About

Friday 28 August 2015

हिंदु हा धर्म नाही ?

     ‘ हिंदू नावाचा कोणता धर्मच नाही ’. सध्याचे लोकप्रिय घोषवाक्य आहे. असा विचार मांडणाऱ्या विद्वानांच्या मुलभूत दृष्टीकोनातच मुळात फार मोठी चूक ही आहे की ते हिंदू धर्माकडे इतर तुलनेने अर्वाचीन धर्माच्या अनुषंगाने पाहतात. अर्वाचीन धर्म अर्थात ज्यू ख्रिश्चन मुस्लीम बौद्ध इ. या धर्मात एक व्यवस्थित मुलभूत मांडणी आहे. बहुतेक धर्म एकेश्वरवादी आहेत.  त्यांचा कोणीतरी प्रेषित आहे. तो त्यांच्या धर्माचे तत्वज्ञान सांगणारा उद्गाता आहे. त्यांचे धर्मतत्वज्ञान सांगणारे निश्चित असे धर्मग्रंथ आहेत. जगण्याचे काही नियम सांगितले आहेत. काही धार्मिक कर्तव्ये-बंधने आहेत. उपासना पद्धती एकमेव आहे. हा ठराविक साचा बहुतेक धर्मांचा आहे. याच साच्यात हिंदू धर्माला बसवण्याचा अयशस्वी प्रयत्न करून हिंदू नावाचा कोणता धर्मच नाही असे जाहीर केले जाते.

हिंदू शब्दाच्या व्युत्पत्ती

     हिंदू या शब्दाच्या अनेक व्युत्पत्ती सांगितल्या जातात. पैकी पहिली साधारण हिंदू म्हणजे सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणारे लोक. इराणी भाषांमध्ये स चा उच्चार ह असा होतो. म्हणून सिंधू चे हिंदू झाले. ही फारशी पटण्यासारखी व्युत्पत्ती नाही. कारण इराण ला तुलनेने जवळ असलेले पाकिस्तानच्या सिंध प्रांतात राहणाऱ्या लोकांना आजही सिंधीच म्हणतात.

     दुसरी व्युत्पत्ती अशी की साधारण युवान श्वांग भारतात आला त्या कालखंडात हिंदू शब्द प्रचलित झाला. हिंदू पंचांग चांद्र पंचांग आहे. चंद्राचे एक नाव इंदू . त्यावरून चीनी लोक इंदू किंवा हिंदू म्हणू लागले. ही व्युत्पत्ती फारशी पटत नाही. चीनी जे म्हणतात ते नाव भारतीय लोकांनी स्वीकारायचे काय कारण ?

     इतर अनेक व्युत्पत्तीही अशाच म्हटल तर पटतात.. म्हटल तर त्या खोडून काढता येतात. एकंदर या हजारो वर्षातल्या धामधुमीच्या काळात हिंदू धर्माला हिंदू हे नाव का मिळाले याचे दुवे निखळले आहेत. पण हिंदू धर्माचे तरल आणि सूक्ष्म तितकेच व्यापक स्वरूप लक्षात घेतले तर या धर्माला तुम्ही काय नाव देता हे अजिबात महत्वाचे नाही. हिंदू म्हणा सिंधू म्हणा इंदू म्हणा भारतीय म्हणा. हा मुद्दा आपण हिंदू धर्माचे स्वरूप ध्यानात घेतले तर लक्षात येतो.



हिंदू धर्माचे उदात्त तत्वज्ञान

सध्या जो बोकाळला आहे व ज्याच्या नावाखाली सनातन्यांचा उन्माद सुरु आहे त्या हिंदुत्ववादाला माझा तीव्र विरोध आहे. ही विचारसरणी हिंदू धर्माशी सुसंगत नाही. Hinduism is basically wrong word. Hindu is not ism it’s a way of life.   हिंदू हा धर्म नसून एक समृद्ध जीवन जगण्याची पद्धती आहे. हिंदू धर्माचे तत्वज्ञान ग्रंथ म्हणून वेद वेदांत स्मृती पुराणे याकडे बोट दाखवले जात असले तरी ते पूर्ण सत्य नाही. हिंदू ही एक जीवनपद्धती हे विधान जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा हे ग्रंथ दुय्यम स्थानावर ढकलेले जातात. ही जीवनपद्धती जगताना प्रत्येक हिंदूने मांडलेले, अंगीकारलेले प्रत्येक तत्वज्ञान हे हिंदू तत्वज्ञान आहे. सर्वसाधारण हिंदू जीवनपद्धती तीन मुद्द्यांभोवती केंदित आहे.

     १.कर्मसिद्धांत – आपल्या सोबत जे काही होत आहे. आपल्या जीवनात जे काही घडत आहे ते सर्व पूर्वजन्मातील सुकृत अथवा पापांचे फळ आहे. आपण जर पूर्वजन्मात पुण्यकर्म केले असेल तर आपल्या सध्याच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतील. याउलट परिस्थितीत वाईट.

     २ .पुनर्जन्म – या जन्मात आपण जी पुण्यकर्मे करणार आहोत त्याचे चांगले फळ आपल्याला पुढच्या जन्मात मिळणार आहे. जर वाईट कर्मे केली तर निश्चितच त्याची वाईट फळे आपणास पुढील जन्मात मिळणार आहेत.

     ३.अंतिम सत्य – अंतिम सत्य अर्थात कोहम या प्रश्नाचे उत्तर. ईश्वराचा साक्षात्कार . त्याच्या सानिध्यात अढळ स्थान. नैनं छिंदन्ति शस्त्रानी नैनं छिंदन्ति अस्त्रानी न चैन क्लेदयांत्यापो नैनं दहति पावकः अश्या अजर अमर आत्म्याचे चिरंतन विश्रांतीचे स्थल. या जन्म मृत्युच्या चक्रातून मुक्ती अर्थात मोक्ष.
 
     चार वेद, चार पुरुषार्थ, चार आश्रम, चार वर्ण या सर्व गोष्टींची गुंफण या मूळ मुद्द्यांभोवती केली आहे. सर्वांभूती एकच तत्व वास करत. हे तत्व सर्व चराचरात सामावले आहे. ही भवसागर सृष्टी ही त्या तत्वाने रचली आहे. हे गुह्य आचार विचारात बिंबवून जगलेले जीवन मोक्ष मिळवून देते जे अंतिम सत्य आहे. अंतिम ध्येय आहे. हे वेदांचे सार आहे. अर्थ व काम यांचा नियंत्रित व सुयोग्य मार्गाने उपयोग हा मोक्ष मिळवून देतो. हा हिंदू धर्माचे अंतिम सत्य असलेला मोक्ष मिळवण्याचा मार्ग किती साधा आहे पहा.

