर त्यात नवल वाटू देऊ नको]
    परत वरती लिहिल्याप्रमाणे सर्व मराठा जात अपेक्षित नाहीये आणि हा लेख विरोधी आहे. असा उल्लेख पहिल्या पराग्राफ मध्येच केलेला आहे.
    दुसरे म्हणजे, आम्ही सर्व मराठे ब्रिगेड कडे आकर्षित होऊ ही धमकी वाटते. "म्हणजे तुम्ही टीका केली तर, आमची प्रिन्सिपल सोडू, आणि एकजात सर्व मराठे ब्रिगेडचे पाठीराखे होऊ. मग खेड्या वगैरे विकृत मंडळी तुम्हा ब्राम्हणांचा नाश करतील आणि तुमच्या बायका पोरींना जनानखान्यात डांबतील."
    आपण ब्रिगेड विरोधी आहात कारण ते चुकीचे आहेत म्हणून. त्यात ब्राम्हणांची काय भूमिका आहे ह्याचा काहीही संबंध नाही. समजा उद्या असे उघड झाले की शिवाजीमहाराजांची हत्या खरोखरीच ब्राम्हणाने केली होती किंवा गरीबराव केकाटे खोटा ह्याचा पुरावा सदर करतील आणि भूसेंचा त्यावर विश्वास बसला की संपले. भुसे आणि त्यांचे सहकारी लगेच ब्रिगेड मध्ये, ब्राम्हण पुरुष खलास आणि बायका जनानखान्यात. आपली भूमिका बरोबर वाटत नाही.

    [या विकृत बुद्ध इसमाचा पर्दाफाश केला आहे माझ्या ब्लॉग वर जातीभेद न मानणा-या प्रत्येक हिंदूने अवश्य वाचा ]
    बुद्ध? एखाद्याचा बुद्ध म्हणून उल्लेख करून भूसेजी आपण म्हणता की "भूसेजी जातीभेद मनात नाहीत". बुद्ध असणे वाईट नाही, जसे मराठा, माळी अथवा ब्राम्हण असणे. वाईट आहे ते जातीभेद मानणे. आणि हाच मुद्दा "अनिताचे प्रेमपत्र" ह्या लेखात मी उल्लेखलेला आहे. ज्यावर आपण आपल्या ब्लॉगवर टीका केलेली आहे. कोहमचे बुद्ध असण्याचा आपला संशय आहे का? बुद्ध असणे वाईट आहे का? कोहम ब्राम्हण आहे पण त्याला बुद्ध लोकांबद्दल द्वेष भावना नाही.
    एक गोष्ट मान्य करतो की आपली टीका करण्याचा अधिकार आणि शैली दोन्हीही कोहमला मान्य आहेत. कोहमचा कधीही असा दावा नाहीये की कोहमच बरोबर आहे आणि दुसरे सगळे चुकीचे. कोहमला लोक मुद्दा पटवून देऊ शकतात.

    [नडला त्याला फोडला ..]
    ह्याचा अर्थ काय? मला तर कोणीही फोडलेला नाही अजून :-D
    शाब्दिक?

    -कोहम

    ReplyDelete
  2. [स्वत:च्या आई बहिणींवर केलेली हीन टीका इतरांना वाचण्यासाठी उपलब्ध करून देऊन ?? त्यांच्या अब्रुचे मोल देऊन ??]
    किंवा कोहमच्या आई बहिणीला शिव्या देणाऱ्या लोकांच्या आयाबहिणींना शिव्या न देऊन! ह्या नतद्रष्ट लोकांच्या आईचा काय दोष तो मी त्यांची इज्जत चव्हाट्यावर टांगावी.
    आणि जर का ह्या लोकांची आई बहिण पतिव्रता सुसंस्कृत पवित्र स्त्री असेल तर ते मोठे पाप ठरेल. म्हणून कोहमने ह्या लोकांना विरोध केला नाही, उलट शिव्या दिल्या नाहीत.
    आपण स्वतःला संवेदनशील म्हणता, तर आपल्याला कोहमची झालेली तळमळ कळेल अशी अशा करतो. माझी भूमिका मी (मराठा जातीबद्दल टीका न करता) मी आधीच प्रसिद्ध केलेली आहे.
    कृपया वाचावी ही विनंती,
    http://kohamblogger.blogspot.com/2012/09/blog-post_8.html

