About

Saturday 20 October 2012

चार्वाक दर्शन २ : प्रखर बुद्धीप्रामाण्यवादी तत्वज्ञ -चार्वाक



चार्वाक हे कोणी एक व्यक्ती होते कि ती एक उपाधी होती कि जडवादी परंपरेतील सर्वच अनुयायांना चार्वाक म्हणत असत याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. पण हे चार्वाक दर्शन हिंदू परंपरेत सर्वात जास्त महत्वाचे गणले गेले आहे आणि इतर कोणत्याही तत्वज्ञानाची झाली नाही इतकी चार्वाक तत्वज्ञानाची चर्चा हिंदू धर्मशास्त्रात झाली आहे. चार्वाकांचे तत्वज्ञान हे देव आणि धर्म यांच्या नावावर लोकांचे शोषण करणा-यांसाठी इतके धोकादायक होते कि नंतरच्या काळातील जवळ जवळ सर्व विचारधारांना चार्वाक मताचे खंडण करणे महत्वाचे वाटले आहे. उपनिषदे ,बादरायणाची ब्रह्मसूत्रे आदी अनेक ग्रंथात चार्वाक मताचे खंडन केले गेले आहे. साधारणत: इ.स. ६ व्या शतकापर्यंत चार्वाक मतावर खंडण-मंडनाची ही परंपरा सभ्य आणि सुसंस्कृत चाकोरीतून गेलेली दिसते. त्याचे खंडन करण्याचा प्रयत्न करणारांनी देखील चार्वाक विचारांचा सन्मानच केलेला दिसतो.

महाभारतातील वनपर्वात द्रौपदी एक जुनी आठवण सांगताना म्हणते कि माझ्या पित्याने मला चार्वाक दर्शनाचे शिक्षण देण्यासाठी ह्या तत्वज्ञानातील अधिकारी व्यक्तीची नियुक्ती केली होती. आता राजा द्रुपदासारखा एक तात्कालिक मान्यवर राजा आपल्या कन्येला शिक्षण देण्यासाठी चार्वाक संप्रदायाच्या गुरुची निवड करतो म्हणजे त्या काळात चार्वाक परंपरा निश्चितच प्रतिष्ठित आणि लोकमान्य राहिलेली असणार. पाणिनीने चार्वाक दर्शनाला अन्विक्षकी शास्त्रात स्थान दिले आहे. कृषी ,उत्पादन ,ऐहिक जीवन ,अर्थ अशी जीवनस्पर्शी शास्त्रे अन्विक्षकी शास्त्रात येतात. यावरूनही आपल्याला चार्वाक दर्शनाचे तात्कालिक महत्व लक्षात येते. आद्य शंकराचार्यांनीदेखील चार्वाक दर्शनाचा सन्मानच केला आहे. शंकराचार्य म्हणतात की चार्वाकमत हे  सर्वसामान्य जनतेचे मत आहे.  शंकराचार्यांचा समकालीन असलेला जैन विचारवंत हरिभद्र म्हणतो, इंद्रियांच्या प्रत्ययाला येणारे जगत् व पदार्थसमूह म्हणजे लोक. हा लोक ज्या तत्वज्ञानाचा आधार आहे ते म्हणजे लोकायत. कौटिल्याने त्याला आपल्या तर्कशास्त्रात स्थान दिले आहे.  या सर्व संदर्भांवरून असे लक्षात येते साधारण यापूर्वीच्या सर्व विचारवंतांना चार्वाकांचे विचार मान्य होते. मात्र इ.स ६ व्या शतकानंतर मात्र या विचारांची टवाळी सुरु होऊन हे विचार दाबण्याचा प्रयत्न झाला. 



Dropadi by Raja Ravivrma


चार्वाकांचे तत्वज्ञान


चार्वाक प्रत्यक्ष हेच प्रमाण मानतात. जी गोष्ट दिसत नाही वा जिचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही अशी कोणतीही गोष्ट मान्य करण्यास त्यांचा कडवा विरोध आहे. तात्कालिक धर्म परंपरा ही मोक्ष ,मुक्ती ,स्वर्ग अश्या कल्पनांच्या मागे धावत होती. उपवास ,व्रतवैकल्ये ,जपजाप आणि कडक कर्मकांड ... आणि एकूणच शरीराला कष्टवणारी धर्मसाधना म्हणजेच धर्माचरण असा लोकांचा समज करून देण्यात आला होता. अशी कडकडीत साधना करणे वा इंद्रियनिग्रह म्हणजे स्वर्गात आपली जागा राखून ठेवण्याचा राजमार्ग. चार्वाकांना मृत्यनंतरच्या तथाकथित सुखांसाठी जीवनाकडे पाठ फिरवणारी ही फोल विचारसरणी अमान्य होती. त्यांनी आत्म्याचे अस्तित्व अमान्य केले. स्वर्ग-नरक असल्या कल्पनांना केराची टोपली दाखवली. मृत्यू म्हणजेच मुक्ती हे तत्वज्ञान त्यांनी मांडले.

चैतन्य हा आत्म्याचा गुण आहे. तथापि आत्मा नावाची कोणती गोष्ट अस्तित्वात असल्याचे प्रमाणासहित सिद्ध करता येत नाही . त्यामुळे अंतत: हा शरीराच गुण होतो. शरीर संपले कि चैतन्य संपले. सारे काही संपले. याची सिद्धता त्यांनी तीन प्रकारे मांडली.

१)     तर्क
२)    अनुभव
३)    आयुर्वेद शास्त्र


तर्क – चार्वाक मानतात कि शरीर जोवर असते तोवरच त्यात चैतन्य खेळत असते. जेव्हा शरीर नष्ट होते तेव्हा हे चैतन्य कोठे दिसत नाही वा त्याचे मृत्यूपश्चातचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही. या अनुषंगाने पाहीले असता शरीर हाच आत्म्याचा एकमेव आधार आहे अर्थात आत्मा म्हणजेच शरीर.