     यासाठी वेद वाचण्याची गरज नाही. कोणत्याही मंदिरात जाण्याची गरज नाही. कोणतीही कर्मकांडे पूजा उपास तापास करण्याची गरज नाही. सत्यनारायण, वास्तुशांती, नागनारायणबली, कोकीळव्रत, लक्ष्मीव्रत ..हेमाद्रीने सांगितलेली उठल्यापासून झोपेपर्यंत करावयाची कोणतीही व्रते करण्याची गरज नाही. ज्याला रूढार्थाने धार्मिक म्हणू अशी कोणतीही गोष्ट न करता हिंदू  धर्मातील अंतिम सत्याची प्राप्ती होऊ शकते. फक्त कोणाला कसला त्रास न देता शक्य होईल तितकी इतरांना मदत करत, भूतदया ह्रदयी वागवत, एक आदर्श समृद्ध जीवन जगणे यासाठी पुरेसे आहे. आणि

     सर्वात महत्वाची गोष्ट अशी की हिंदू म्हणवून घेण्यासाठी तुम्हाला यापैकी कोणतीही गोष्ट करण्याची गरज नाही. यापैकी काही केले नाही अगदी देवळाच्या पायरीवर उभे राहून तुम्ही देवाशी भांडलात तरी तुमच्या हिंदू असण्यात कोणती बाधा येत नाही.

     आणि मला वाटते की या विश्वातील कोणत्याही सामाजिक सलोखा राखून जीवन जगू पाहणाऱ्या समूहास ही विचारसरणी सार्वकालिक आदर्शवत आहे.

      कालांतराने हिंदू धर्मात स्वत:च्या फायद्यासाठी धर्मसत्ता काही उच्च समुदायांनी हस्तगत केली. त्यात नाना कर्मकांडे घुसवली. जातीभेद वाढला. हिंदू धर्माची निश्चित अशी कठोर बांधणी कधीच नसल्यामुळे हे करणे त्यांना कठीण गेले नाही. व हळू हळू या उदात्त तत्वज्ञानाचे विडंबन होऊन ही कर्मकांडे व मंदिरातला देव हाच धर्म समजला जाऊ लागला.

समारोप

     हिंदू धर्म हा माझ्या मते एक भौगोलिक धर्म आहे. भारताचे विशिष्ट भौगोलिक स्थान हिंदू धर्माच्या वाढीस व विकासास कारणीभूत आहे. ही एक लोकसंस्कृती आहे. किंबहुना विविधतेत एकता असलेल्या विभिन्न भौगोलिक भागातील विविध लोकसंस्कृतीचा एक समुच्चय आहे. राहिला प्रश्न फक्त हिंदू या संज्ञेचा . हिंदू धर्माचा समकालीन असा एकही धर्म आज या भूतलावर अस्तित्वात नाही. तत्कालीन काळात पृथ्वीवरील विविध खंडांत जेथे संस्कृत्या नांदल्या त्यांच्या धर्मालाही विशिष्ट्य नावे नाहीत. इजिप्तचा प्राचीन धर्म, ग्रीक चा प्राचीन धर्म, रोमनांचा प्राचीन धर्म यांना कोणत्याही विशिष्ट संज्ञेत बद्ध केलेले नाही. पृथ्वीवरील आदीम काळातील प्राथमिक अवस्थेतील स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे उत्तरोत्तर विकसित व समृद्ध होत गेलेले हे धर्म आहेत. आणि यापैकी फक्त हिंदू धर्म आज घडीला टिकून आहे.

     धर्म सुधारणेचे हिंदू धर्म नेहमीच स्वागत करेल. टीका निंदा सर्वकाही स्वागतार्ह. हिंदू धर्म चार्वाकांपासून हे पचवत आलेला आहे. नव्हे बाहू पसरून स्वागत करत आलेला आहे. फक्त इथे काही विशिष्ट लोक आणि ते सांगतात तो हिंदू धर्म नाही. किंवा त्यांच्या कृती या हिंदू धर्माच्या कृती नाहीत याची थोडी नोंद घ्यावी. हे धर्म-मक्तेदार सांगतात तो आपला धर्म नसून हिंदू धर्माचे हे तरल व लवचिक रूप सर्व धर्म सुधारणा करू इच्छिनारांनी जाणून घ्यावे. तुकाराम महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, महात्मा बसवेश्वर यांच्या काळात हे त्यांना कठीण गेले असले तरी आज हे तितकेसे कठीण राहिलेले नाही.
-सुहास भुसे    


Friday 21 August 2015

महाराष्ट्र भूषण वादावर खरेच पडदा पडलाय का ?

     पुरंदरे यांना कडेकोट बंदोबस्तात व मोजक्या २५० लोकांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भूषण दिला गेला. हुश्श्य ! चला एक अध्याय संपला, म्हणून काहीजनांनी सुटकेचा निश्वास सोडला असेल. तथापि या पुरस्काराच्या नितीत्ताने महाराष्ट्रात निर्माण झालेले वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक वादळ खरेच शमले आहे का ?


पुरंदरे त्यांनी लिहिलेला भला बुरा इतिहास यावर भरपूर चर्चा करून झाली आहे. तथापि एकूणच या पुरस्कारासंदर्भात सामान्य माणूस व विविध विचारवंत यांच्या प्रतिक्रिया तटस्थ वृत्तीने बघितल्यानंतर काय दिसते ? दोन्ही बाजूंनी उन्माद व्यक्त झाला, वगैरे वरवरच्या प्रतिक्रिया चर्चा म्हणून ठीक आहेत पण ते परिस्थितीचे अचूक विश्लेषण नव्हे. या निमित्ताने समाजाच्या वैचारिकतेचा पाया म्हणवल्या गेलेल्या विचारवंतांनी, सरकारने, व खुद्द पुरस्कार मूर्तींनी अनेक चुकीचे पायंडे पाडले आहेत. त्याचा दूरगामी परिणाम आगामी काळात दिसून येणार आहे.

या निमित्ताने कधी नव्हे ते महाराष्ट्रात दोन उभे तट दिसून आले. अनेकजण पुरंदरेचे समर्थन करत होते तर अनेकजण विरोध. विरोध करणारा किंवा समर्थन करणारा समुदाय जितका व्यापक व मोठा असेल तितके त्यातील लोकांच्या ती बाजू घेण्याच्या कारणांचे वैविध्य वाढत जाते. एखाद्या देवाची यात्रा असेल तर तिथे जमलेले सर्वचजण भक्तीभावाने देवदर्शनाला आलेले असतात असे म्हणणे फारच भोळेपणा ठरेल. काहीजण तिथे प्रसाद व विविध वस्तू विकायला आलेले असतात. काहीजण पर्यटन म्हणून, काहीजण गर्दीत खिसे कापायला..व्यक्तिगणिक कारणे वाढत जातात. असे जरी असले तरी या इतर कारणांसाठी जमा झालेल्या लोकांची संख्या कधीच भक्तांच्या संख्येइतकी असू शकत नाही. तद्वताच पुरंदरे यांना विरोध करणारे सर्वच एकाच समान कारणासाठी विरोध करत होते असे म्हणणे फसवणूक ठरेल. यात निश्चित काहीजण राजकीय हेतूने प्रेरित होते. काहीजण पुरंदरे ब्राह्मण आहेत म्हणून ब्राह्मणद्वेषापोटीही विरोध करत असतील. तथापि अश्या लोकांची संख्या ही पुरंदरे यांची बाजू चूक आहे म्हणून विरोध करणाऱ्या सर्वसामान्य शिवप्रेमी लोकांच्या तुलनेत नगण्यच होती हे या कडे थोडे तटस्थ वृत्तीने पाहून विविध स्तरातून व्यक्त झालेल्या प्रतिक्रियांचा अंदाज घेतला तर सहज लक्षात येऊ शकते.

