About

Wednesday 4 November 2020

मुस्लिम व धर्मसुधारणा

 हिंदु धर्मातील वाईट गोष्टींवर भरपुर बोलता येईल. ते तसं बोललं जातंही. मुख्य म्हणजे तुम्ही बोलु शकता. 

चार्वाकांपासुन चक्रधरांपर्यंत आणि ग्यानबा तुकारामांपासुन थेट गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांपर्यंत धर्मसुधारणेची फार मोठी परंपरा हिंदु धर्माला लाभली आहे. मुंगीला देखील आपल्याकडून त्रास होऊ नये..

कोणा जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे ..

अशा व्यापक मानवतावादी पायावर हिंदु धर्माचे दार्शनिक तत्वज्ञान उभे आहे.

दुष्टांना संपवणे दार्शनिकांच्या स्वप्नात देखील येऊ शकत नाही..

दुष्टांचा दुष्टपणा संपावा...जे खळांची व्यंकटी सांडो.

मुस्लिमांच्या बाबतीत महत्वाचा मुद्दा हा आहे की एखाद्याला किंवा अधिक नेमकं बोलायचं तर काफिराला ठार करणं, त्याचा गळा चिरण, चाकूने भोकसुन एखाद्याचा जीव घेणं ही त्यांच्या दार्शनिक तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने वाईट गोष्ट, पाप आहे अथवा नाही ? 

की त्यामुळं तुम्हाला जन्नत नसीब होणार ? मरणोत्तर हूर वगैरेंचा लाभ होणार ?

“आणि हे पवित्र महिने संपल्यावर तुम्हाला मूर्तिपूजक जेथे सापडतील तेथे त्यांना ठार मारा. त्यांना कैद करा. त्यांना वेढा घाला. त्यांच्यासाठी मोक्याच्या ठिकाणी दबा धरून बसा. परंतु जर त्यांनी पश्चाताप व्यक्त केला आणि नमाज अदा केला व जकात दिली तर त्यांना जाऊ द्या.”

- कुराण पाचवा अध्याय (सुरह तौबाह ) पाचवी आयत.

दार्शनिक तत्वज्ञानाचा असा पाया असेल तर दुसरं काय होणार ?

कालबाह्य शिकवणीला कवटाळून बसणं, धर्माची चौकट अत्यंत मजबूत व पोलादी असणं.. आणि धर्मसुधारणांच्या परंपरा अजिबात नसणं किंवा क्षीण असणं हे मुळ दुखणं आहे.  बाकी चर्चाचर्वण निरर्थक आहे.

नाजुक धर्मभावना

 आपल्याकडे भावना दुखावणे या प्रकाराचे भयंकर प्रस्थ आहे. एखाद्या सिनेमातून जरा काही इकडं तिकडं झालं की आपल्या भावना दुखावतात. तुलनात्मक दृष्ट्या ख्रिश्चन लोक या बाबतीत सर्वाधिक मवाळ असावेत.

उदाहरणदखल ... युरोट्रीप नावाचा एक विनोदी सिनेमा आहे. त्यातल्या नायकाचे व नायिकेचे इ मेल वरून प्रेम जुळते व अमेरिकन नायक जर्मन नायिकेला भेटण्यासाठी युरोट्रिपवर निघतो. तिच्या घरी गेल्यावर त्याला कळतं की ती एका टूर सोबत रोम ला गेली आहे. नायक व त्याचे मित्र ही रोमला पोहोचतात..