अनुभव- मी स्थूल आहे, मी दुर्बल आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, मी निष्क्रीय आहे, मी ताकदवान आहे, असे अनुभव आपल्याला पावला-पावलाला येत असतात. स्थूलता-दुर्बलता इत्यादी शरीराचे धर्म आहेत आणि ‘मी’ देखील शरीराचाच धर्म आहे. पर्यायाने आत्मा म्हणजेच शरीर.


आयुर्वेद शास्त्र- ज्या प्रकारे गुळ आणि मोहरी यांच्या मिश्रणात कालांतराने विशिष्ट परीस्थितीमुळे मादक गुणधर्म तयार होतात, ज्याप्रमाणे दही, पिवळी माती आणि शेण यांच्या मिश्रणात कालांतराने विंचू उत्पन्न होतात, ज्याप्रमाणे कात, चुना, सुपारी, पान यांचे सुयोग्य मिश्रण मुखात लालीमा उत्पन्न करते त्याचप्रमाणे चार महाभूतांचे विशिष्ट मिश्रण विशिष्ट परिस्थितीमध्ये चैतन्याच्या निर्मितीस कारणीभूत होते. चार्वाक हे फक्त पृथ्वी, तेज, जल, वायू ही चार महाभूते मानतात. आकाश हे महाभूत आहे हे त्यांना मान्य नाही. इथे निर्दिष्ट करण्याची बाब म्हणजे चार्ल्स डार्विन ने सजीवांच्या उत्पत्तीचे हेच कारण आपल्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतांत मांडले आहे. विशिष्ट पोषक परिस्थितीत सजीवांची उत्पत्ती झाली हा त्याचा सिद्धांत चार्वकांनी फक्त काही हजार वर्षापूर्वी या भारतभूमीत मांडला होता. इथेच त्यांचे श्रेष्ठत्व आणि वैज्ञानिक दृष्टीकोन अधोरेखित होतो.
    
हे अंतर्गत घटकांचे प्रमाण बिघडले कि शरीरात निर्माण झालेले हे चैतन्य नाश पावते, देह-आकार नष्ट होतात हाच मृत्यू. आत्मा हा शरीराहून वेगळा आहे, तो या देहात येतो जातो असे मानणे वेडगळपणाचे आहे असे चार्वाकांचे स्पष्ट मत आहे.


आकारामुळे निराकाराचा भास होतो. वस्तुत: निराकार असे काही नाही. फक्त आकारच आहे. उदा अचानक उमटलेल्या ध्वनिमुळे आधी शांतता होती असा भास होतो. शांतता असे काही नसते.

चारी पुरुषार्थात मोक्ष हा पुरुषार्थ सर्व श्रेष्ठ मानला जातो. चार्वाकांना धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ मान्य नाहीत. ते फक्त अर्थ आणि काम हे दोनच पुरुषार्थ मानतात. धर्म आणि मोक्ष यांना चार्वकांनी बाद ठरवले आहे. पण धर्माला नाकारताना ते पारलौकिकाचे फळ देणारे साधन आहे म्हणून तो नाकारला आहे . चार्वाकी विचारसरणीला पारलौकिकाचे वावडे आहे.



यज्ञ म्हणजे वेळ आणि द्रव्य यांचा अपव्यय, एक व्यर्थ कर्मकांड असे चार्वाक मानतात. चातुर्वण्य व्यवस्थेला देखील चार्वकांनी कडवा विरोध केला. कथित ऐतिहासिक रित्या येणारी वंशशुद्धी आणि तिच्यामुळे येणारा अहंकार यावर चार्वकांनी कठोर टीका केली. वंश शुद्धी ही वस्तुस्थिती नसून एक आभास आहे. समाजातले आपले उच्च स्थान टिकवण्यासाठी केलेला अपप्रचार आहे असे चार्वाक मानतात.







चार्वाकांविषयी केल्या गेलेल्या अपप्रचारामुळे चार्वाक हे अयोग्य आणि अनीती पसरवणारे तत्वज्ञान सांगतात अशी अनेकांची समजूत झालेली दिसते. तथापि चार्वाक कोणतीही अयोग्य गोष्ट सुचवत नाहीत. उलट चोरी, मद्यप्राशन, पशुहत्या, हिंसा इत्यादी गोष्टींचा त्यांनी धिक्कार केला आहे.  धर्माच्या नावाखाली लोकांचे शोषण करणारे पुरोहित हे चार्वाकांचे खरे टीकाविषय आहेत. लोकांचे रक्त पिवून जगणा-या असल्या लोकांचा त्यांना प्रचंड तिटकारा आहे. माणसाने लबाडी करू नये, कोणाचे शोषण करू नये, आयत्या पिठावर रेघोट्या ओढू नयेत. कष्ट करावे, शेती करावी, प्रामाणिक पणे श्रम करून अर्थार्जन करावे आणि काव्य संगीत कला नृत्य यांचा आस्वाद घेत सुखनैव जीवन कंठावे असा रोकडा सल्ला ते सामान्यांना देतात. दंडनिती, राजकीय स्थैर्य यातून लोक नियंत्रण करीत शासकांनी स्वार्थ बुद्धी त्यजून लोकांचे आणि एकूणच समाजाचे हित साधावे असे ते सुचवतात.