     पुरंदरे यांचे समर्थक या सर्व वादादरम्यान संभाजी ब्रिगेड या संघटनेला व जितेंद्र आव्हाड यांनाच लक्ष करत राहिले. पण या विरोधी प्रतिक्रिया किती मोठ्या स्तरातून येत आहेत इकडे त्यांनी मुद्दाम दुर्लक्ष केले. व हा सर्व विरोध जातीय ठरवण्यात धन्यता मानली. असे करणे त्यांच्या समर्थनाच्या रणनीतीच्या दृष्टीने फायदेशीर असले तरी सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हानिकारक ठरले आहे. त्यांच्या या भूमिकेतून समाजात जातीय धृवीकरण झाल्याचे चित्र निर्माण झाले. बहुतांश ब्राह्मण समुदाय पुरंदरे यांच्या समर्थनार्थ एकवटला. या दरम्यान ब्राह्मण पुरोगामी विचारवंतांची कचखाऊ वृत्तीही समोर आली. मोक्याच्या क्षणी पुरोगामित्व सोडून ते प्रतिगाम्यांच्या कळपात शिरतात हे निर्माण झालेले चित्र त्यांच्या विश्वासाहार्यतेसाठी आगामी काळात प्रश्नचिन्हांकित राहणार आहे. काही ब्राह्मण किंवा मराठा नसलेल्या विचारवंतानी तटस्थ राहत किंवा संदिग्ध प्रतिक्रिया देत हा वाद मराठा व ब्राह्मण जातीत आहे आपल्याला काय घेणे देणे असा कपाळकरंटेपणा ही दाखवला. अस करताना आपण लिहित असतो ते तत्वज्ञान  व वागतोय तो व्यवहार यात पडलेली तफावत लक्षात येणारी आहे याची तमा बाळगली नाही.  

ब मो पुरंदरे हा पुरस्कार स्वीकारल्यावर आपल्या भाषणाच्या सुरवातीसच म्हणाले की " इतिहासकाराने आपल्या लिखाणावर येणाऱ्या प्रतिक्रियांविषयी जागरूक असले पाहिजे. नवे पुरावे समोर आले तर बदलास तयार राहिले पाहिजे."  त्यांच्या भाषणात मला हे सर्वात महत्वाचे विधान वाटले. आता प्रश्न असा आहे की या आपल्या विधानाप्रमाणे पुरंदरे स्वत: का वागले नाहीत. बोलणे आणि कृती यात इतकी प्रचंड तफावत त्यांनी स्वत: दाखवून देऊन ही लोकांना समजणार नाही इतकी खुळी जनता आता राहिली आहे का ? पुरंदरे यांनी चुकीचा इतिहास लिहिला. त्यांच्या लेखनातला काही भाग विकृत म्हणून समोर आला. हे कदाचित त्यांनी मुद्दाम केले नसेल. त्यावेळी उपलब्ध असलेल्या साधनांवरून त्यांनी तस लिहिले असेल. पण जेव्हा नवी संशोधित साधने समोर आली. रामदास व शिवाजी महाराज यांची भेटच झाली नव्हती हे सिद्ध झाले. दादोजी कोंडदेव कुलकर्णी हा शिवाजी महाराजांचा गुरु नव्हता हे समोर आले तेव्हा आपल्याच विधानाप्रमाणे आपल्या लेखनात बदल करण्यास पुरंदरे का पुढे आले नाहीत ? जेम्स लेन बद्दल त्यांच्या भूमिकेवर सतत संशय व्यक्त होत राहिला व ते १३ वर्षे यावर मौन बाळगून राहिले. पुरंदरे यांचे समर्थक ते फार मोठे शिवभक्त असल्याची द्वाही देत असतात. मग इतक्या मोठ्या बदनामीवर पुरंदरे यांनी का कधीही जाहीर प्रतिक्रिया दिली नाही ? ते म्हणतात तसे अश्या मोठ्या शिवभक्ताची अश्या संवेदनशील प्रकरणात फक्त ऑक्सफर्ड प्रेस ला एक पत्र पाठवून जबाबदारी संपते का ? जर त्यांच्या लेखनातील काही भागावर ते विकृत आहे असा आक्षेप घेतला जात असेल तर ते जनभावनेचा आदर करून व आपल्या शिवप्रेमाला स्मरून सदर लिखाण त्यांनी वगळले का नाही ? हे सर्व बदल करून देखील त्यांची ‘राजा शिवछत्रपती’ तितकीच वाचनीय राहिली असती. नव्हे तिची झळाळी अधिकच वाढली असती. मग का केल नाही अस त्यांनी ?

या संपूर्ण प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची व त्यांच्या सरकारची भूमिका संशयास्पद राहिली. इतका वाद होत असताना ही सर्व गोष्टींकडे ते तटस्थपणे पाहत राहिले. त्यामुळे हा वाद असाच पेटता राहावा अशीच त्यांची सुप्त इच्छा आहे असा जनतेचा समज होण्यास मदत झाली. तसेच महाराष्ट्र भूषण प्रदान सोहळ्यात माननीय फडणवीस महोदयांनी एक अत्यंत आक्षेपार्ह्य विधान केले. आपल्या भाषणात म्हणाले की  “आज जर महाराज असते तर पुरंदरे यांना विरोध करणारांचा त्यांनी कडेलोट केला असता.”  हे विधान करताना मुख्यमंत्री आपण एका समाजाचे, एका जातीचे, एका विचारसरणीशी बांधील मुख्यमंत्री नसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत, इथल्या सर्व विचारांच्या जनतेशी आपली बांधिलकी आहे, सर्व जातिधर्म आपणास समान आहेत ही आपण पद स्वीकारताना घेतलेली शपथ ते विसरले. एका संपूर्ण लोकशाही मार्गाने चाललेल्या जनआंदोलनाचा व त्यात सहभागी लक्ष लक्ष सर्वसामान्य जनतेचा त्यांनी अपमान केला. का कडेलोट केला असता महाराजांनी पुरंदरेंच्या प्रक्षेपित इतिहासाला लोकशाही मार्गाने विरोध करणाऱ्यांचा ? त्यांनी कुठे बॉम्बस्फोट केलेत की कोणा बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंतांना गोळ्या घातल्यात ? की फडणवीसांना विरोध केला की सरळ कडेलोट लगेच ? फडणवीस यांचे विधान अत्यंत संतापजनक आहे. त्यांच्या या विधानामुळे फडणवीस यांचे सरकार ब्राह्मणांचे लांगुलचालन करणारे सरकार आहे, संघी, फॅसिस्ट विचारांचे सरकार आहे हा जनतेत हळूहळू दृढ होत असलेला समज अधिकच दृढ झाला आहे.