    ReplyDelete
  3. कोहम,
    पहिल्याच वाक्यात तु म्हटल आहेस कि माझे पाय जमिनीवर आले
    पण तुझ्या पूर्ण कमेंट मध्ये या वाक्याचा संदर्भ लागत नाही. म्हणजे नेमक काय झाल ते तु थोडस अजून स्पष्ट करून सांगितल तर बर होईल.
    आणि मी सुरवातीलाच म्हटले आहे कि तु अनिता पाटील चे प्रेमपत्र हा विषय घेतलास लेखाचा तो प्रतिक्रियात्मक होता म्हणून क्षम्य होता. म्हणून त्यावर चर्चा नको.
    आता इथ जो तु मी पूर्ण मराठा समाजाच्या विरोधात नाहीचा राग आळवीत आहेस त्याचे भान तु लेख लिहिताना ठेवल असतस तर बर झाल असत.
    आणि मी तुझा लेख वाचून ब्रिगेडविरोधी मराठे ब्रिगेडकडे वळण्याचा धोका सांगितला होता ती धमकी नव्हती. तुच विचार करून पहा. तु समस्त मराठा जातीवर टीका करत असतोस आणि जात हा एक अतिसंवेदनशील मुद्दा असतो ज्याचा त्याचा. तु जो हा लेखन प्रपंच करीत आहेस त्याच्या मुळाशी देखील तुझा तुझ्या जातीबद्दल असणारा अभिमान हेच आहे. आणि तु प्रिन्सिपलस वगैरे म्हणालास. ठीक आहे आमच्या विचारांची मांड पक्की आहे. ती काही बदलण शक्य नाही त्यामागे वर्षानुवर्षांचा अभ्यास, वाचन आणि विवेकबुद्धी आहे. पण सर्वच जण असा विवेकी विचार करतील अस नाही. तुझा लेख समज १००० बिगर ब्रिगेडी मराठ्यांनी वाचला. त्यातील ९५० जणांनी विवेक सोडला नाही पण ५० जण ब्रिगेड कडे वळले तर ??
    अस होऊ शकेल कि नाही याची शक्यता तुच आजमावून पहा आणि मला सांग.
    आणि “या विकृत बुद्ध इसमाचा पर्दाफाश केला आहे” इथ थोडीशी टायपींग मिस्टेक झाली आहे. विकृत बुद्धी अस लिहायचं होत मला.
    आणि सरते शेवटी ...
    नडला त्याला फोडला ..
    इथ अर्थातच मला शाब्दिक अर्थ अपेक्षित आहे. विनाकारण तु संपूर्ण मराठा जातीवर टीका करत असशील आणि हेतू पुरस्पर जातीभेदाला चालना देत असशील तर तुला प्रत्युत्तर देण हे आमचा धर्म कर्तव्य आहे. कारण आम्ही हिंदुत्व प्रचार आणि प्रसाराचा वसा घेतला आहे.
    आणि तुझ्या संपूर्ण लिखाणात तुझा जातीचा अहंकार फणा काढत असतो. ब्राह्मण विद्वान असतात अस तुझ मत असेल तर आमचे काही म्हणणे नाही पण फक्त ब्राह्मणच विद्वान असतात अस तुझ मत असेल तर खंडण करन देखील आम्हाला भाग आहे.
    आणि तु
    “ शाब्दिक ? “
    अशी जी पृच्छा केली आहेस त्यातील प्रश्नचिन्हात देखील मला याच दर्पोक्तीचा वास येत आहे.

    ReplyDelete
  4. कोहम माहोक , तू तुझ्या ब्लॉग मुळे पूर्ण ब्राम्हण समाजाला वेठीस धरणार यात काहीच शंका नाही , जर तुझी बुद्धी खरच ठीकाण्यावर असेल तर अनिता पाटील आणि बिग्रेड ला टार्गेट कर , पण मराठा समाजाला बोट दाखवलेस तर तुला पुन्हा अंगठा चुपायला लावण्यात येईल यात मला काहीच शंका वाटत नाही , तुझ्या बाष्कळ ब्लॉग मुळे ब्राम्हण समाज संकटात येण्याची चिन्ह साफ दिसत आहेत , कारण तुझ्या विचारांमुळे तू संपूर्ण मराठा समाजाला बिग्रेड च्या जवळ नेऊन ठेवशील.