       कृषीगोरक्ष वाणिज्यदंडनित्या दिभी: बुधै :
एतेरैव सदोपायैतुर्भोगाननुभवेदृवि


(क्रमश:)

-सुहास भुसे

38 comments:

  1. >>अनुभव- मी स्थूल आहे, मी दुर्बल आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, मी निष्क्रीय आहे, मी ताकदवान आहे, असे अनुभव आपल्याला पावला-पावलाला येत असतात. स्थूलता-दुर्बलता इत्यादी शरीराचे धर्म आहेत आणि ‘मी’ देखील शरीराचाच धर्म आहे. पर्यायाने आत्मा म्हणजेच शरीर.<<

    हा शरीराचा नित्य स्वभाव नक्कीच नाही. मनाया वरवच्या स्वभावावर जाऊ नका. अभुभवाच्या स्तरावर पहायचेच झाल्यास वरवर मनाला एक ठोस असे वाटणारे असे शरीर वास्तवीक एक उर्जामय क्षेत्र आहे . थोडक्यात मनाला जो अनुभव होतो तो तसाच असेलच असे नाही आणि नेमके हेच आजचे क्वांटम फिजीक्स सांगते.

    ReplyDelete
    Replies
    1. सुरज देह आणि आत्मा ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत असे स्पष्ट प्रतिपादन गीतेत केले आहे.जसे आपण वस्त्र जीर्ण झाल्यावर ते टाकून नवे धारण करतो तसेच आत्माही देह जीर्ण होताच त्याचा त्याग करून नवीन देह धारण करतो हे कृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे.तू गीता वाचू शकतोस .ह्यातच पुनर्जन्म सिद्द्थांत मांडलेला आहे.आता कृष्ण अवतार घेतो असे का म्हटले आहे तर तो स्वेच्चेने सवताच्या मायेने अवतार घेतो .असे सामर्थ्य फक्त कृष्ण शंकर,गणेश,दत्त इत्यादीनाच आहे आणि हयान जगात विशेष मान आहे .इतरांना कर्मानुरूप जन्म घ्यावा लागतो.चार्वाकी तत्वज्ञान ह्या गोष्टीना विरोध करत असले तरी त्यात काही दम नाही.देह सोडून बाहेर पडणे म्हणजे विदेह होणे मीही दोन वेळा हा अनुभव घेतला आहे.नंतर मी प्रयोग बंद केले.त्यामुळे देह आणि आत्मा हे वेगळे तर आहेतच शिवाय ह्या देहाच्या आणि आत्म्याच्या मध्ये पंच कोश असतात ते जो ओलांडून जातो तो थेट आत्म्यापर्यंत पोहोचतो आणि देह सोडल्यावर आत्मा हा निर्गुणाशी ब्रम्हाशी एकरूप होतो.त्यानंतर पुनर्जन्म होत नाही.जर मधल्या कोणत्या कोशापर्यंत गेला तर दिव्यलोकी पुण्यफले भोगायला जाऊन पुनर्जन्म घेतो.त्याचेही प्रकार कृष्णाने गीतेत सांगितले आहेत.आणि चार्वाक आणि कृष्ण ह्यात मला श्रीकृष्ण हाच विश्वसनीय वाटतो.

      Delete
    2. माझे मित्र
      श्री अभिराम दिक्षित , पुणे
      यांनी केलेली कमेंट काही तांत्रिक कारणाने इथे प्रकाशित होऊ शकली नाही तरी माझ्या इनबॉक्स मधून ती इथे पोस्ट करत आहे .
      ..
      ..
      सूरजः आजचे क्वांटम फिजिक्स असे काहीही सांगत नाही.
      तो विंग कमांडर ओक आणी त्याचा येडा गुरू या दोघांचा नाद सोड.
      सावरकर आणी आगरकर वाच.

      सुहासजी उत्तम लेख

      Delete
    3. प्रत्यक्ष प्रमाण याचा अर्थ फक्त मानवी संवेदना असा अर्थ होत नाही, सूरज. तसं झालं तर आंधळा मनुष्य सर्वच गोष्टींचे दृष्य अस्तित्व नाकारू शकेल. उत्क्रांतींच्या काळात मानवाने असंख्य संवेदना गमावल्या आहेत.. त्या परत मिळवणे केवळ आणि केवळ विज्ञानाच्या सहाय्याने शक्य आहे. आपल्या दृष्टीच्या मर्यादा आपण दूर्बीण आणि सूक्ष्मदर्शकाच्या सोबतीने पार करून जातो. तसंच इतर ज्या संवेदनांच्या मर्यादा आहेत त्यांच्या पलीकडे जाण्यासाठी धर्मग्रंथांची नव्हे तर वैज्ञानिक दृष्टीकोन आणि प्रयोगशीलतेची कास धरायला हवी.

      Delete
  2. सुरज महाजन जी
    आपण मनाच्या गुंतागुंतीच्या आणि जटील व्यापाराविषयी बोलत आहात.
    आत्मा आणि मन या दोन वेग वेगळ्या संकल्पना आहेत .
    चार्वकांनी यावर खूप विचार केला आहे. अनेक प्रयोग केले आहेत .
    त्यांनी आत्म्याच्या शोधार्थ नाना शास्त्रीय प्रयोग देखील केले आहेत .
    माझ्या पुढील लेखात मी ते निर्दिष्ट करेन .
    आत्मा ही एक अशी संकल्पना आहे कि त्याचा पुरावा कोणीही देऊ शकत नाही .
    आणि ज्याचे प्रत्यक्ष प्रमाण देता येत नाही तेथे चार्वाक प्रत्यक्षावर आधारित अनुमान प्रामाण्य देखील स्वीकारतात .
    तथापि या पद्धतीने देखील आत्म्याचे अस्तित्व आपणास सिद्ध करता येत नाही .
    आणि ज्याचे प्रमाण देता येत नाही अशी कोणतीही गोष्ट चार्वाकांना मान्य नाही .
    ..
    अर्थात इथे आत्मा आणि त्याचे पारलौकिक जीवन यांच्या आहारी जाऊन धर्माने केलेली वास्तव जीवनाकडील डोळेझाक हे चार्वाकांचे आत्मा ही संकल्पना नाकारण्याचे मूळ कारण आहे हे आपण ध्यानात घेतले पाहिजे .

