About

Showing posts with label रक्तलांछित जिहाद. Show all posts
Showing posts with label रक्तलांछित जिहाद. Show all posts

Saturday, 25 August 2012

इस्लामी धर्मग्रंथातील जिहाद




      कुराण, हादिसं, शरियत अशा प्रमुख इस्लामी धर्मग्रंथांतून इस्लामची अनेक तत्वे सांगितली असली तरी “ जिहाद फी सबील्लीलाह “ अर्थात अल्लाह च्या मार्गातील संघर्ष हाच इस्लामचा गाभा आहे. जिहादला उपरोक्त ग्रंथांतून असलेले भक्कम पाठबळ आपण या लेखातून काही निवडक आयातीच्या आधारे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

      जिहाद चे पाच मुख्य घटक आहेत.
१)      इस्लामचा बळाने विस्तार
२)     श्रद्धाहीनांचा (जे मुस्लीम नाहीत ) निपा:त
३)     जिझिया
४)     श्रद्धाहिनांची मालमत्तारूपी लुट
५)    श्रद्धाहिनांची बायकामुले रूपी लुट (घनिमह )

आता या प्रत्येक घटकासंदर्भात हे पवित्र ग्रंथ काय म्हणतात ते पाहुयात.
कुराण पाचवा अध्याय (सुरह तौबाह ) पाचवी आयत
“आणि हे पवित्र महिने संपल्यावर तुम्हाला मूर्तिपूजक जेथे सापडतील तेथे त्यांना ठार मारा. त्यांना कैद करा. त्यांना वेढा घाला. त्यांच्यासाठी मोक्याच्या ठिकाणी दबा धरून बसा. परंतु जर त्यांनी पश्चाताप व्यक्त केला आणि नमाज अदा केला व जकात दिली तर त्यांना जाऊ द्या.”

जिहाद विषयक पहिल्या दोन घटकांचे स्पष्टीकरण देण्यास हि आयत पुरेशी बोलकी आहे. इतिहासाला ज्ञात आहे कि इस्लामचा विस्तार तलवारीच्या बळावर झाला आहे. इस्लाम धर्माची तत्वे पटली म्हणून इस्लाम स्वीकारला असे एकही उदाहरण सापडणार नाही. आता हा विस्तार कशाप्रकारे करायचा याचे निसंदिग्ध मार्गदर्शन वरील आयत करते. माणसाची मूळ मानसिकता शांतताप्रिय असते त्यामुळे काही मुस्लिमांना हा रक्तपात नकोसा वाटू शकतो. त्यांना खास मार्गदर्शन पुढील आयतीत केले आहे.

“अबू हुरेरा यांच्या अधिकारावर अल्लाहच्या प्रेषितांनी म्हटल्याचे सांगण्यात येते: जो अल्लाच्या कार्यासाठी लढाई न करताच मृत्यू पावतो, किंवा जिहाद करण्याची (दृढ) इच्छा व्यक्त न करताच मरतो त्याचे मरण हे दांभिकाचे असते.” (सहिह मुस्लीम. क्र. ४६९६ )

अर्थात जिहाद करण्याची इच्छा नसणारा आणि जिहाद न करणारा मुस्लीम अल्लाहच्या कृपेला पात्र ठरत नाही. थोडक्यात शांतताप्रिय मुस्लीम हा मुस्लीम असूच शकत नाही.

     
जिझिया हा शब्द आपणास औरंगजेबाने इथल्या हिंदू जनतेवर लादलेला एक जुलमी कर म्हणून माहित आहे. मुस्लीम शासक-प्रचारकांना सगळे जग हिरवे बनवायचे आहे. आता काही मुर्तीपुजकांना लुटीच्या बदल्यात दिलेली हि सुट आहे. खराजगुझार (जिझिया )भरणारी आणि झिम्मी ( आश्रित ) म्हणून हिंदू प्रजेला कनवाळू अंतक:रणाच्या इस्लामने दिलेली उदार सुट, सवलत म्हणजे जिझिया.     