आता महत्वाचं.. व्हॅटिकन सिटी हे ख्रिश्चन धर्मियांचे सर्वात मोठे धार्मिक स्थळ. जिथं पोपचा निवास असतो. इथं नायिकेला शोधत नायक सिस्टीन चॅपेलमध्ये -थोडक्यात व्हॅटिकन सिटीच्या अतिपवित्र गाभाऱ्यातच- घुसतो. तिथं त्याचा मित्र ती घंटा वाजवतो जी पोपचं निधन झाल्यानंतर वाजवली जाते. बाहेर सर्व लोक पोपचं निधन झालं असं समजतात. दोघे मिळून पोपची टोपी व झगा घालून माकडचेष्टा करतात. टोपीला आग लागते. मित्र ती टोपी फायरप्लेस मध्ये टाकतो. या फायरप्लेस मधुन पांढरा धुर येणे हा जुन्या पोपच्या निधनानंतर नवीन पोपची निवड झाल्याचा संकेत असतो. पुन्हा बाहेरचा जमाव गैरसमजात येतो. पोपचा धर्मदंड हातात घेऊन व पोपचा झगा व टोपी घालून नायक ज्या सज्जातुन पोप जनतेला दर्शन देत असतात तिथं येऊन लोकांना अभिवादन करतो. लोक त्यालाच पोप समजतात वगैरे...

आणि हे सगळं कशासाठी ? निव्वळ टुकार, पाचकळ विनोदनिर्मितीचा अश्लाघ्य प्रयत्न..

अखेर एकदाचं तो नायिकेला प्रपोज करतो. ती हो म्हणते ते दोघं थेट घुसतात चर्च मधल्या त्या केबिनमध्ये जिथं पाद्री लोकांचे कन्फेक्शन ऐकत असतात. आणि अर्थातच तिथं सेक्स करतात.

हे सगळं किंवा यातला नखभर देखील भाग मुस्लिम, हिंदु किंवा इतर धर्मियांच्या श्रद्धास्थानाबाबत झाला असता तर काय झालं असतं याची कल्पना करून पाहावी.. भारतातील एखाद्या सिनेमात असं काही दाखवलं गेलं असतं तर काय घडलं असतं ?

आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नुसत्या गप्पा हाकतो.. आपल्याकडे ते येणे कालत्रयीही शक्य नाही हे वास्तव आहे. पाश्चात्य लोक त्याच्या तात्विक चर्चा करत नाहीत तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य जगतात.

Sunday 1 November 2020

इन टू द वाईल्ड

 क्रिस्टोफर मॅक्केंडलेस नावाचा युवक युनिव्हर्सिटीमध्ये टॉप करतो आणि रूढार्थाने सुखवस्तु मानल्या जाणाऱ्या जीवनाच्या सर्व संधी नाकारून एका एडवेंचर साठी निघतो .. 

आय डी कार्ड, लायसन्स, बँक पासबुक, चेकबुक, बर्थ सर्टिफिकेट इ आपल्या जिवंत असण्याचे सर्व पुरावे नष्ट करून..

स्वतःची सर्व शिल्लक चॅरिटी करून..

मागचे सर्व दोर कापुन टाकून..

आपल्या मुळांच्या शोधात ..

इन टू द वाईल्ड..

अलास्काच्या जंगलात.

एकटाच. अगदी गरजेच्या बोटावर मोजण्याइतक्या वस्तु घेऊन. 

जगात सगळी माणसं एकमेकांना डॉमीनेट करण्याचा प्रयत्न करत असतात. या न त्या मार्गाने आपले विचार, आपल्या कल्पना ते इतरांवर थोपत असतात. आई बाप मुलांना डॉमीनेट करतात. नवरा बायकोला, बायको नवऱ्याला डॉमीनेट करते. मालक नोकरांना, राजकारणी जनतेला, श्रीमंत गरिबाला..

प्रत्येकजण प्रत्येकाला ..

इथं कोणीही स्वतंत्र नाही. सुखी जीवन म्हणजे काय याचे नॅरेटिव्हज व्यवस्थेने सेट केलेले असतात.

नोकरी, व्यवसाय, पैसा, चैन ..

सुख म्हणजे काय, आनंद म्हणजे काय, यश म्हणजे काय, जीवन म्हणजे काय हे कोणी स्वतः ठरवत नाही. ही सगळी नॅरेटिव्हज आपल्यावर न कळत्या वयापासून थोपली जातात.