    बघ बाबा तुझं काय ते .
    ये चहा प्यायला

    ReplyDelete
    Replies
    1. शरद धाबेकर4 February 2015 at 16:17

      तुशारजी अगदी खरे आहे

      Delete
  5. आणि कोहम
    कुणाच्याही आई-बहिणीवर चिखलफेक करणे हे मला कधीच मान्य होणार नाही.
    "अशीच सुंदर अमुची आई असती ...आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती "
    हे छत्रपतींचे संस्कार आम्ही विसरणार नाही
    तु किंवा कोणीही तस केलच तर त्याचा यथाशक्ती निषेध आम्ही केल्याशिवाय राहणार नाही.
    मी फक्त इतकच म्हटल आहे कि तु त्या कमेंट डिलीट करू शकला असतास. किंबहुना करायलाच हव्या होत्यास.
    तु आणि इतर काही जणांनी खाली म्हटल होत कि बघा कोहमची सुसंस्कृतता आणि "त्यां " ची असंस्कृतता इथ एकाच पानावर स्पष्ट होते
    म्हणून मी म्हटल आहे कि सुसंस्कृतता सिद्ध करणे कोणते मोल देऊन ??

    ReplyDelete
  6. कोहम चे म्हणे मला पटले आहे ..... कुणाच्याही आई बहिणीवर चिखल फेक करणे त्याला आवडणार नाही कारण कुणाची आई पतिव्रता सती सावित्री असेल म्हणून .... आणि त्याची विकृती बघा स्वतःच्या आईला आणि बहिणीला त्याने मान्य केले कि त्या सती सावित्री आणि पतिव्रता नाहीत म्हणून ...

    ReplyDelete
  7. सुहास भुसे साहेब तुह्मी छान पद्दतीने उत्तर दिलंत.....
    मला येथे कोहम ने लिहिलेल्या ब्लोग्वाराची भूमिकाच मुळात समजली नाही....
    मराठा जात वा अन्य कोणतीही जात ह्यावर टीका करणे वा सत्य शोधन प्रक्रियेत असलेल्या व्यक्तींवर टीका करणे हे अभिप्रेत आहे
    पण अश्या पद्दतीने खालच्या थराला जाणे आणि प्रेमपत्रच तयार करणे ह्यातून त्या व्यक्तीची म्हणजे कोहम ची मानसिकता काय असावी हे कळणे फार अवघड नाही
    ज्याच्या कडे बोलण्यासारखे काही नसते तेच असे उपद्रव करतात ह्यात काही शंकाच नाही आणि बोलावे जरूर ..पण एकदमच बालिश पणे चीद्खोरीने बोलणे
    हे कोहम हा नक्कीच २२ ते २५ ह्या वयोगटातील असावा हे लक्ष्यात येते ..ज्यांना संपूर्ण सामाज्याची (महाराष्ट्र इतिहासाची ) जाणीवच नसेल तर ते कोहम सारखेच लिहिणार
    अनिता ताई पाटील ह्यांचे ब्लोग नेहमीच माझ्या वाचनात आहेत टीका त्या करतात परंतु तेवढे पुरावे देखील सादर करतात
    तुषार घाग ह्यांनी एक काळजी येथे प्रकट केली कि एका मुळे संपूर्ण ब्राह्मण समाज्याला लोक दोष देतील आणि कदाचित सगळीच मंडळी ब्रिगेड कडे जातील
    आहो आता पर्यंत हेच तर घडत आले आहे ..काही मंडळीन मुळेच सगळ्यांना दोषी व्हावे लागते ...ह मो मराठे ह्यांच्या मुळे लोकांचे कान टवकारले गेलेच संपूर्ण ब्राह्मण सामाज्याकडे
    आता परिवर्तन होत आहे ..आणि हे भविष्यात होत राहीन ..नदीला कितीही अडविण्याचा प्रयत्न केला तरी ती तिचा मार्ग बदलते का ?
    येथे देखील हाच प्रकार आहे ...परिवर्तनाच्या चळवळीत मार्ग हा सरळ आणि ठरलेला असतो ..कोणीही कितीही आरडओरडा केला तरी मार्ग बदलाने मुश्कील
    लोकांना देखील पटतेच तेह्वाच तर परिवर्तन घडले जाते ...
    बाकी मी तरी कोहम सारख्यांची पर्वा करीत नाही ...वाटेत बरेच गतिरोधक येतात ..थोडी हळू गाडी करायची नंतर सुसाट पळवायची .....
    जय जिजाऊ ......जय शिवराय ......जय भीम .....जय भारत

    ReplyDelete
  8. देहम नाहम ....कोहम सोहम ...
    वा वा मस्त!
    हे वाचलास कोहम
    अरे प्राण्या त्यापेक्षा ज्ञानेश्वरी वाच जरा
    विनयशीलता शिक ज्ञानदेवांकडून
    एवढा मोठा ग्रंथ लिहिला तरी स्वत: चिलट म्हणवून स्वत:कडे कमीपणा घेतात आणि तु चार लेख काय लिहिलेस स्वत: ला जगात भारी समजायला लागलास ?
    हे वाच कोहम ला उत्तर -
    कोहम अर्थात कोण आहे मी ?
    अहं ब्रह्मास्मि अर्थात मीच तो ब्रम्ह
    ज्याच्या शोधात तु आहेस ते परात्पर तत्व तुझ्याच अंतरंगात आहे
    विनयाने त्याचा शोध घे
    माणसातल , मनातल देवत्व जागव
    जातीभेद करू नकोस
    लय वंगाळ असत र ते

    ReplyDelete
  9. भोसले साहेब छान .....
    जय जिजाऊ ...जय शिवराय .....