घनिमह अर्थात युद्धात मिळालेल्या लुटीसंदर्भात हे पवित्र धर्मग्रंथ काय सांगतात ते पाहू .हि लुट मुर्तीपुजकांची मालमत्ता असेल वा त्यांची बायकामुले असतील.

“ आणि तुमच्या उजव्या हाताच्या मालकीच्या(कैदेत असलेल्या) स्त्रिया सोडून सर्व विवाहित स्त्रिया तुम्हाला वर्ज्य आहेत “ (कु.४/२४)
आता हा संदर्भ सन्माननिय पुनर्विवाहाचा नाही तर बळजबरीने ठेवावयाच्या संबंधाबाबत आहे हे सांगण्यासाठी तज्ञाची आवश्यकता नाही.
“आपल्याआधी कोणत्याही लोकसमूहासाठी युद्धातील लुट कायदेशीर नव्हती. आपला दुबळेपणा आणि विनम्रपणा पाहून अल्लाहने ती आपल्यासाठी कायदेशीर केली.” (सहिह मुस्लीम. क्र. ४३२७)
एखाद्या कोमल हृदयाच्या मुसलमानाला हि रक्तलांच्छित लुट नको वाटत असेल तर त्याच्या मनात काही संदेह राहू नये म्हणून
“युद्धातील लुटीचा उपभोग घ्या ती कायदेशीर आणि शुद्ध आहे “( कु.८/६९ )


जिहादचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी या प्रातिनिधिक आयती पुरेशा आहेत. माझे या आधीचे दोन लेख आणि हा तिसरा मिळून वाचल्यानंतर वाचकांच्या लक्षात पुरेपूर आले असेल कि जिहाद हि चीज काय आहे.

(क्रमश:)
अधिक माहितीसाठी जिज्ञासू वाचकांनी सुहास मुझुमदार यांचा जिहाद हा ग्रंथ वाचावा. या ग्रंथाचे शरद मेहेंदळे आणि श्रीरंग गोडबोले यांनी केलेले मराठी भाषांतर देखील उपलब्ध आहे.

                            सुहास भुसे
                          (२५-८-२०१२)

       


         

Wednesday, 22 August 2012

इस्लामी दहशतवादाची पाळेमुळे


    संपूर्ण जगाला आज प्राधान्याने भेडसावणारी समस्या म्हणजे इस्लामी दहशतवाद होय. आज जगात अनेक जाती धर्म सुखनैव व शांततामय सहजीवन जगत असताना इस्लाम धर्मच दहशत वादात इतका अग्रेसर का ? या गोष्टीची कारणमीमांसा फारशी केली जाताना दिसत नाही. या सर्व गोष्टींचे मुळ इस्लामच्या शिकवणुकीत आहे यावर बहुसंख्य जणांचा विश्वास बसणे कठीण आहे. कोणताच धर्म वाईट शिकवण देत नाही हे आमचे इतर धर्मांबद्दलचे मुलभूत ज्ञान असते. किंवा आमच्या इथले मुसलमान चांगले आहेत अशी अनेक हिंदूंची भोळी समजूत असते. माझा एक फेसबुक  मित्र टिपू सुलतानला महापुरुष समजतो किंबहुना टिपू म्हणजे म्हैसूरचा शिवाजी अशी त्याची समजूत आहे. इतकेच नव्हे तर विजय मल्ल्या यांनी टिपूची तलवार भारतात आणली म्हणून त्यांनाही तो हिरो मानतो. मी त्याला टिपू कोण होता आणि त्याने कुर्द प्रांतातील ५०,००० हिंदूंना साखळदंडाला बांधून म्हैसूरला कसे आणले व त्यांना कसे बाटवले हे सांगितले तेव्हा तो जवळजवळ बेशुद्धच पडला. अकबर हा चांगला बादशहा होता असे अनेक जणांना वाटते पण याच अकबराने बालवयातच हिमू या  युद्धात जखमी झालेल्या व असहाय्य हिंदू योद्ध्याला मारून ' गाझी ' हि पदवी प्राप्त केलि होती व हि खास पदवी फक्त मूर्तिपूजक काफिर लोकांना मारणाऱ्या थोर योद्ध्यांनाच दिली जाते याचे ज्ञान फारच कमी हिंदूंना असते. मुसलमान हा इथून तिथून सारखाच आणि तो जाईल तिथे जिहादच करेल हे मुलभूत ज्ञान आज हिंदूंनी प्राप्त करून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.