    ReplyDelete
  3. खूप वादाचा व चर्चेचा विषय

    ReplyDelete
    Replies
    1. नक्कीच अविनाश
      हा विषय खुपच व्यापक आणि विस्तृत आहे .
      धर्मांच्या स्थापने पासून यावर वादविवाद सुरु आहेत आणि होतच राहतील .

      Delete
  4. Suhasji sahavya shatkat kontya rajane charvak sanhita nasht keli te aata sapraman sanga.Karan aadvalnane bolane khup zale.Tumhi jya rajancha ullekah kela aahe te sarv yadnych karat hote nastik vicharanche navhte evdhe mi tumhala nishchit purave dile aahet.Vatlyas shlok sarg adhyaya deto.Pan tumhihi te kele pahije.Charvak mat he kadhich samajala ruchale nahi karan deh aani aatma he vegale aahet he sarvach vidwanani sangitale aahet jyat Shreekrushnbhagvanancha hi samvesh hoto.Tich gosht punarjanmavishayihi aahe.Yadny ha paishyacha apvyay nahi hehi mi tumhala puratan udaharne deun sangitale aahe.Aaj jase ekhadya mothya mansavar tika karun prasiddhi karun ghyaychi anekana haus aste taslich charvakala hoti mhanun tyane tassa prayatn karun pahila pan to fasala aani tyachi ekhi gosht lokani swikarli nahi karan tevha congressche rajy navhte.Charvak motha ki ShreeKrushn he sangnyasathi kontya pracharyachi garaj nahi.Yadnyatun janmala aalelya mulila shikvayala drupad raja yadny mhanje murkhpana ase mhananaryala thevel he tark susangat nahi.

    ReplyDelete
    Replies
    1. स्यामंतक बांदेकर जी
      [ Suhasji sahavya shatkat kontya rajane charvak sanhita nasht keli te aata sapraman sanga.Karan aadvalnane bolane khup zale. ]

      मी आडवळणाने बोलत नाहीये. आपल्या सर्व धार्मिक विचारधारांचे ग्रंथ उपलब्ध आहेत. तथापि चार्वाक दर्शनाचा एक ही ग्रंथ उपलब्ध नाहीये .शिवाय चार्वाक मत हे धर्म कल्पनांच्या मुळावरच घाव घालणारे असल्याने त्याला धर्ममार्तंडाचा होणारा विरोध उत्तर वैदिक काळात वाढला होता . यावरून चार्वाकांचे वांगमय नष्ट केले गेले असावे असा तर्क केला आहे .
      आणि कोणत्याही राजाचा मी उल्लेख केला नाहीये. हे काम धर्माची सूत्रे ज्यांच्या हातात होती अश्या लोकांनी केले असावे कारण चार्वाक मत त्यांच्या हित संबंधांना बाधा आणणारे होते . अर्थात हा एक तर्क आहे .

      Delete
  5. Moksh aani Yadnyadi goshtina sarv shreshth purushani jyat ramkrushnhi yetat tyani manyat dili aahe.Tyani jagal sankatmukt kele charvakane ase kahi kele nahi .Shreeramani ravanputr ajinky hou naye mhanun tycha yadny modayachi adnya lakshmanala bibhishanachya suchanevarun dili hoti aani tohi yuddhachya ain dhumschakrit yadnyala basala yavarun yadnyache mahtv lakshat yete.Dusare mhanje Mokshala dekhil pratyek vidwanane manyata dili aahe.Aata mahabharatatalya kontya adhyaytil kitvaya sargatalya kontya shlokat draupadine aaplya pityane charvaki guruchi nemnuk keli hoti te sandarbhasahit dya.Ulat drupad raja ha swataha yadny karat hota.Drushtdyumn aani draupadi hyanacha janmach muli yadnyatun zala hota.Tyamule drupad raja asle nastik vichar sanganarya guruchi nemnuk karel ase kahi vatat nahi.Pan tumhi evadhe bolatach aahat tar shlok/ sarg/adhyay dene mazyakade mahabharat aahe mi tapasun baghato.Shankaracharyani charvaki vichar sarvsamanyanche vichar ahet ase mahtale hyacha arth asa hoto ki tyakalat far dambhikpana pasarla hota aani tyachach prativad karayala Shivane Shankrachary ha avtar ghetala hota.Tevha lokana bhrast margavarun mul margavar aannyache kaam tyani kele.Charvak darshanacha kahich upyog naslyane te mage padle hech khare aahe .Charvakane konta granth lihila kinva koni tyacha granth jalala asa kontahi ullekh kuthehi nahi.Asle takladu darshan satyachya kasotivar utarle naslyane konich swikarale nahi.

    ReplyDelete
    Replies
    1. ek computer chalu karayala vij lagate tyach pramane deh chalavayala suddha shaktichi garaj asate toch atma ahe ase vatyate. coputer he jar sharir asel tar vij ha tyacha atma ahe

      Delete
    2. sann
      आपल्या नावाचा मराठी उच्चार नेमका माझ्या ध्यानात आला नाही म्हणून इंग्रजीत लिहीत आहे .
      आपण विजेचे चांगले उदाहरण दिलेत .
      यालाच चार्वाक चैतन्य म्हणतात कारण विजेचे अस्तित्व सप्रमाण सिद्ध करता येते .

      Delete
    3. [.Shreeramani ravanputr ajinky hou naye mhanun tycha yadny modayachi adnya lakshmanala bibhishanachya suchanevarun dili hoti aani tohi yuddhachya ain dhumschakrit yadnyala basala yavarun yadnyache mahtv lakshat yete ]
      .
      [Drushtdyumn aani draupadi hyanacha janmach muli yadnyatun zala hota.Tyamule drupad raja asle nastik vichar sanganarya guruchi nemnuk karel ase kahi vatat nahi. ]

      स्यामंतक जी
      जुन्या काळात यज्ञ हा शब्द वेगळ्या अर्थाने वापरला जात होता असे मला वाटते .
      आपण संदर्भासाठी याच ब्लॉग वरील हिंदू धर्म : कर्मकांडाचा अतिरेक हा लेख पहा.
      यज्ञ म्हणजे यत् + ज्ञ = ज्यातून ज्ञान येते तो यज्ञ . अर्थात नवीन वैज्ञानिक परिभाषेत प्रयोग .
      द्रौपदी, धुष्टदुम्न्य , द्रोण , कृप ,कृपी ही सर्व यज्ञोत्पन्न बालके होती. हे प्राचीन काळातील प्रगत तंत्रज्ञान होते .
      हा प्राचीन टेस्ट ट्यूब बेबी चा अविष्कार होता असे काही तज्ञांचे मत आहे .
      मी यावर एक सविस्तर लेख लिहिणार आहे .
      आपणास ई मेल करून सूचित करेन .