    ReplyDelete
  10. धन्यवाद विनोदजी..
    आपले संयमी विचार मला नेहमीच आवडतात.
    प्रत्येक गोष्टीवर आपण सयंत आणि विचारपूर्वक प्रतिक्रिया देता.
    आणि
    धन्यवाद तुकारामजी ..
    आपण कोहम ला योग्य तोच सल्ला दिलात.

    ReplyDelete
  11. च्छ्या : जे नको हेते तेच होत आहे . विषय ब्राम्हण विरुद्ध मराठा असा कधीच नव्हता आणि जर तो आता असेल तर हा ब्रिगेड्यांचाअ विजयच आहे हे प्रथम आपण समजुन घेतले पाहीजे, कारण हिंदु समाजामध्ये फुट पाडणे हे ब्रिगेड्यांचे ध्येय आहे आणि यासाठी काही ब्राम्हणांनी जर संपुर्ण मराठा समाजाला दोश द्यायला सुरवात केली असेल तर नक्की आनि नक्कीच ब्रिगेड्यांना उद्देश सफल झाला. आता होणार पुढे असे की ज्या ब्राम्हणांनी अशाप्रकारे पुर्ण मराठा समाजाला टार्गेट केले असेल त्याचा संदर्भ हे ब्रिगेडी आपल्या बाकीच्या मराठा लोकांना देवुन त्यांची माथी भडकवणार . म्हणजे ब्रिगेड्यांना एक मराठा समजुन एखादा ब्राम्हण एक ब्राम्हण म्हणुन टार्गेट करणार असेल तर तर विजय तर ब्रिगेड्यांचा होतोच उलट त्यांच्यासाठी आपण आणखीन उपजाऊ जमिन तयार करत आहोत हे निश्चीत.

    कोणीही ब्राम्हण असो किंवा कोणत्याही जातितला हिंदु असो एक लक्षात ठेवायला हवे की ब्रिगेड्यांसमोर जर आपण आपली जात घेवून गेलो तर विजय त्यांचा आणि एक एक हिंदु म्हणुन गेलो तर विजय आपला आहे हे पक्के लक्षात ठेवायला हवे
    ---------------------------------------------------------------------------------
    कोहम यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्यांच्या लिखानावरुन एक लक्षात येत आहे की अनेक असे मराठे हे कोहम यांच्या सोबत आहेत. ते स्वत: कोहम यांना संगत आहेत की सगळे मराठे हे ब्रिगेड सारखे नाहीत त्यामुळे असे होते की या अशा काही मराठ्यांना जाणीव होते की ’आपण ब्रिगेड सारखे नही आहोत’ .

    आणखीन एक .. मगाशी म्हटल्याप्रमाणे जरी कोहम यांनी काही न पटण्यासारखे लिहिले तरी आपण किंवा कोणत्याही मराठ्यांने एक मराठा म्हणुन जर त्याचा विरोध केला तर तो ब्रिगेड्यांचाच विजय आहे हे पक्के लक्षात ठेवले पाहीजे

    ReplyDelete
  12. सुरज महाजन जी
    हिंदू धर्मात कोणत्याही जाती जातीत वाद होणे हिंदू धर्माच्या ऐक्याला बाधक आहे. वरचेवर या जातीभेदाच्या भिंती कमजोर होण्याऐवजी वाढत चालल्या आहेत काय असे चित्र दिसत आहे. काही संघटना या साठी हेतू पुरस्पर प्रयत्न करत आहेत. आणि काही भडक माथ्याचे तरूण याला बळी पडत आहेत.
    आपला मुद्दा अगदी रास्त आहे. इथ ब्राह्मण मराठा वादाचा प्रश्नच नाही.
    अनेक ब्राह्मण माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी हा लेख आवडल्याच आवर्जून कळवल देखील आहे.
    आता राहता राहिला ब्रिगेडचा प्रश्न.
    आम्हाला त्यांची मते पटत नाहीत हे आम्ही लेखाच्या सुरवातीलाच स्पष्ट केले आहे.