    अश्या प्रकारे या वादाचे सर्व अंगाने विश्लेषण केले असता महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाच्या चिंधड्या उडाल्या आहेत व जातीय सामाजिक सलोख्याची दीर्घकाळ भरून न येणारी हानी या वादाला चुकीच्या पद्धतीने हाताळले गेल्याने झाली आहे असेच म्हणावे लागते.
                            -सुहास भुसे


 

Tuesday 18 August 2015

ससा आणि कासवाची गोष्ट : बाबा इश्टाइल

छोटासा बाल फावडे नेहमीप्रमाणे बाबांकडे गोष्ट सांगा म्हणून हट्ट धरून बसला होता. बाबा त्याला समजावत होते.

“ हे बघ बाळ फावडू ..असा हट्ट नाय करायचा. आता काही आधीसारखा वेडा नाही तू.. थोडा मोठा झाला आहेस..”

बाल फावडू काही ऐकत नव्हता.

“ नाय मंजे नाय बाबा. मला गोष्ट नाय सांगितली तर मी तुमची दाढी ओढणार.”

अस म्हणून बाल फावडू ने बाबांच्या लांबलचक दाढीलाच हात घातला. मग मात्र बाबांचा नाईलाज झाला.

“ अरे शोड शोड शोन्या ..दाढी शोड आधी ..सांगतो मी गोष्ट. “

अस म्हणत बाबांनी ते नेहमी बाल फावडूला सांगत ती गोष्ट सांगायला सुरवात केली.

“फार फार वर्षापूर्वी या महान भूमीत घनदाट जंगल होत बर का फावडू. आणि तिथे एक ससा आणि कासव राहायचं. एकदा त्या सश्याने कासवाला शर्यतीचे आव्हान दिले. आणि आपले कासव चिंतातूर झाले.

ससा कसला भला मोठा दैत्यच तो. काय त्याचे ते अक्राळ विक्राळ रूप. काय त्याचे ते भयंकर सुळे. काय त्याचे ते लालबुंद डोळे. चार दातांचा बोकडच जणू.  कासव फारच काळजीत पडले. मग ते आपल्याला बालपणापासून पळण्याचे धडे देणाऱ्या आपल्या गुरूकडे अर्थात ऑलिम्पिक विजेत्या लंगड्या लांगोजी कडे गेले."

इथे बाल फावडू ला एक शंका आली.

“ बाबा तो लंगडा तर लांडगा होता ना ?”

त्यावर बाबा म्हणाले,

“ होय रे बाळ फावडू पण आपण ते उघड नाही सांगायचं. आपण ते दडपून ठेवायचं. आपली उत्क्रांती त्याच लांडग्यापासून झाली आहे.”

त्यावर बाल फावडूचे थोडे समाधान झाले.

“पण बाबा त्याचा पाय कशाने तुटला होता हो ?”
बाल फावडूला लांगोजीचा पाय तुटलेली कहाणी ऐकायला आवडायचं. म्हणून तो मुद्दाम हे दरवेळी विचारायचा. पण त्याची ही खोड माहित असल्याने बाबा थोडक्यात सांगत म्हणाले.

“ बाल फावडू ..अरे एकदा जंगलात झालेल्या घनघोर युद्धात त्याचा पाय तुटला होता.”

“ काहीही हं बाबा ( फावडू श्री जान्हवीचा पण फॅन ) तुम्ही तर मागे मला सांगितलेले की लांगोजी ने सिंह महाराजांची शिकार चोरली म्हणून महाराजांनी त्याचा पाय कलम केला.”
बाबा थोडेसे चिडले.

“ फावड्या तुला कितीवेळा सांगितले आहे की अस खर खर सगळ सांगायचं नसत म्हणून. पुढे सांगू गोष्ट की राहू दे ? “

त्यावर बाल फावडू ने माघार घेतली.

“ ठीक आहे सांगा पुढे बाबा.”

बाबांनी पुढे सांगायला सुरवात केली.

“ तर लांगोजी ने आपले सर्व कारभारी मंडळ बोलावले. त्यात तरस, गिधाड, साळिंद्र, रानडुक्कर, गांडूळ असे सर्व दिग्गज, विद्वान आणि जातिवंत हुशार प्राणी होते. या सर्व विद्वान कारभाऱ्यानी एक परिपूर्ण योजना तयार केली. ती कासवाला व्यवस्थित समजावून दिली. मग अशी जय्यत तयारी झाल्यावर कासव भल्या पहाटे उठून जवळच्याच तळ्यात राहणाऱ्या आपल्या अध्यात्मिक प्रेरक अश्या गुरूंच्या ह.भ.प. बकस्वामींच्या दर्शनाला निघाले.”

इथे आपल्या बाल फावडूला दुसरी शंका आली.

“ पण बाबा ते बकस्वामी तर तिकडे लांब दुसऱ्या जंगलातल्या तळ्यात राहायचे ना ? तिकडे इतक्या लांब तर कासव कधी गेलेच नव्हते.”

बाबा पुन्हा भडकले.

“ फावड्या तुला पुन्हा त्या मोठ्या मोठ्या गोळ्या सुरु करू काय ?  अरे बाळ फावडू तुला किती वेळा सांगितले की अस सगळ खर खर सांगायचं नसत. अरे ही गोष्ट आहे. ललित आहे. इतिहास नाही. यात खपून जात असल काही बाही. “

बाल फावडू बाबा पुन्हा गोष्ट थांबवतील या भीतीने गप्प बसला व बाबा पुढे सांगू लागले.

“ तर मग काय ते बकस्वामींचे ध्यान !! अहाहा !! एक डोळा मिटलेला. एक डोळा पाण्यात माश्यावर रोखलेला. एक पाय पाण्यात, एक अर्धा उचललेला. धन्य धन्य ते स्वामी. तर कासवाने त्यांना मनोभावे नमस्कार केला. त्यावर चुकून बकस्वामीनी आपला पाण्यात असलेला एकमेव पाय आशीर्वादासाठी उचलला आणि धप्पकन ते पाण्यात पडले. कासवाला त्यांची ती मनोज्ञ समाधीवस्था पाहून खूप आनंद झाला. नाकातोंडात पाणी गेल्याने ठसकत बकस्वामी मोठ्याने ओरडले, “ स्थापन कराव्या बकमंडळया..सहस्र बकभोजने सुरु करा. तुमचे मनोरथ पूर्ण होतील.”

ऐकुंन धन्य झालेलं कासव शर्यतीच्या मैदानात आले. होता होता शर्यत सुरु झाली. ससा धावू लागला. आपल्या गुरुच्या ऑलिम्पिक विजेत्या लंगड्या लांगोजीच्या ट्रेनिंग आणि कारभारीमंडळीच्या व्युहाप्रमाणे कासवही जोरात धावू लागले. ससा जोरात ..कासव आणखी जोरात ..ससा तावात ...कासव जोशात ...ससा घामेघूम झाला. त्याला कळून चुकले ही लांगोजी च्या ट्रेनिंग ची आणि बकस्वामींच्या आशीर्वादाची किमया. आपण हरणार. तो हताश होऊन तिथेच बसला. इकडे मोठ्या जोशात कासवाने पी टी उषा ला लाजवेल अशी दौड मारून शर्यत जिंकली.”