      Delete
  6. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  7. सुरज देह आणि आत्मा ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत असे स्पष्ट प्रतिपादन गीतेत केले आहे.जसे आपण वस्त्र जीर्ण झाल्यावर ते टाकून नवे धारण करतो तसेच आत्माही देह जीर्ण होताच त्याचा त्याग करून नवीन देह धारण करतो हे कृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे.तू गीता वाचू शकतोस .ह्यातच पुनर्जन्म सिद्द्थांत मांडलेला आहे.आता कृष्ण अवतार घेतो असे का म्हटले आहे तर तो स्वेच्चेने सवताच्या मायेने अवतार घेतो .असे सामर्थ्य फक्त कृष्ण शंकर,गणेश,दत्त इत्यादीनाच आहे आणि हयान जगात विशेष मान आहे .इतरांना कर्मानुरूप जन्म घ्यावा लागतो.चार्वाकी तत्वज्ञान ह्या गोष्टीना विरोध करत असले तरी त्यात काही दम नाही.देह सोडून बाहेर पडणे म्हणजे विदेह होणे मीही दोन वेळा हा अनुभव घेतला आहे.नंतर मी प्रयोग बंद केले.त्यामुळे देह आणि आत्मा हे वेगळे तर आहेतच शिवाय ह्या देहाच्या आणि आत्म्याच्या मध्ये पंच कोश असतात ते जो ओलांडून जातो तो थेट आत्म्यापर्यंत पोहोचतो आणि देह सोडल्यावर आत्मा हा निर्गुणाशी ब्रम्हाशी एकरूप होतो.त्यानंतर पुनर्जन्म होत नाही.जर मधल्या कोणत्या कोशापर्यंत गेला तर दिव्यलोकी पुण्यफले भोगायला जाऊन पुनर्जन्म घेतो.त्याचेही प्रकार कृष्णाने गीतेत सांगितले आहेत.आणि चार्वाक आणि कृष्ण ह्यात मला श्रीकृष्ण हाच विश्वसनीय वाटतो.

    ReplyDelete
  8. चार्वाकामध्ये दिव्यदर्शन करायची पात्रता नव्हती .आज डोळ्यांना दिसत नाही ते काहारे नाही असे मानायचे म्हटले तर visible specturm पलीकडील प्रत्येक गोष्ट खोटी मानवी लागेल .पण तसे नाही .अजूनही अनेक गोष्टी अश्या आहेत ज्यांचे ज्ञान होत नाही .सर्व रेपोर्त्स नॉर्मल असतात पण माणूस आजारी असतो .म्हणजे चार्वाक त्याला निरोगीच म्हणणार .पुण्यात बसून तुळजापूरच्या जमिनीतले पाणी दिसत नाही म्हणजे तिथे पाणी नाही असेच चार्वाक म्हणणार .पृथ्वीवर बसून मंगल गुरुवारची स्थिती दिसत नाही म्हणजे असे काही नाहीच असे चार्वाक म्हणणार .पण ह्या गोष्टी पुण्यातले एक डॉक्टर Dr .वर्तक पाहून आले .शरीर सोडून .मंगळवारच्या 21 पैकी 20 गोष्टी सत्य निघाल्या .Vaikingne ते सिद्ध केले 21 वा मुद्दा शास्त्रज्ञाना अजून सापडला नाही .म्हणजे 100% result बरोबर .मग आम्ही नास्तिक चार्वाकाला का मानावे .असेच प्राचीन काळी झाले .चार्वाकाचा कोणताच ग्रंथ सापडत नाही कारण आधी त्याने लिहिला का हा प्रश्न आहे ?दुसरे म्हणजे लिहिला असल्यास जतन करायच्या लायकीचा नसल्याने त्याला लोकांनी स्वीकारले नाही आणि चार्वाक मेल्यावर पुढे प्रती निघाल्या नाहीत .

    ReplyDelete
    Replies
    1. स्यमंतक जी
      चार्वाक प्रत्यक्ष प्रमाण आणि सोबतच अनुमान प्रामाण्य देखील मान्य करतात .
      यासंदर्भात मी पुढील लेखात सविस्तर लिहीन .
      सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत पण माणूस आजारी आहे .
      म्हणजे त्याचे अचूक निदान अजून व्हायचे आहे .
      नेमक्या गोष्टीचा रिपोर्ट अजून मिळायचा आहे .
      म्हणजेच त्याचे अचूक निदान करणे सध्याच्या शास्त्राला शक्य नाही असाच निष्कर्ष चार्वकांनी काढला असता.

      Delete
  9. Suhasji,मग स्वर्ग खोटा असे कसे म्हणता येईल.त्याचा राजा इंद्र ह्याने आपले शत्रू निवत कवच ह्यांना मारायला अर्जुनाला पाठविले होते.हेही वनपर्वात लिहिले आहे.मग चार्वाकाचा उल्लेख प्रक्षिप्त वाटतो असे म्हणता येईल.नंतर कोणीतरी घुसडला असेल.चार्वाकाचा काल कोणता हेही सांगू शकत नाही कोणी.द्रौपदीचा नवरा अर्जुन स्वतः स्वर्गात ५ वर्षे राहून इंद्राकडून ज्ञान मिळवून आला होता जे त्याला द्रोणांनी दिले नव्हते.