    ReplyDelete
  13. {एका जातीयवादी तथाकथित ब्राह्मणाचा पर्दाफाश }
    मथळा मध्ये एक चुक आहे असं वाटतं की तुम्ही तथाकथीत लिहिला आहे पण तो तथाकथित नसून पक्का ब्राह्मण आहे हे कोण पण सांगेल त्यांच्या लिखानावरून., कारण संभाजी ब्रिगेड मध्ये मराठ्यांपेक्षा इतर जातीतील लोकं जास्त आहेत पण हे कायम मराठ्यांचा अपमान करतात ब्रिगेड च्या नावाखाली.यावरून स्पष्ट होते.

    {हिंदू धर्मात कोणत्याही जाती जातीत वाद होणे हिंदू धर्माच्या ऐक्याला बाधक आहे...}
    हा एकमेव धर्म आहे जिथे आपल्याच धर्मात आपल्याच महापुरुषांचा अपमान होतो अशाने हिंदू एक होईल का ????कधीही नाही.....

    ReplyDelete
  14. आणखी एक राहिलं शिवरायांच्या आणि मराठ्यांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी संभाजी ब्रिगेड आम्हाला मदत करणार असेल तर अम्हीही तयार आहोत त्यांना पाठिंबा द्यायला.
    कारण हिंदू आणि हिंदुस्तान यापेक्षा शिवरायांच्याच महाराष्ट्रात त्यांना न्याय मिळवून देणे आम्हाला महत्वाचे आहे.

    जय जिजाऊ । जय शिवराय ।

    ReplyDelete
  15. धाकल पाटील
    आपण अगदी योग्य बोललात . कोहम हा निसंशय ब्राह्मण आहे . आणि फक्त ब्राह्मण नाही तर जातीय विद्वेषी आणि वर्ण श्रेष्ठत्वाचा पुरस्कार करणारा ब्राह्मण आहे .
    ब्रिगेड विरोध हे त्याने पांघरलेले कातडे आहे . त्या खालून तो समस्त मराठा जातीचा विद्वेष करत असतो . त्याला जर पूर्ण मराठा जातीची बदनामी करायची नसती तर त्याने आपल्या लेखात तशी काळजी घेतली असती . मी सगळ्या मराठ्यांच्या विरोधात नाही वगैरे सफेद झूट आहे . मी या लेखावरून त्याच्या ब्लॉग वर झडलेली आमच्यातली प्रश्नोत्तरे इथे कमेंट मध्ये टाकत आहे . तिथे मी त्याला आव्हान दिले कि जर तु पूर्ण मराठा जातीच्या विरोधात नसशील तर तुझ्या लेखात एडिटिंग करून तसे बदल कर जे कि त्याने केलेले नाहीत यावरून तो मराठा विरोधीच आहे असा निष्कर्ष काढायला हरकत नाही .

    ReplyDelete
  16. भूसेजी - आपल्या उत्तरातले मुद्दे वादातीत आहेत. लेखात सर्व मराठा जातीवर टीका केली आहे असे वाटते, पण मला ब्राम्हन्द्वेशी नव-मराठा बी-ग्रेडी नेतृत्व आणि त्यांचे पाठीराखे अपेक्षित आहेत. माझ्या ब्लॉगवर आपण पाहिलात तर मी एक लेख "ब्रिगेडी थोडेसेच आहेत" असा पण लिहिला आहे. मी लेखक नाही तर एक सर्वसामान्य माणूस आहे, आणि मुद्द्यांची कित्येकदा गल्लत होते. तेव्हा खात्री बाळगा की मी मराठा जातीच्या विरुद्ध नाही तर "ब्राम्हण विरोधी" विषारी आणि हिंसाचारी प्रसार करणार्यांविषयी आहे.

    माझे पाय जमिनीवर टेकले आपला लेख वाचून, त्याच्यात शिव्या न देता कोणीतरी (आपण) आपल्याला काय खटकले ते लिहिले होते. अनिताच्या प्रेमपत्रावरील कॉमेंटस वाचल्या तर लक्षात येईल की लोक शिव्या देण्यात किंवा पाठींबा देत होते, पण पत्रात असलेल्या काही मुद्द्यांबद्दल जास्त लिहिले नव्हते. आणि कालपासून मी आपल्या ब्लॉग वरील अजून काही लेख वाचले (फेसबुक आणि जातीयवाद) लेख आवडला.