ही सगळी व्यवस्था आणि व्यवस्थेने सेट केलेले नॅरेटिव्हज झुगारून देऊन खराखुरा मोकळा श्वास घेण्याची, खरं खुर स्वातंत्र्य उपभोगण्याची कहाणी आहे ..

इन टू द वाईल्ड..

क्रिस्टोफर मॅक्केंडलेस अलास्काच्या जंगलात जातो.. त्याआधी दोनेक वर्ष फिर फिर फिरतो. कसल्याही पासपोर्ट व विजा शिवाय.. कधी चालत, कधी रेल्वेच्या डब्यात चोरून, कधी लिफ्ट मागून, कधी बोटीतून..

तो हॉटेलमध्ये वेटरच काम करतो, पुस्तके विकतो, गव्हाचे भले थोरले हार्वेस्टर चालवतो.. ही भटकी जिंदगी जगत असतानाच त्याची त्याच्या अंतिम ध्येयाकडे वाटचाल सुरू असते..

इन टू द वाईल्ड.. अलास्का.

अलास्का मध्ये क्रिस्टोफर कसं सर्वाईव्ह करतो. आपले पुर्वज जसे जंगलात राहत होते तसा कसा राहतो, तिथं त्यानं घेतलेला मोकळा स्वतंत्र श्वास, त्यानं अनुभवलेला निसर्ग, त्याचा जीवनानुभव आणि त्याचं तत्वज्ञान हे त्याच्याच शब्दात वाचायला हवे .. इन टू द वाईल्ड कादंबरीत किंवा त्याच नावाच्या क्रिस्टोफर मॅक्केंडलेसच्या चरित्रावर आधारित सिनेमामध्ये ..

आपण अनेक प्रकारचे बंडखोर पाहिले आहेत.. व्यवस्था बदलणारे, बदलण्याचा प्रयत्न करणारे. 

पण व्यवस्था पूर्णपणे उलथून टाकणारा, व्यवस्था कोलणारा क्रिस्टोफर मॅक्केंडलेस हा फार आगळा वेगळा बंडखोर आहे. क्रिस्टोफरचं जीवनदर्शन आपले अंत:चक्षु उघडतं.. आपल्याला अंतर्मुख करून टाकतं.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य

 आपल्याकडे भावना दुखावणे या प्रकाराचे भयंकर प्रस्थ आहे. एखाद्या सिनेमातून जरा काही इकडं तिकडं झालं की आपल्या भावना दुखावतात. तुलनात्मक दृष्ट्या ख्रिश्चन लोक या बाबतीत सर्वाधिक मवाळ असावेत.

उदाहरणदखल ... युरोट्रीप नावाचा एक विनोदी सिनेमा आहे. त्यातल्या नायकाचे व नायिकेचे इ मेल वरून प्रेम जुळते व अमेरिकन नायक जर्मन नायिकेला भेटण्यासाठी युरोट्रिपवर निघतो. तिच्या घरी गेल्यावर त्याला कळतं की ती एका टूर सोबत रोम ला गेली आहे. नायक व त्याचे मित्र ही रोमला पोहोचतात..

आता महत्वाचं.. व्हॅटिकन सिटी हे ख्रिश्चन धर्मियांचे सर्वात मोठे धार्मिक स्थळ. जिथं पोपचा निवास असतो. इथं नायिकेला शोधत नायक सिस्टीन चॅपेलमध्ये -थोडक्यात व्हॅटिकन सिटीच्या अतिपवित्र गाभाऱ्यातच- घुसतो. तिथं त्याचा मित्र ती घंटा वाजवतो जी पोपचं निधन झाल्यानंतर वाजवली जाते. बाहेर सर्व लोक पोपचं निधन झालं असं समजतात. दोघे मिळून पोपची टोपी व झगा घालून माकडचेष्टा करतात. टोपीला आग लागते. मित्र ती टोपी फायरप्लेस मध्ये टाकतो. या फायरप्लेस मधुन पांढरा धुर येणे हा जुन्या पोपच्या निधनानंतर नवीन पोपची निवड झाल्याचा संकेत असतो. पुन्हा बाहेरचा जमाव गैरसमजात येतो. पोपचा धर्मदंड हातात घेऊन व पोपचा झगा व टोपी घालून नायक ज्या सज्जातुन पोप जनतेला दर्शन देत असतात तिथं येऊन लोकांना अभिवादन करतो. लोक त्यालाच पोप समजतात वगैरे...