    ReplyDelete
    Replies
    1. swarg narak vagere sudha tya kalache ithlich bhumichie bhag asatil

      Delete
    2. sann
      आपला हा विचार अगदी योग्य वाटतो .
      अधिक वास्तव वादी आहे .
      या विषयावर ...म्हणजे चमत्कार वगळून महाभारत ...एक कादंबरी वाचल्याचे आठवते ..
      बहुधा पर्व नावाची कादंबरी होती .
      लेखिकेने अगदी हाच दृष्टीकोण मांडला आहे त्यात .

      Delete
    3. [ .मग चार्वाकाचा उल्लेख प्रक्षिप्त वाटतो असे म्हणता येईल.नंतर कोणीतरी घुसडला असेल.]
      ठीक आहे
      स्यमंतक जी
      आपण सोयीस्कर रित्या या उल्लेखाचा विषय सोडू तात्पुरता .
      पण मी लेखात अन्य काही संदर्भ दिले आहेत . त्यांच्या बद्दल आपले काय मत आहे . आपल्यासाठी पुन्हा एकदा उदृक्त आणि विस्तृत करत आहे ते संदर्भ ...
      ..
      पाणिनीने चार्वाक दर्शनाला अन्विक्षकी शास्त्रात स्थान दिले आहे. कृषी ,उत्पादन ,ऐहिक जीवन ,अर्थ अशी जीवनस्पर्शी शास्त्रे अन्विक्षकी शास्त्रात येतात. यावरूनही आपल्याला चार्वाक दर्शनाचे तात्कालिक महत्व लक्षात येते. आद्य शंकराचार्यांनीदेखील चार्वाक दर्शनाचा सन्मानच केला आहे. शंकराचार्य म्हणतात की चार्वाकमत हे सर्वसामान्य जनतेचे मत आहे. शंकराचार्यांचा समकालीन असलेला जैन विचारवंत हरिभद्र म्हणतो, ‘ इंद्रियांच्या प्रत्ययाला येणारे जगत् व पदार्थसमूह म्हणजे लोक. हा लोक ज्या तत्वज्ञानाचा आधार आहे ते म्हणजे लोकायत.’ कौटिल्याने त्याला आपल्या तर्कशास्त्रात स्थान दिले आहे. या सर्व संदर्भांवरून असे लक्षात येते साधारण यापूर्वीच्या सर्व विचारवंतांना चार्वाकांचे विचार मान्य होते.
      .
      आणखी काही संदर्भ घ्या ..
      पाचव्या शतकात झालेल्या बुध्दघोषाने ‘लोक म्हणजे ईहलोक व तो ज्यांच्या विचारसरणीचा आधार आहे ते लोकायित’ असे म्हटले आहे. दुसऱ्या शतकातील दिव्यावदान सुत्तात जनतेत रुढ असलेले मत ते लोकायत असे म्हटले आहे. त्याआधी विनयपिटकात, कात्यायनाच्या ग्रंथात आणि पातंजलीतही लोकायतमताचा असाच उल्लेख आहे.

      Delete
  10. चार्वाक प्रत्यक्ष हेच प्रमाण मानतात. जी गोष्ट दिसत नाही वा जिचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही अशी कोणतीही गोष्ट मान्य करण्यास त्यांचा कडवा विरोध आहे
    ase asel tar charvak anu renu yana sudhha mananar nahit karan yanche asthitwa suddha sahaj dakhavata yet nahi science nusar te ata shakya ahe tasech atmyache asthitwa pan dakhavane kahi varshani shakya hoil

    ReplyDelete
    Replies
    1. sann
      आपण प्रत्यक्ष असणे आणि प्रत्यक्ष दिसणे
      यात गल्लत करत आहात .
      एखादा सिद्धांत मांडताना शब्दांचा वापर काळजीपूर्वक केला जातो .
      आणि चार्वकांनी तो केलेला आहे .
      अणु रेणु नुसत्या डोळ्यांनी दिसत नसले तरी त्यांचे अस्तित्व प्राचीन भारतीय परंपरेला ज्ञात होते .
      कणाद महर्षींनी ते सिद्ध केले आहे .
      आणि चार्वाक त्याच विज्ञान जडवादी परंपरेचे पाईक आहेत .

      Delete
  11. सूरजः आजचे क्वांटम फिजिक्स असे काहीही सांगत नाही.
    तो विंग कमांडर ओक आणी त्याचा येडा गुरू या दोघांचा नाद सोड.
    सावरकर आणी आगरकर वाच.

    सुहासजी उत्तम लेख

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अभिराम जी

      Delete
  12. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  13. वरील लेख वाचला, कमेंट्स हि वाचल्या , जे विचारवंत देह आणि आत्मा हि संकल्पना मनात रुजवतात, समाज सजवतात , स्वर्ग नर्क , पाप पुण्य हे मानतात त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचे प्रमाण द्यावे, ना इतिहासात न वर्तमानात असा कोणी बुद्धीजीवी होऊन गेला ज्याने हे प्रमाण सिद्ध केले आहे .

    उत्तम लेख सुहास जी

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर पोपट.
      चार्वाक हे जड वादी विचारवंत आहेत.
      त्यांचा प्रत्येक सिद्धांत ते सिद्ध करू शकतात कारण मुळात तो जडवादावर आधारित आहे .
      आणि त्याचे चार्वाक वादी पुरावे ही देऊ शकतात.
      पण शक्य नाहीये ते पार लौकिक वाल्यांना पुरावे देणे...
      कारण ते पुरावे देऊ शकत नाहीत म्हणून तर चार्वाकांना पारलौकीकाचे वावडे आहे .