    [आता इथ जो तु मी पूर्ण मराठा समाजाच्या विरोधात नाहीचा राग आळवीत आहेस त्याचे भान तु लेख लिहिताना ठेवल असतस तर बर झाल असत.]
    हे आपले म्हणणे बरोबर आहे. मी कोणत्याच जातीच्या विरोधात नाही. राग आळवणे नसून ती खरी भावना आहे. त्यामुळेच मी खोट्या अनिताबद्दल लेख लिहिला पण खर्या लोकांच्या खर्या आयांबद्दल वाईट बोललो नाही, बोलणार नाही. आपल्या ब्लॉगवर माझ्या प्रतीक्रीयेखाली पण एकाने अशीच कोहमच्या आईची इज्जत अगदी आरामात वेशीवर टांगली आहे. पण मी त्याला किंवा इतर कोणाच्याच आईला घाणेरडे, लैंगिक, टोचणारे बोललो नाही, कारण मराठा असो वा माळी, बुद्ध असो वा इतर कोणी, त्यांची आईला मध्ये आणायचे मला काहीही कारण नाही.

    [आणि “या विकृत बुद्ध इसमाचा पर्दाफाश केला आहे” इथ थोडीशी टायपींग मिस्टेक झाली आहे. विकृत बुद्धी अस लिहायचं होत मला.
    I grant you sincerity . माझ्या लेखनात पण अश्या चुका माझ्याकडून झालेल्या आहेत.

    - कोहम

    -आणि कोहम मराठा विरोधी नाही अस सिद्ध करण्यासाठी मी त्याला दिलेले आणि त्याने न स्वीकारलेले आव्हान ...
    ..
    कोहम
    ठीक आहे . i am convince .
    तुझा हेतू मला समजला आणि तुझा प्रत्युत्तर देण्याचा अधिकारही मी मान्य करतो.
    माझा तुझ्यावरचा रोष पूर्ण निवळेल(म्हणजे सध्या काहीसा निवळला आहे) जर तु या लेखात योग्य त्या सुधारणा करशील एडिटिंग करून तसेच यापुढे तु लिहिणार असलेल्या लेखात
    फक्त व्यक्तीसापेक्ष किंवा विशिष्ट संघटनेपुरती मर्यादित टीका करशील.
    [मी कोणत्याच जातीच्या विरोधात नाही. राग आळवणे नसून ती खरी भावना आहे]
    तर तुझ्या भावना ख-या आहेत असे मी मानेन
    आणि सध्या तुझा माझ्या गुगल सर्कल मध्ये परिचित या सदरामध्ये असलेला नामोल्लेख मी मित्र या सदरात करेन.

    -सुहास

    ReplyDelete
  17. koham agodar maratha aani bramhan wad wadhlay .. mi hindutvawadi aahe .. aani raktache pani karun hinduna ekatra karayche kam kartoy pn tujhyasarkhe ek ek nalayak astat tujhya blog varcha ti post delet karun tak aatachya aata ...

    ReplyDelete
    Replies
    1. अनामिक मित्र
      तुमची हिंदुत्व एकतेची कळकळ जाणवली ...आनंद वाटला .
      आपण कोहम ला जो सल्ला दिलात तो अगदी रास्त आहे .
      त्या मराठा विद्वेषी माणसाने हा लेख डिलीट करून टाकायला हवा .

      Delete
  18. श्री. भुसे साहेब,
    हा लेख आपण ब्लॉगवरून काढून टाकावा, असे मला वाटते. तुम्ही ज्या जातीयवादी ब्लॉगरबद्दल लिहिले आहे, त्याची प्रसिद्धी या लेखामुळे होत आहे. या जातीयवादी बामनाला कसेही करून आपल्या ब्लॉगचा गवगवा करावयाचा आहे. त्यासाठी तो असे घाणेरडे लेखन करीत आहे. अशा लोकांना अनुल्लेखाने मारले पाहिजे. धाकलं पाटील आणि इतर अनेक विचारी लोक या बामनाच्या ब्लॉगवर प्रतिक्रिया देतात, तेही बंद करायला हवे.

    हा माणूस आपल्या लेखाखाली वेगवेगळ्या नावांनी स्वत:च प्रतिक्रिया लिहून वाद उभा करतो. मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी त्याचे हे सर्व उपद्व्याप सुरू आहेत. सर्वांना विनंती आहे की, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. त्याच्या कारवाया आपोआप थांबतील.