छोटा बाल फावडू नेहमी प्रमाणे खुश होऊन टाळ्या वाजवू लागला . बाबा खुश झाले. त्यांनी प्रेमाने बाल फावडू च्या डोक्यावरून हात फिरवला. त्यावर लाडात येऊन बाल फावडू म्हणाला ..

“ बाबा पण तुम्ही ना अश्शे लब्बाड आहेत ना ...मला माहित आहे अश्शे काहीच झाले नव्हते. तो ससा किणी झोपला. मग कासव चिकाटीने आणि दृढनिश्चयाने चालत राहिले. आपल्या अटळ ध्येयनिष्ठेमुळे आणि आपल्या अंगच्या गुणांमुळे ते शर्यत जिंकले."

बाबांनी हताश होऊन बालफावडू कडे पाहिले आणि मोबाईल घेऊन दुख्खद अंतकरणाने मेंटल हॉस्पिटल ला फोन लावला.

                                                          -सुहास भुसे.

Disclaimer – हे एक निव्वळ विनोदी प्रहसन आहे. याचा जर कोणत्या जीवित व मृत व्यक्तीशी सबंध आढळल्यास तो योगायोग न समजता तसा सबंध आहेच अस बिनदिक्कत समजावे.


Monday 17 August 2015

वादग्रस्त इतिहासकार पुरंदरे : अनुत्तरित प्रश्न आणि आक्षेप भाग-2

     मागील लेखात आपण पुरंदरे यांनी शिवजयंती दिनांकाबाबत घोळ घालून मुद्दामहून संभ्रमाचे वातावरण कसे तयार केले, शिवरायांना त्यांची नसलेली गोब्राह्मण प्रतिपालक ही बिरुदावली कशी चिकटवली आणि जेम्स लेन ला संदिग्ध मदत करून त्याचे कौतुक करून कधीही साधा निषेधही कसा व्यक्त केला नाही हे तपशीलवार पाहिले. या उत्तरार्धात आपण इतर आक्षेपांची चर्चा करू पैकी

४ राजमाता जिजाऊची बदनामी करणे
५ मराठा सरदारांचे चुकीचे एकांगी चित्र रंगवून त्यांच्यावर विकृत टीका करणे.

या दोन आक्षेपांबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी पुरंदरे ना पाठवलेल्या पत्रात ( ज्याला पुरंदरे यांनी अद्याप उत्तर दिलेले नाही )  सविस्तर मुद्देसूद मांडणी आहे. त्यापेक्षा अधिक काही लिहिण्यासारखे नाही म्हणून मी ती पत्रेच इथ टाकत आहे. या दोन मुद्द्यांसाठी वाचकांनी ती पाहावीत. दोन महत्वाच्या आक्षेपांविषयी चर्चा करू.

६. रामदासाला स्वराज्यप्रेरक व गुरु दाखवणे, व शहाजीराजांच्या स्वराज्यप्रेरक या भुमिकेकडे दुर्लक्ष करणे.

     रामदासांना शिवछत्रपतींचे गुरु व स्वराज्याचे प्रेरक म्हणून दाखवणे ही आणखी एक मोठी लबाडी. या दादोजी व रामदास यांच्या कारस्थानात फक्त पुरंदरेच नाहीत तर अनेक ब्राह्मण इतिहासकार सामील आहेत. रामदासांचे उदात्तीकरण करण्याच्या नादात पुन्हा एकदा धादांत खोटा इतिहास शिवप्रेमींच्या गळ्यात मारण्यात आला.

एका पत्रकार परिषदेत स्वत: बाबासाहेब पुरंदरे यांनी स्वत: कबुली दिली आहे की .. “ होय रामदास शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते.” यावर उपस्थित पत्रकारांनी त्यांना विचारले की “ अनेक इतिहासकार तस सिद्ध करत आहेत मग तुम्ही स्पष्ट सांगत का नाहीत हे “ यावर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले.  “ ते म्हणतात ते खोट नाही. ते इतिहास जरा ताणतायत. मी रामदासांना संशयाचा फायदा देतोय.”   असे चक्क हास्यास्पद उत्तर त्यांनी पत्रकार परिषदेत दिले.

हरी नरके याविषयी म्हणतात पहिल्यांदा राजवाडे, ह ना आपटे, बाल टिळक, शक्र श्रीधर देव ,ल रा पांगारकर, अनंत दास रामदासी, न्या रानडे सदाशीव खंडो आळपेकर आदी अनेक मंडळींनी यावर सुपारी घेऊन  १८७० ते २००४  अशी तब्बल १३४ वर्षे काम केले. धन्य ती जात निष्ठा ..धन्य तो वर्चस्ववाद.

रामदास स्वराज्यप्रेरक ? 

     रामदास हे स्वराज्य प्रेरक कसे असू शकत नाहीत हे रामदास चरित्रातला कालानुक्रमच सिद्ध करतो. रामदासांचा जन्म झाला इस १६०८ साली. त्यानंतर त्यांचे १२ व्या वर्षी म्हणजे इस १६२० साली लग्न करण्याचे योजले होते. लग्नमंडपातून त्यांनी पलायन केले. पुढे १२ वर्षे नाशिक येथे तपश्चर्या केली . इस  १६३२ साली ती तीर्थयात्रेला निघाले. सुमारे १४ वर्षे तीर्थयात्रा करून ते इस १६४६ साली महाराष्ट्रात आले. तोपर्यंत इस सन १६४५ साली तोरणा जिंकून शिवछत्रपतींनी स्वराज्याचे तोरण बांधले होते. आता या सर्व कालक्रम पाहिला असता तर रामदासांनी छत्रपतीना प्रेरणा दिली या दाव्यातला फोलपणा लक्षात येतो.

रामदासांची कथित राष्ट्रभक्ती 

     महाराष्ट्रात आल्यानंतर ही रामदासांनी इस १६४९ साली पहिले राममंदिर चाफळ आदिलशाही राज्यात बांधले. अर्थात शत्रूराज्यात. त्यासाठी जमीन बाजी घोरपडे अर्थात पुन्हा शिवरायांच्या शत्रूकडून घेतली. त्यासाठी पुन्हा शिवरायांच्या   शत्रूकडून अर्थात मुरार जगदेव कडून त्यांनी या मंदिरासाठी वर्षासन मिळवले. हे अनुदान किंवा वर्षासन रामदासांना मुरार जगदेवाने मिळवून दिले ते आदिलशहा कडून. थोडक्यात रामदास हे शिवछत्रपतींचे गुरु असले तरी ते काम मात्र आदिलशहाचे करत होते. या संदर्भांवरून रामदासांच्या खूप गवगवा केलेल्या राष्ट्रभक्तीचे धिंडवडे निघतात.

रामदास शिवरायांचे गुरु होते का ?