आणि हे सगळं कशासाठी ? निव्वळ टुकार, पाचकळ विनोदनिर्मितीचा अश्लाघ्य प्रयत्न..

अखेर एकदाचं तो नायिकेला प्रपोज करतो. ती हो म्हणते ते दोघं थेट घुसतात चर्च मधल्या त्या केबिनमध्ये जिथं पाद्री लोकांचे कन्फेक्शन ऐकत असतात. आणि अर्थातच तिथं सेक्स करतात.

हे सगळं किंवा यातला नखभर देखील भाग मुस्लिम, हिंदु किंवा इतर धर्मियांच्या श्रद्धास्थानाबाबत झाला असता तर काय झालं असतं याची कल्पना करून पाहावी.. भारतातील एखाद्या सिनेमात असं काही दाखवलं गेलं असतं तर काय घडलं असतं ?

आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नुसत्या गप्पा हाकतो.. आपल्याकडे ते येणे कालत्रयीही शक्य नाही हे वास्तव आहे. पाश्चात्य लोक त्याच्या तात्विक चर्चा करत नाहीत तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य जगतात.

श्रीमंत होण्याचा एकमेव मार्ग

 नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ डॉ डग्लस नॉर्थ गरीब गरीबच का राहतो याची अचुक आणि नेमकी मांडणी करतात.

‘‘देशाच्या बाजारपेठा आणि अन्य महत्त्वाच्या आघाड्यांवरचा ‘प्रवेश’ कसा मर्यादित ठेवता येईल यावर भर देणारी धोरणे जगभरातल्या अर्थरचना स्वीकारतात. त्यामुळे सामान्य माणूस ‘संधी’पासून तर दुरावतोच पण त्याच्यासाठी पुरेशी ‘साधने’ही उपलब्ध नसतात.’’

संधी आणि साधने ...

समजा एक गरीब शेतकरी कुटुंब आहे किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीय कामगार कुटुंब आहे. त्याला श्रीमंत बनायचं आहे..

स्वतःची उन्नती साधायची आहे..

पहिली संधी मिळते शिक्षणाच्या रुपात ..

पण शिक्षणाचा दर्जा जसा जसा वाढत जातो तसं तसे ते महाग होत जाते आणि ज्याला दर्जेदार शिक्षण म्हणता येईल ते त्याच्या आवाक्याबाहेरचे असते.

आणि जे शिक्षण तो शासकीय संस्थामधुन घेऊ शकतो ते इतके निम्न दर्जाचे असते की त्याला कुठेही नेऊ शकत नाही.

दुसरा मार्ग असु शकतो स्वतःचा उद्योग सुरू करणे..

त्यासाठी भांडवल अर्थात साधनं उपलब्ध नसतात.

भांडवल उपलब्ध असेल तर सर्वसामान्य माणसाला सहजासहजी उपलब्ध होऊ शकत नाही.

त्याच्या मार्गात अनेक अडथळे उभे केले जातात.

याच प्रमाणे इतरही सर्व प्रकारच्या संधी आणि साधने सामान्य माणसाला नाकारली जातात.

परिणामी सत्ता आणि पैसा यांचे केंद्रीकरण होत जाते.

संधी आणि साधने समाजातील मूठभर वर्गाकडे एकवटत जातात.

गरीब पिढ्यानपिढ्या गरीबच राहतो.

थोडक्यात अशा स्वरूपाच्या अर्थव्यवस्थेत श्रीमंत होण्याचा एकच मार्ग असतो..

श्रीमंत म्हणून जन्माला येणे!!