      Delete
  14. magnetic waves, elecricity he distat ka? nahi pan tyanche asthitwa janavte. ya goshi sarva lok use kartat nhanun mantata pan atma vagere cha anubhav kahi lokani ghetlay ase te sangtat. mi ekach mhaen ki apale sharir chalvnyasathi eka shaktichi garj asate tyalach atma mhanatat

    ReplyDelete
    Replies
    1. sann जी
      चार्वाक नुसते दृष्य्मानतेविषयी बोलत नाहीत ...प्रत्यक्ष तेच प्रमाण यातून पंचज्ञानेंद्रियांद्वारे ज्यांची अनुभूती घेता येते हा अर्थ त्यांना अभिप्रेत आहे .
      आता ही कसोटी आपण वर दिलेल्या magnetic waves, electricity च्या उदाहरणांना लावून पहा .
      आणि ज्या शक्तीला आपण आत्मा म्हणता तिला चार्वाक चैतन्य म्हणतात .
      तथापि चैतन्य हे चार महाभूतांच्या संयोगातून विशिष्ट सानुकूल परिस्थितीत आपोआप निर्माण होत हा अल्बर्ट आईनस्टाईन च्या उत्क्रांती वादाच्या सिद्धांताशी मिळता जुळता सिद्धांत त्यांनी मांडला आहे .
      आणि त्यातील दैवी हस्तक्षेप अमान्य केला आहे .

      Delete
    2. दैवी हस्तक्षेप char mahabhute sudhha shaktich ahet mag tech dev ahet mag vegla daivi hastakhep kashala. mhanaje mala ase vatate ki jar he dev ahet tar ahun vegal asa dev kay ahe अल्बर्ट आईनस्टाईन chya mate. mhanje mala he ulagadat nahiye mhanun sarkha vicharto ragau naka.

      Delete
    3. sann
      चार महाभूते ही निसर्गातील पायाभूत तत्वे आहेत ..द्रव्य आहेत असे चार्वाक मानतात .
      त्यांचे अस्तित्व हे निसर्ग नियमांनी बद्ध असते.
      ती सर्वशक्तिमान नाहीत .
      ती निसर्गात वा मानवी जीवनात कोणतेही ढवळाढवळ करत नाहीत .
      फक्त द्रव्य material इतकच त्याचं अस्तित्व आहे .
      आणि देव ही संकल्पना काहीशी वेगळी आहे .
      ..
      आणि आपण कोणत्याही शंका वा आपली वेगळी मते बिन दिक्कत मांडावीत .
      ही चर्चा आहे .
      आणि इथ राग येण्याचा प्रश्नच नाही .
      उलट आपणासारखे सिरीयसली वाचन करणारे वाचक हा ब्लॉग वाचत आहेत
      याच गोष्टीचा आम्हाला आनंद वाटतो .

      Delete
  15. राहुल मुळीक22 November 2012 at 21:31

    भुसे साहेब, आपला लेख अतिशय छान आहे.

    तुमचे लेख मी वाचलेत, मला पूर्ण खात्री आहे की, हिंदू धर्मात जाती-पातीला काही थारा नव्हता. साधारण बुद्ध व जैन संप्रदाय यायच्या आधी, जाती- पाती घट्ट केल्या गेल्या (बहोत करून ब्राह्मण व क्षत्रिय समाजातल्या काही नालायाकांकडून - असे माझे मत आहे). कर्म कांडाचे कारण नसताना स्तोम माजविले जाते. काही वेळेस कर्म-कांड गरजेचे आहे. माझ्या तोकड्या बुद्धीनुसार, सनातन धर्मात नाम-जपाला महत्व दिले आहे. सगळ्या संत-महात्म्यांनी तेच सांगितले आहे.

    मला जरा काही शंका आहेत त्यावर जरा थोडेसे आपले मत व मार्गदर्शन असेल तर बरे होईल. मी १ पुस्तक वाचले आहे "कर्माचा सिद्धांत". मूळ लेखक आहेत हिराभाई ठक्कर, ते गुजराती आहेत, पण पुस्तक हे मराठीत अनुवादित झाले आहे. अतिशय छान पुस्तक आहे (साधारण ४०-५० रु. पर्यंत आहे) Theory of Karma or Karmic theory म्हणून सुधा बरेच इतर लेखन झाले आहे. मला Theory of Karma पूर्णपणे पटते कारण त्याची तुलना आपण न्यूटनच्या गतिविषयक नियामाशी (३ रा) तुलना करू शकतो. "प्रत्येक क्रियेस प्रतिक्रिया असते". आपण चे चार्वाकांचे विचार मांडले ते सुधा बर्याच अंशी पटतात. थोडासा गोंधळ उडाल्यासारखा वाटतो. त्यावर जरा थोडेसे आपले मत व मार्गदर्शन असेल तर बरे होईल.