     रामदास हे शिवरायांचे  गुरु होते हे सांगण्यासाठी एक महत्वाचा पुरावा दिला जातो तो तुकारामांच्या अभंगाचा. तुकाराम महाराज शिवछत्रपतीना मार्गदर्शनासाठी रामदासाकडे पाठवतात. यासाठीचे तुकारामांच्य नावावर गाथेत अ क्र १८८६ ते १८९० हे ५ अभंग रामदासीनी घुसडले. ते अभंग कसे प्रक्षेपित आहेत याची तुफान खिल्ली उडवत पुराव्यानिशी हरी नरके यांनी सिद्ध करून दाखवले आहे. यात हरी नरके यांनी या अभंगातील एकेका शब्दाचा पंचनामा करत रामदासी प्रचारकांचा खोटेपणा उघड पाडला आहे.  इच्छुकांनी हरी नरके यांची या विषयावरील भाषणे ऐकावीत. ती यु ट्यूबवर उपलब्ध आहेत.

रामदास शिवाजी महाराज सबंध 

     रामदासी बखरीत लिहिल्या गेलेल्या विनोदी किस्स्यांविषयी तर न बोललेलंच बरे. बखरकार अनेक खोट्या नाट्या कथा रंगवत म्हणतात की रामदास हे इतके महान संत होते की ते थेट औरंगजेब व शिवराय दोघांच्याही अंतपुरात जात असत. यावर नरहर कुरुंदकर म्हणतात की, “रामदास जर शिवाजी महाराज व औरंगजेबाच्या अन्तपुरात जात असेल तर तिथे फक्त राणी किंवा हिजडा किंवा हेर या तीनच व्यक्तिना प्रवेश असतो. रामदास यापैकी कोण होते? "

     रामदासी बखरीत अजून एक हास्यास्पद किस्सा येतो. तो असा की शिवछत्रपतीना एकदा (इस १६५० साली ) आंब्याच्या मोसमात आंबे खात असताना सद्गुरू रामदासांची आठवण झाली. तेव्हा रामदास आपल्या शिष्याच्या भावना जाणून घेऊन तिथे लगेच प्रकट झाले. तेव्हा छत्रपती रायगडावर आपल्या राण्यांसह बसलेले होते. आंबे खाऊन रामदास अंतर्धान पावले. हा किस्सा बखरीनुसार इस १६५० साली घडला तर रायगड स्वराज्यात सामील झाला इस १६५६ साली. तेव्हा याविषयी अधिक काय लिहावे.

     रामदासी बखरीतल्या आणखी एका घानेरड्या संदर्भा विषयी न लिहिलेलच बर...

     रामदास व शिवाजी महाराज यांची आयुष्यात एकदाही भेट झाली नव्हती अस आता साधार सिद्ध झाल आहे. छत्रपती व रामदास यांची भेट झाली होती अस सिद्ध करू शकणारा एकमेव पुरावा म्हणजे इस १६७८ साली लिहिलेल शिवरायांचे पत्र . १५ सप्टेंबर १६७८ च पत्र हे पत्र पूर्णपणे खोटे आहे अस गजानन भास्कर मेहेंदळे यांनी पुराव्यासह सिद्ध केले आहे. हे बनावट पत्र रामदास भक्तांनी हेतूपुरस्पर नंतर तयार केले आहे.

     रामदासी बखरी या पूर्ण प्रक्षिप्त आहेत. जे दोन रामदासी रामदासांच्या प्रत्यक्ष सोबत होते व रामदासांचे निधन झाल्यावर त्यांनी जे रामदास चरित्र लिहिले त्या समकालीन चरित्रात शिवाजी महाराजांचा साधा उल्लेख देखील नाही.
या सर्व गोष्टीवरून व पुराव्यांवरून रामदासाचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील नगण्य स्थान स्पष्ट होते.

खरे स्वराज्यप्रेरक कोण ?

     शिवरायांच्या स्वराज्याला भक्कम पार्श्वभूमी लाभली ती शहाजी राजांची. शहाजी राजांची जी सुप्त इच्छा आपल्या हयातीत पूर्ण झाली नाही ती त्यांनी आपल्या पुत्रामार्फत पूर्ण करण्याचे स्वप्न पाहून त्यासाठी लागणारी सर्व मशागत करून ठेवली व वेळोवेळी करत राहिले. हे शहाजी राजांच्या जयराम पिंडे राधामाधवविलासचंपू या चरित्रावरून स्पष्ट झाले. तिच्या प्रस्तावनेत राजवाडे यांनी पुन्हा रामदासांचा उदो उदो केला आहे. या प्रस्तावने विषयी एक मजेशीर किस्सा ..

     शहाजीराजांच्या दरबारात असलेल्या विद्वान कर्तबगार सल्लागारांमुळे शहाजी राजे घडले आणि मग शहाजीराजांमुळे शिवाजी राजे घडले अशी मांडणी करताना राजवाडे यांनी एक हास्यास्पद बामणी कावा करण्याचा प्रयत्न केला. हे  दाखवताना त्या ७० सल्लागारांत एकही चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण नाही हे राजवाडे यांच्या लक्षात आले. अरेच्चा हे कस शक्य आहे ? मग त्यांनी ओढून ताणून त्यात एक चित्पावन ब्राह्मण घुसडला. या ७० जणांच्या यादीत जे २७ नंबरचे नाव आहे ते म्हणजे गंगाधर अभेद. या अभेद नावाची फोड त्यांनी अभेद म्हणजे  अ + भेद म्हणजे न भिणारा म्हणजे अ + भयंकर म्हणजे अभ्यंकर अशी केली आहे.

     हेच सर्व कारस्थान पुढे रेटत पुरंदरे हे देखील दादोजी ला सर्व श्रेय व महत्व देत प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी शहाजीराजांना गैरहजर दाखवतात. व त्यांचे स्थान शिवचरित्रात नगण्य असल्याचे भासवतात. एका प्रसंगात तर पुरंदरे यांनी अस दाखवल आहे पितृभक्त शिवाजी पित्याच्या सुटकेसाठी कोंढाणा आदिलशाह ला द्यावा लागल्याने चक्क आपल्या पित्याला शिव्या देऊ लागतात त्यावर वृद्ध ब्राह्मण कारभारी त्यांची कानउघडणी करून (साक्षात छत्रपतींची) समजूत घालतो.
   
     असले दिव्य प्रसंग प्रचंड जातीप्रेम असल्याशिवाय कोणी घुसडणे शक्य आहे काय ?

७. दादोजी सारख्या सामान्य आदिलशाही चाकराला प्रचंड वलय प्राप्त करून देऊन त्यांनाही शिवरायांचे गुरुपद चिटकवने

नावापासून लबाडी

     दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु हे आपण सर्वांनी इ. चौथीच्या संस्कारक्षम वयात घोकल्याने इतके पक्के झाले आहे की हे दाधांत खोटे आहे हे स्वीकारणे जड जावे. या खोटे पणाची सुरवात नावापासून सुरु होते. शिवरायांच्या सर्व साथीदारांची नावे व आडनावे इतिहासात येतात. उदा. तानाजी मालुसरे , कोंडाजी फर्जद, बाजीप्रभू देशपांडे इ. इ. अपवाद दोन नावांचा. एक दादोजी कोंडदेव दुसरा दुश्मन कृष्णाजी भास्कर. दादोजी कोंडदेव हा उल्लेख दादोजी कुलकर्णी असा सरळ का येत नाही ? कारण उघड आहे.