            जिहाद बद्दल देखील आपल्या भोळ्या हिंदुजनांच्या खुपच भोळ्या समजुती असतात. जिहाद म्हणजे धर्मयुद्ध असा सरळ साधा अर्थ काढला जातो . पण हि अतिशय चुकीची समजूत आहे. आपले धर्मयुद्ध आणि जिहाद यात फार मोठा फरक आहे.जिहाद आणि जिहादची तत्वे यासंदर्भात मी माझ्या पुढच्या लेखात सविस्तर विश्लेषण करणार आहे.  नि : शस्त्र शत्रूला अभय देणे, शरण आलेल्याला सोडून देणे, युद्धात बायका-मुले, धर्मस्थाने  यांना हात न लावणे हे हिंदूंचे धर्मयुद्ध आहे. आणि जिहाद म्हणजे याच्या बरोबर उलट. हजारो हिंदूंची कत्तल करणे, हाती आलेल्या हिंदू राजांना त्यांची कातडी सोलून त्यांना झाडावर फाशी देणे, त्यांच्या राण्यांना व राजकुमारींना जनानखान्यात खेचणे, स्रीयांना- पुरुषांना गुलाम बनवून त्यांची विक्री करणे, त्यांना बाटवणे, मंदिरे फोडून तिथे मशिदी उभारणे व तिथेच या बाटवलेल्या हिंदूंना नमाज पढायला लावणे, हा जिहादचा खरा चेहरा आहे. वानगीदखल हिंदूंच्या पृथ्वीराज चौहान या महान सम्राटाचे देता येईल.


             महमद घोरीने पृथ्विराजावर एकूण ९ वेळा स्वारी केली. त्यातील आठ वेळा पृथ्विराजाने घोरीचा पराभव केला. चार वेळा हाती आलेल्या घोरीला त्याने शरण आलेल्याला अभय द्यावे या मुर्ख समजुती खातर सोडून दिले. नवव्या वेळी घोरीने पृथ्विराजाचा फंदफितुरीने पराभव केला आणि त्या वेळी मात्र त्याने पृथ्वीराज ला सोडले नाही. त्याला बांधून आपल्या देशात अफगाणिस्तानला नेले. त्याचे डोळे काढून त्याला हाल हाल करून मारले. त्याला अग्नी न देता त्याचे दफन केले. त्या जागी त्याचा एक हिडीस अर्धपुतळा उभा केला. तेथे एक जोडा ठेवला आणि येणाऱ्या जाणार्या मुसलमानाने त्याला थोबाडावे असा एक लेख लिहून ठेवला.
            
           हे मुस्लीम संस्कार आहेत. ही त्यांची रानटी संस्कृती आहे. मागील हजारो वर्षांपासून हिंदूस्थान इस्लामच्या या आक्रमक टापांखाली रगडला जात आहे. जगातल्या इतर कोणत्याही देशाला झाला नसेल इतका त्रास आणि अन्याय अत्याचार हिंदुस्तानातील हिंदू जनतेने सोसले आहेत.