    ReplyDelete
    Replies
    1. राहुल जी
      कर्मकांडाला प्राचीन हिंदू धर्मात स्थान नव्हते हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे .
      काही संशोधन कर्ते हे वेद हे अनार्य असून ते शंकर रचित आहेत असे सिद्ध करू पाहत आहेत.
      तो वेगळा विषय आहे पुन्हा केव्हातरी ...
      तथापि कर्मकांडा चा अतिरेक हा उत्तर वैदिक काळात झाला .
      चार्वाक काळात या कर्मकांडाच्या आणि धर्म बंधनांच्या ओझ्याखाली समाज पिचला गेला होता .
      पुरोहित वर्गाने समाजाचे जगणे दुर्धर करून टाकले होते .
      याला खणखणीत उत्तर म्हणून चार्वाक तत्वज्ञानाचा जन्म झाला .
      ते मूलगामी असल्याने तसेच इह वाद त्याचा पाया असल्याने ही कर्मकांडी संस्कृती काळाच्या ओझात फोल ठरली तरी चार्वाक दर्शन आपल्या तेजाने सदैव तळपत राहील .
      लोकांना मार्गदर्शन करत राहील .
      ..
      आपली शंका नेमकेपणाने लक्षात आली नाही .
      आपण वर उल्लेख केलेला कर्माचा सिद्धांत थोडक्यात सांगितलात तर याविषयी मत मांडता येईल .
      आपण सांगितलेले पुस्तक मिळवण्याचा प्रयत्न करेन.
      चार्वाक विचाराला प्रत्युतर म्हणून ते विचार असतील तर ते नक्कीच कर्मकांडाचे प्रतिनिधित्व करणारे असावेत.
      क्रियेची प्रतिक्रिया होते या नियमाचा इथे आधार घेणे म्हणजे शुद्ध फसवणूक आहे .
      " क्ष " ने आपल्या खिशातले सर्व पैसे " य " ला देऊन टाकले .
      ही क्रिया ..
      " क्ष " कंगाल झाला हा परिणाम.
      फार तर क्ष ला कीर्ती मिळाली . मानसिक समाधान मिळाले.
      हा परिणाम वास्तस्व आहे. इथे फसवणुकीचा सबंध नाही .
      पण याचे फळ क्ष ला मिळेल त्याला बदल्यात पुण्य मिळेल ..तुम १ पैसा दोगे वो १० लाख देगा ..वगैरे .
      हा परिणाम दर्शवणे ही फसवणूक आहे .
      क्रियेची प्रतिक्रिया म्हणून असा सिद्धांत कर्मकांडाची बाजू घेण्यासाठी वापरला जात असेल ते निंदनीय आहे.

      Delete
    2. राहुल मुळीक23 November 2012 at 19:01

      नमस्कार सुहासजी,
      आपण दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.
      आपला काहीतरी गैरसमज झालेला आहे असे मला वाटते. मी आधीच म्हणाले आहे की, माझा अनावश्यक कर्मकांडाला विरोध आहे. त्याचे स्तोम वाढवून काही निष्पन्न होत नाही.
      अर्थात देवी-देवतांच्या मंदिरातील पुजारी हे विविध जातीतील आहेत. उदा. महालक्ष्मीचे पुजारी हे ब्राह्मण आहेत, तुळजापूरचे पुजारी मराठा आहेत ईत्यादी ईत्यादी ...

      राहिला आताचा कर्माचा भाग, "कर्माचा सिद्धांत" हे पुस्तक कर्म-कांडा बद्दल नसून मनुष्य कसा वागल्याने कसा इफेक्ट होऊ शकतो ते सांगते. मी जो न्यूटनचा नियम सांगितला आहे त्यात काही चुकीचे नाही. एखादे कर्म केले तर त्याचे फळ तुम्हाला मिळतेच पण ते लगेच मिळेल त्याची शाश्वती नाही.

      {फार तर क्ष ला कीर्ती मिळाली . मानसिक समाधान मिळाले.
      हा परिणाम वास्तस्व आहे. इथे फसवणुकीचा सबंध नाही .
      पण याचे फळ क्ष ला मिळेल त्याला बदल्यात पुण्य मिळेल ..तुम १ पैसा दोगे वो १० लाख देगा ..वगैरे .
      हा परिणाम दर्शवणे ही फसवणूक आहे }

      मी पुन्हा सांगतो की मी स्वता कर्म-कांडाच्या विरोधात आहे, ते पुस्तक कर्माशी संभन्दीत आहे, कर्म-कांडा बद्दल नव्हे.

      गीतेत भगवंताने सांगितले (गीतेसंबंधी बोलायला माझी लायकी नाही) कर्म करत राहा. लोकांनी त्याचा अर्थ असा घेतला की "कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नका" प्रत्यक्षात तसे नसून कर्म केले की फळ हे मिळतेच (कधी लवकर तर कधी उशिरा). उदा. तहान लागली की पाणी पितो, म्हणजेच, पाणी पिणे हे कर्म झाले व त्याचे फळ म्हणजे क्षुधा शांत झाली.

      अमुक पैसे दान करून तमुक पुण्य मिळते - हे पूर्णपणे चुकीचे आहे. लोकांने वाटेल तसे वागून पैसे देऊन पुण्य पदरात पडले असते व गरीबच सगळे भोगत बसला असता !!!

      मी तुम्हाला विनंती करतो की ते पुस्तक मिळाल्यास वाचा, कर्माचे निरुपण (कर्म-कांडाचे नव्हे ) छान केले आहे. त्यामुळे बर्याच गोष्टी अशा का होतात ह्याचे उत्तर मिळते (अर्थात मला व माझ्या बरयाच सहकाऱ्यांना हा अनुभव आला आहे).
      मी व माझे सहकारी सगळ्या जातीचे (जात- विविध विचारसरणीचे असाच घ्यायला पाहिजे ) आहोत !!!

      Delete
    3. राहुल जी
      आपण सांगितलेली माहिती कर्मकांडाचे समर्थन करणारी असावी असे वाटले होते .
      पण तो सिद्धांत कर्मावर धारीत आहे असे आपण स्पष्ट केलेत .
      आपण सांगितलेले पुस्तक मी नक्कीच उपलब्ध करून वाचेन.
      काहीतरी केल्याचा काहीतरी परिणाम होतो हा सिद्धांत पटण्यासारखा आहे .
      आपण सांगितलेल्या माहितीने कुतूहल चालवले गेले आहे .
      ..

      आपण कर्मकांडाच्या विरोधात आहात तसेच जाती पतींच्या विरोधात आहात हे पाहून आनंद वाटला .
      मी देखील एखाद्या विशिष्ट जातीचा विरोध करत नाही .
      आपले विचार जुळतात .
      भेटत राहू .
      धन्यवाद ...!!

      Delete
    4. राहुल मुळीक25 November 2012 at 03:44

      सुहासजी,
      आपला अभिप्राय वाचून आनंद झाला. भविष्यात तुमचे विचारमंथन मी वाचत राहीन व तुमच्याशी संपर्कात राहायचा प्रयत्न करीन. धन्यवाद.

      Delete