दादोजी च्या थापेला विरोध कधीपासून ?

     दादोजीचे सत्य स्वरूप दादोजीचा पुतळा काढला किंवा त्यांच्या नावाचा पुरस्कार रद्द केला तेव्हा उघड झाले नाही तर हे खूप पूर्वीपासून उघड गुपित आहे. दादोजी ला गुरुपदी बसवण्याचे षड्यंत्र साधारणतः पेशवाईच्या उत्तरकाळात सुरु झाले. त्याआधीच्या ऐतिहासिक साधनात अगदी सभासद बखरीत देखील दादोजीचे स्थान नगण्य असल्याने फारसे उल्लेख येत नाहीत. आणि या असत्य इतिहासाची कल्पना सर्वप्रथम महात्मा फुले यांना आली. म्हणूनच शिवरायांच्या गुरुविषयी आपल्या पोवाड्यात ते लिहितात, “ मासा पाणी खेळे गुरु कोण ? “

     पुढे त्याला विरोध राजर्षी शाहू महाराज यांनी केला. आपल्या १९२० साली लिहिलेल्या एका सनदेत ते लिहितात “ दादोजी व रामदास हे श्री शिवछत्रपतींचे गुरु होते ही क्लृप्ती ब्राह्मणांचीच.” हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी त्यांनी छत्रपतींचे सत्य चरित्र लिहावे हा प्रस्ताव त्या काळाच्या मानाने ६००० रुपयांचे घसघशीत मानधन देऊन तात्कालिक इतिहासकार रावबहाद्दूर डी बी पारसनीस यांना दिला. पण ते काम त्यांचेकडून पूर्ण झाले नाही. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनाही हा प्रस्ताव राजर्षीनी दिला होता पण त्यांच्याकडूनही हे कार्य पूर्ण झाले नाही. शेवटी कृष्णाजी अर्जुन केळूसकरांनी त्याकाळी उपलब्ध साधनांनुसार शिवचरित्र पूर्ण केले. हे अस्सल साधने वापरून लिहिले गेलेले पहिले सत्य शिवचरित्र. त्यावेळी बहुजन वृत्तपत्रात हा विषय गाजला पण कालांतराने लोक तो विसरले. शिवाय ब्राह्मनांच्या नगाऱ्यापुढे बहुजनांच्या टिमकीचे आजही फारसे चालत नाही तिथे तो तर जुना काळ होता.

दादोजी विषयी इतिहासकार काय म्हणतात.

१. सभासद बखरीचे संपादक दत्ता भगत - "उत्तरकालीन बखरकारांनी शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत दादोजी कोंडदेवाचे गुरु म्हणून चित्रण करताना दादोजीला अवास्तव महत्व दिले आहे,ते या (सभासद) बखरीत नाही.शिवाजी महाराजांना दादोजीबद्दल आदर असणार पण यांचे संबंध मालक/सेवक (चाकर) आहेत हे सभासदाच्या लक्षात आहे."

२. वा.सी.बेंद्रे  - " शिवाजी-जिजाई यांना दादोजी कोंडदेवाबरोबर पाठविले ही एक काल्पनिक माहीती आहे.अर्थात ती चुकीची आहे."
  वा.सी,बेंद्रे यांनी इ.स.१६४४ मध्ये मुहम्मद अदिलशहाने दादोजी कोंडदेवाचा एक हात कापल्याचे नमुद केले आहे.

३. रा.व्य.जोशी -   "मुघल दरबारच्या एका कागदामध्ये दादोजीचा एक हात अदिलशाहने तोडल्याची बातमी आहे." ("परकियांच्या दृष्टीतुन शिवाजी")

     यावरून इ.स.१६४४ पासून त्याच्या मृत्युपर्यंत म्हणजेच इ.स.१६४७ पर्यंत दादोजीला एकच हात आहे.दादोजी शस्त्रकौश्यल्यासाठी प्रसिद्ध असल्याची समकालीन साधनांमध्ये एकही नोंद नाही.त्यातही एक हात तुटलेल्या अवस्थेमध्ये दादोजीने शिवरायांना शस्त्रास्त्र चालविण्याचे प्रशिक्षण कसे बरे दिले असेल ?

     या विषयातील पुरावे केळूसकर जयसिंगराव पवार वा सी बेंद्रे ग ह खरे सेतू माधव राव पगडी हरी नरके संजय सोनवणी अश्या जुन्या नव्या इतिहासकारांनी वेळो वेळी दिले आहेत. खूप मोठा आणि विस्तृत विषय आहे. इच्छुकांनी या विषयावरील त्यांची मते वाचावीत. काही लेख इथ शेयर करत आहे.

1. संजय सोनावनी

http://sanjaysonawani.blogspot.in/2010/10/blog-post.html?m=1

http://sanjaysonawani.blogspot.in/2012/02/blog-post_06.html?m=1

2. अनंत दारवटकर

http://dadojikonddev.blogspot.in/2010/10/blog-post_9125.html?m=1

समारोप 

     खूप मोठा विषय आहे. अनेक वर्षे अनेक बहुजन विद्वान हे षडयंत्र उघड करून दाखवत आहेत. लिहित आहेत. व्याख्याने देत आहेत. मी फक्त त्यांनी आपल्यापुढे खुल्या केलेल्या ज्ञानसागरातील काही कण संकलित करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे. हळूहळू हे खूप लोकांच्या लक्षात येत आहे. तरीही अजून खूप लोक अज्ञानात आहेत. काहीना सत्य कळून देखील या चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याची त्यांना धास्ती वाटते. या सर्व बहुजन प्रबोधनाचा उद्देश जातीयता पसरवणे हा नसून जातीयतेच्या मुळावर घाव घालणे हा आहे. अनेकजण आपल्या लेखण्या त्यासाठी झिजवत आहेत.

पुरंदरे यांना विरोध म्हणजे ब्राह्मणांना विरोध आहे का ?

     होय . पुरंदरे यांना विरोध प्रतीकात्मक आहे. तो विरोध अश्या सर्व ब्राम्हणी वृत्तीला विरोध आहे जी जातीप्रेमापोटी इतिहास विकृत स्वरुपात प्रक्षेपित स्वरुपात मांडते. हा विरोध ब्राह्मण या पूर्ण जातीला नाही. अनेक इतिहासकार ब्राह्मण असून देखील त्यांनी अत्यंत निष्पक्ष वृत्तीने काम केले आहे. उदा . नरहर कुरुंदकर न र फाटक कमल गोखले वा सी बेंद्रे. किंवा या सर्व प्रबोधनाचा उद्देश वि का राजवाडे यांच्या सारख्या थोर इतिहासकारांचे आयुष्यभराचे कार्य नाकारण्याचाही नाही. पण फक्त त्यांनी जातीप्रेम न दाखवता ते निष्पक्ष वृत्तीने केले असते तर त्याची झळाळी अधिक वाढली असती.
   