             या नउशे ते हजार वर्षाच्या कालखंडात मुस्लीम सतत विजय संपादन करत गेले. मुस्लीम हे शूर नव्हते तर क्रूर होते. त्यांच्या हिडीस आणि बिभत्स छळाची दहशत हिंदूंना बसली होती. ती दहशत मोडून काढली ती आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. अफजलखानचा पराभव करून त्यांनी दाखवून दिले कि मुस्लीम पराजित होऊ शकतात. फक्त आपली ती सुप्रसिद्ध सहिष्णुता गुंडाळून ठेवणे  आणि शामळू धर्मयुद्धाचे नियम कालानुरूप धाब्यावर बसवणे गरजेचे आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या अजेय आणि तेजस्वी पराक्रमाने मुस्लिमांची हजार वर्षाची दहशत लुळी पांगळी करून टाकली . पण राजांनी केलेला हा इस्लामचा अभ्यास आज आपण विसरलो आहोत. आणि आज हिंदुस्तानात सर्वत्र सुरु असलेला जिहाद चा गरादोळ हे त्याचेच फलित आहे.


             हिंदुस्तानात आजपर्यंत झालेल्या दंगली काय किंवा आज आसाम किंवा मुंबईत झालेल्या दंगली काय ...यांचे विश्लेषण प्रशासन किंवा मिडिया काही ठराविक आणि गोंडस शब्दात करत असते. शांततामय समुदायातील काही माथेफिरू आणि समाजविघातक प्रवृत्तींचे कृत्य. मला सांगा एखाद्या तात्कालिक घटनेची प्रतिक्रिया म्हणून काही मुस्लिमांचा समुदाय बाहेर पडतो काय आणि पाहता पाहता त्याचे ५०,००० च्या विराट समुदायात रुपांतर होते काय , अचानक त्यांच्याकडे पेट्रोल बोंब , तलवारी .कोयती , जाळपोळ करण्यासाठी केरोसिन आणि पेट्रोलचा साठा , लाठ्या काठ्या इ सामान सुमान येते काय ...सगळेच डोक्याच्या बाहेरचे आहे. हे काय गौडबंगाल असावे बर बुवा ??

     
         माझ्या जागृत हिंदू बांधवांनो या सर्व दंगलींचा जर अभ्यास केलात तर हा काही माथेफिरू आणि समाजविघातक गटाचा संताप उद्रेक नसून दंगल हा एक पूर्वनियोजित व व्यवस्थित आखणी केलेला एक कट असतो. काफर , मूर्तिपूजक लोकांविरुद्ध पुकारलेला एक सर्वंकष जिहाद असतो हे आपल्या ध्यानात येईल. दगडाला विटेने कसे उत्तर द्यायचे आणि सतत होणाऱ्या या जिहादी आघातांना कसे रोखायचे हे समस्त हिंदू समुदायाने एकत्र येऊन ठरवण्याची वेळ आता येऊन ठेपलेली आहे. हिंदू बांधवानो सावध व्हा. जिहाद आता देशात कुठेतरी वा रस्त्यावर राहिलेला नाही. तो तुमच्या आमच्या घराची दारे थोठावत आहे.                         




                                                                                                                                                        

                                                                                             सुहास भुसे.
                                                                                          ( ११ -०८ -२०१२ )           

जिहादचा इतिहास


वाचक मित्रहो,

देशभर फोफावत असलेला इस्लामी दहशतवाद, त्यामागची मुस्लीम आणि त्याला बळी पडणार्या हिंदूंची मानसिकता या संदर्भात माझा “इस्लामी दहशतवादाची पाळेमुळे ”हा लेख आपण वाचलाच असेल. याच मालिकेतील या दुसऱ्या लेखात हा दहशतवाद या दंगली कशा संचालित होतात वा केल्या जातात ( इथे ‘ संचालित ‘ हा शब्द पूर्ण विचार करून वापरला आहे ) या दंगली घडवून आणण्यामागे कोणाचा हात असतो, आणि या पाठीमागचे इस्लामचे तत्वज्ञान काय आहे या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत.