    ReplyDelete
    Replies
    1. बहुजन नेता .
      आपल्या हा लेख काढून टाकण्याविषयीच्या सल्ल्यामागची आपली कळकळ समजली .
      तथापि या हलक्या वृत्तीच्या माणसाचे उद्व्याप लोकांना समजायला हवेत म्हणून हा लेख राहू द्यावा इथे असे मला वाटते .
      तसेच अश्या लोकांना अनुल्लेखाने मारावे .
      हा आपला सल्ला ही अगदी योग्य आहे .
      हा लेख वाचल्यापासून मी शक्यतो या माणसाच्या ब्लॉग ला भेट देणे टाळतोय .
      ..
      [ हा माणूस आपल्या लेखाखाली वेगवेगळ्या नावांनी स्वत:च प्रतिक्रिया लिहून वाद उभा करतो.]
      ..
      आपले हे विधान खरे आहे . याची प्रचीती मलाही आली आहे .
      माझेही अगदी हेच निरीक्षण आहे .

      Delete
  19. कोऽहम्‌ यांची जवळपास सगळी आर्टिकल्स मी वाचलेली आहेत, आर्काईव्ह्ज मध्ये तुम्ही ती आत्ताही पाहू शकता. श्री संदीप पाटील यांनी कोऽहम्‌ यांच्या ब्लॉगवर [बहुधा गफलतीने] एक प्रतिक्रिया दिली, त्यावरून शोध घेत मी इथे आलो. [ती प्रतिक्रिया या लेखाला "बहुजन नेता" यांनी दिली आहे. काय योगायोग आहे, नाही? अस्तु.]

    पण इथे जो आक्षेप घेतले गेले आहेत त्यावर हसू आलं.

    १. ज्यांनी आईबहिणीवरून गलिच्छ शब्द वापरत अर्वाच्य टीका केली, त्यांना ती न करणं किंवा स्वतः ती काढून चांगल्या शब्दांत देणं शक्य आहे, आजही. तशी त्यांची इच्छा नसेल तर तो सदिच्छेचा अभाव लोकांना दिसतो आहे, हे ठीकच आहे.

    २. कोऽहम्‌ यांनी मराठाच काय पण कुणाच्याही कोणत्याही श्रद्धास्थळांबद्दल [संभाजी ब्रिगेडच्या आत्ताच्या अनिता पाटील, पुरुषोत्तम खेडेकर इत्यादि महान विचारवंत, तत्वज्ञ आणि इतिहासतज्ञांचा अपवाद वगळता] कधीही अपशब्द वापरल्याचं माझ्या वाचनात आलेलं नाही.

    ३. अनिता पाटील चं प्रेमपत्र जसं आहे, तसंच, आणि त्यापूर्वी लिहिलं गेलेलं एका काल्पनिक ब्राह्मण मुलीच्या प्रेमपत्राचं आर्टिकल आपण सर्वांनीच वाचलं असेल. मला तर अनिता पाटीलचे प्रेममत्र हा लेख वाचतानाही वाटलं होतं की कोऽहम्‌ यांनी त्याच लेखाचं विडंबन केलं आहे. त्या लेखावर टीका न करता या लेखावर करताना कुणीही समान दृष्टीकोनाचा आव तरी निदान आणू नये असं मला वाटतं.

    आणि सर्वात जास्त मोठा विनोद तुमच्याच मूळ पोस्ट मध्ये आहे.

    तुम्हीच म्हणता, <>

    कोऽहम्‌ यांचे अन्य लेख जर तुम्ही वाचलेच नाहीत, तर टीका कशाची करताय?! वाचा जाऊन एकदा. पाहिल्याशिवाय बोलू नये.

    शुभेच्छा.

    ReplyDelete
    Replies
    1. दुहेरी त्रिकोणी कंसाने अवतरण देण्याचा प्रयत्न केला, तो फसल्याने शेवट पुन्हा देतो आहे:

      तुम्हीच म्हणता, [[ सबंध ब्लॉगवर त्याने असे किती तारे तोडले असतील ते वाचण्याची इच्छाशक्ती आमच्यात तर नव्हती. ]]

      कोऽहम्‌ यांचे अन्य लेख जर तुम्ही वाचलेच नाहीत, तर टीका कशाची करताय?! वाचा जाऊन एकदा. पाहिल्याशिवाय बोलू नये.

      शुभेच्छा.