साधारणत: प्रत्येक कुटुंबवत्सल माणूस हा शांतताप्रिय असतो असे एक मानसशास्त्रीय निरीक्षण आहे. सर्वसामान्य नागरिकांना मग ते कोणत्याही धर्माचे असोत चाकोरीबद्ध जगणे प्रिय असते. मग अस काय होत कि एखादा मुल्ला, मौलवी जिहादची हाक देतो आणि दहा हजार, पन्नास हजार , लाखांच्या संख्येने मुस्लीम समुदाय त्याला प्रतिसाद देतो. जाळपोळ, हिंसा, बलात्कार घडवून आणले जातात? देश , हि भूमी जिने आपल्या बापजाद्यांच्या लाखो पिढ्या पोसल्या आहेत तिच्यावरची निष्ठा, उच्च नैतिक मुल्ये पायदळी तुडवली जातात ? इतके सामर्थ्य त्या मुल्ला, मौलवींच्या हाकेला कोठून प्राप्त होते ? एखाद्या हिंदू धर्मीय साधूने किंवा एखाद्या संताने अशी इतर धर्मियांवर हल्लाबोल ची हाक दिली तर त्याला कितपत प्रतिसाद मिळेल ? एखाद्या हिंदू संघटनेने दंगल घडवून आणायची म्हटले तर काय होईल ? किती हिंदू घरे सोडून रस्त्यावर उतरतील ? आज पर्यंत हिंदूंच्या हिंसेची किती उदाहरणे इतिहासाला माहित आहेत ? हिंसात्मक कृत्यांमध्ये हिंदूंचा सहभाग असतो तो मुस्लीम हल्ल्यांची प्रतिक्रिया किंवा प्रत्युत्तर म्हणून . हिंदूंनी सुरु केलेल्या दंगलींचे एकही उदाहरण सांगता येणार नाही. आणि मुस्लीम धर्माचा इतिहास हिंसेने भरलेला आहे. रक्तरंजित, बिभत्स कृत्यांनी भरलेला आहे. वानगीदाखल हिंदुस्तानात अलीकडच्या काळात झालेल्या मोठ्या जिहादी दंगलींवर व घातपाती दहशत वादी कारवायांवर एक नजर टाकूया.

१)             १९२१ चे कुप्रसिद्ध मोपल्याचे बंड
२)            १९४६ चे नौखालीचे दंगे
३)            १९४७ फाळणीच्या वेळच्या अमानुष दंगलीत झालेले बीभत्स अत्याचार  
४)            काश्मिरात १९४७ पासून आजतागायत सुरु असलेला हिंदूचा वंशविच्छेद
५)           संसदेवरील हल्ला
६)             मुंबईचे बॉम्बस्फोट
७)           गोध्राचे जळीतकांड
८)            पुण्यातले बॉम्बस्फोट
९)             आसाम मधला वांशिक हिंसाचार
१०)         रझा अकादमी कृत मुंबईची दंगल

आता हि सर्व बीभत्स आणि माणुसकीला काळीमा फासणारी कृत्ये म्हणजे  माथेफिरू अविचारी समाजकंटकांची कृत्ये आहेत. दहशतवाद्याला कोणताही धर्म नसतो अशी लोकांची चुकीची समजूत  आपले अनेक नेते, मिडीयावाले , मानवाधिकारवाले करून देत असतात. पण जिहादी दंगली म्हणजे यापैकी काही नाही. जिहादला एक निश्चित अशी तात्विक बैठक आहे. जिहाद हे एक थंड डोक्याने डोक्याने विचारपूर्वक केलेले पूर्वनियोजित कृत्य असते. वांशिक हिंसाचार आणि दंगली हे जिहादचेच दृश्यमान रूप आहे.

जिहाद हि संकल्पना आणि त्याला कुराण, हादिसं आणि शरियत या तीन प्रमुख इस्लामी ग्रंथामध्ये असणारा आधार प्रत्यक्ष त्या मध्ये असणार् या आयातींच्या अनुवादाच्या पुराव्याधारे मी पुढच्या लेखामध्ये मांडेन .

                                   
                              सुहास भुसे
                              (१८-८-२०१२)