      Delete
    2. द्विज : ती प्रतिक्रिया माझी नव्हतीच मी दाखवत होतो कि कोहम कितीही चांगला म्हणो स्वताला पण वास्तवात काय लायकी आहे हे दाखवत होतो ती प्रतिक्रिया बहुजन नेता यांचीच होती
      असो तुमची काही चूक नाही
      [त्यापूर्वी लिहिलं गेलेलं]
      हीही ते नंतरचा होतं पाटलांनी लिहिलेला

      Delete
    3. द्विज : तुम्ही ब्राह्मण असणार कारण महापुरुषांनी म्हंटल्या प्रमाणे ब्राह्म्ण हा ब्राह्मणच असतो त्यांच्या कडून कोणत्याही प्रामानिकपणाची अपेक्षा करू नये.
      आता तुमचे मुद्दे :
      *{कोऽहम्‌ यांनी मराठाच काय पण कुणाच्याही कोणत्याही श्रद्धास्थळांबद्दल}
      अजब आहे ! लेखात तर मला कौतुक केल्याचे दिसले नाही लिहिले आहे ते काय आहे ?
      {तसंच, आणि त्यापूर्वी लिहिलं गेलेलं एका काल्पनिक ब्राह्मण मुलीच्या प्रेमपत्राचं }
      हे पत्र आहे हे काल्पनिक आहे पण जबर झटका बसला विरोधींना.आणि कोहम ने पत्र कोहम ला अनिताने पत्र १ सप्टेंबर ला लिहिलं होतं आणि मला सायली ने ८ डिसेंबर ला लक्षात ठेवा.

      ब्रिगेडी लोकांच्या नावाखाली मराठ्यांचा अपमान करून काहीही साध्य होणार नाही.कारण मराठ्यांची शक्तिस्थळे त्यांचे कायम रक्षण करतील तुम्ही कितीही लिहा.
      १११ >तुम्ही आमच्याशी प्रत्येक्षात दोन हात करू शकत नाही आणि आता लेखनीही चालवू शकत नाही आमच्यावर कारण आम्ही आहोत सडेतोड उत्तर द्यायला मग बघु काय होतं ते.

      *************
      कोहम ने दुसरे पत्र लिहिले तेंव्हा मला १६ इमेल आले आहेत प्रत्युत्तरासाठी पण मला हा लेख बरा वाटला कारण धर्मरक्षण करणारे मराठे धर्मांतर कसे करतील ? होय किनी ?
      जिथे जिथे ,मराठ्यांचा अपमान होईल तिथे तिथे मी इंथ का जवाब पत्थरसे द्यायला तयार आहे विसरू नका.
      जय महाराष्ट्र !

      Delete
    4. द्विज महोदय
      आपण केलेले कोहम चे लंगडे समर्थन आणि शब्द खेळ (किंवा शब्द छल ) पाहून
      आम्हालाही अंमळ हसूच आले .
      १. कोहम ला ज्या इरसाल शिव्या बसल्या आहेत त्या निव्वळ एका विकृतीला
      बसलेल्या जशास तसे या न्यायाने प्रत्युतरादखल आहेत.
      आपण आपल्या ब्लॉग वर एखादी अपमानजनक टिपण्णी आल्यास रिमुव्ह करू
      तथापि कोहम ने तसे न करण्याचे कारण म्हणजे
      आपण कसे सोज्वळ आहोत व इतर कसे टाकावू
      आहेत अशी शेखी मिरवता यावी .
      वस्तुत: वरच्या लेखात इतके खालच्या पातळीवर जाऊन जातीवाचक
      विकृत लिखाण करून त्याने अशी शेखी मिरवावी यातच त्याचा ढोंगी स्वभाव दिसून येतो .
      २. कोहम ने मराठ्यांवर टीका केलेली नाही ????
      एक तर आपली आकलन शक्ती कमजोर दिसते
      किंवा आपण इतरांना मुर्ख समजणारे दिसता .
      इतके ढळढळीत जातीवाचक विकृत लिखाण करून आपण ते फक्त खेडेकर
      किंवा तद्दन लोकांवरील टीका आहे म्हणत असाल
      तर आपले विधान निव्वळ हास्यास्पद सदरात मोडते .
      ३. आपण ज्या ब्राहमण मुलीच्या प्रेमपात्राबद्दल बोलत आहात
      ते कोहमच्या विकृतीला प्रत्युतर म्हणून अर्थातच
      त्याच्या लिखानानंतर लिहिले गेले आहे. आपण दोहोनवरील दिनांक तपासून पहावेत .
      ४. कोहम चे इतर लेख वाचण्याबाबत – शितावरून भाताची परीक्षा होते .
      असले विकृत लिखाण वाचून वेळ वाया घालवणे आम्हाला पटणे शक्य नाही .

      Delete
  20. koham mohak kahi tharavik lokan mule sagalya purn jatila badnam karu nakos , hich vinanti

    ReplyDelete
  21. bhuse saheb va,va khupac chhan.

    ReplyDelete