     लोकांचे प्रबोधन व्हावे . आपल्या सत्य इतिहासाची त्यांना जाणीव व्हावी. आणि या जागृतीमुळे किमान यापुढे तरी कोणी जातीप्रेम दाखवून इतिहास प्रक्षेपित करून लिहू नये हाच या सर्व बहुजन विद्वान प्रबोधन कारांचा उद्देश आहे. पुरंदरे यांना विरोध, त्यांना पुरस्कार देऊ नये याला विरोध केवळ याच कारणासाठी आहे. त्याला जातीयतेची, ब्राह्मणद्वेषाची लेबले लावून सत्यापासून तात्पुरता पळ काढता येईल. पण फार दिवस नाही .

सत्य परेशान हो सकता है , पराजित नही  !!!
-सुहास भुसे

संदर्भ -
हरी नरके यांचे संशोधनपर लेख..भाषणे
इंद्रजीत सावंत यांचे संशोधनपर लेख
अनंत दारवटकर यांचे संशोधनपर लेख
व इतर अनेक स्फुट संदर्भ






Friday 14 August 2015

कुंतीचे रहस्य

     कुंतीला पुत्र कसे झाले याची मोठी रोचक मिथककथा सांगितली जाते. या मिथककथेनुसार दुर्वास ऋषीच्या यज्ञात एक वर्षभर रात्रंदिवस कुंतीने दुर्वासाची सेवा केली. त्याचा यज्ञ संपन्न झाला तेव्हा दुर्वासाने प्रसन्न होऊन कुंतीला देवाहुती मंत्राची दीक्षा दिली. या मंत्रानुसार कोणत्याही देवाचे स्मरण करून या मंत्राचे उच्चारण केले तर तो देव तिच्या पोटात त्याचा गर्भ उत्पन्न करून जाणार अशी त्यात शक्ती होती.
   
     तर दुर्वास गेल्यावर लगेच कुंतीला या मंत्राचा प्रयोग करून बघण्याची इच्छा झाली व तिने सूर्याचे स्मरण केले. यातून तिला कुमारी असताना अर्थात विवाह झाला नसताना कर्ण हा पुत्र झाला. पण बदनामीच्या भीतीने कुंतीने त्याला अश्वनदीत सोडून दिले. त्याचा त्याग केला.

     त्यानंतर तिचा विवाह पांडू सोबत झाला. हा पांडू एकदा मृगया करण्यासाठी वनात गेला असताना तिथे किंदम नावाचा ऋषी हरणाच्या रुपात आपल्या प्रेयसी बरोबर संभोग करत होता. पांडूने त्याला बाण मारला. अर्थात त्याला ते हरीण म्हणजे किंदम ऋषी आहे हे माहित असण्याचे कारण नाही. तर यावर क्रोधीत होऊन मरता मरता किंदम ऋषीने “ तू संभोग लालसेने जेव्हा तुझ्या स्त्रीला जवळ घेशील तेव्हा तूला माझ्यासारखाच तडफडून मृत्यू येईल “ असा शाप दिला.

     या शापामुळे पांडूला विरक्ती आली व तो कुंती आणि माद्री या आपल्या दोन नवविवाहित पत्नी घेऊन वनात निघून गेला. काही काळ गेल्यावर त्याला पुत्रलालसा निर्माण झाली. परंतु तो स्वत: तर संभोग करू शकत नव्हता. तेव्हा कुंतीने देवाहुती मंत्राच्या सहाय्याने यम वायू व इंद्र यांच्यापासून अनुक्रमे युधिष्ठर भीम व अर्जुन हे पुत्र उत्पन्न केले. पुढे माद्रीलाही असेच नकुल सहदेव हे पुत्र झाले.

     आता थोडस या मिथक कथेकडे डोळसपणे पाहू. अस वर दिल्यावर किंवा प्रसाद म्हणून आंबा वगैरे खाल्यावर मुल होत नाही त्यासाठी स्त्री व पुरुष यांच्यात संभोग झाला पाहिजे इतके प्राथमिक वैज्ञानिक ज्ञान आपल्याला आले आहे. विषयात शिरण्याच्या आधी एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की महाभारताचा काळ हा हजारो वर्षांपूर्वीचा आहे. तेव्हाच्या वैदिक धर्मातील समजुती व समाजमान्यता या निराळ्या होत्या. द्रौपदीच्या उदाहरणावरून असे दिसते की त्याकाळात बहुपतित्व हे वैदिक धर्मसंमत व समाजमान्य होते.  जर अपत्य होत नसेल तर धर्मसंमत असे काही उपाय होते. त्यातलाच एक उपाय म्हणजे नियोग पद्धती. या पद्धतीत जर एखाद्या स्त्रीला नवऱ्यापासून अपत्य होत नसेल किंवा तिचा नवरा अपत्य देण्यास अक्षम असेल तर परिवारातीलच कोणाकडून उदा. दीर वगैरे तरी किंवा तशी उपलब्धता नसेल तर रक्ताच्या कोणाकडून तरी त्या स्त्री ला अपत्य प्राप्ती करता येत असे.

     याचे एक उदाहरण भीष्माची आई व कौरव पांडवांची पणजी सत्यवती. तिला नियोग पद्धतीने पराशर ऋषी पासून व्यास हा पुत्र झाला होता. पुढे सत्यवतीचा पुत्र विचित्रवीर्य अकाली मृत्यू पावला. त्याच्या दोन बायका अंबिका व अंबालिका या निपुत्रिक होत्या. तेव्हा आपला कुरु वंश बुडू नये म्हणून सत्यवतीने नियोग विधीने नातू उत्पन्न करण्याचा निर्णय घेतला. तिने आपला पुत्र भीष्माला आधी विचारले पण त्याने ब्रम्हचर्यपालनाची भीष्मप्रतिज्ञा केली असल्याने या गोष्टीला नकार दिला. मग तिने अंबिका व अंबालिका यांचा दीर, विचित्रविर्याचा भाऊ व आपला मुलगा व्यास याला आपल्या सुनांसोबत व त्याच्या वहिन्यांसोबत संभोग करून अपत्यप्राप्ती करण्याची आज्ञा केली. मग व्यासाने आधी अंबिकेसोबत संभोग केला. त्यावेळी अंबिकेने व्यासाचे दाढी भस्म असे उग्र रूप बघून डोळे ,मिटून घेतले. यावर रसभंग होऊन व्यासाने तिला तुला अंध पुत्र होईल असा शाप दिला. त्यानंतर अंबालिकेची बारी आली. ती व्यासासोबत संभोग करताना भीतीने पांढरी पडली त्यामुळे तिला तुला पंडू पांढूरका पुत्र होईल असा शाप दिला.( कमाल आहे कि नाही या व्यासांची ) तर हे दोन पुत्र म्हणजे धृतराष्ट्र व पांडू. यातला शापाचा प्रसंग मिथक असला तरी नियोगाला असलेली वैदिक धर्माची राजमान्यता ही दोन उदाहरणे अधोरेखीत करतात.

व्यासाचे उग्र रूप पाहुन अंबिका भयभीत झाली


     वैदिक धर्माचे हे तात्कालिक स्वरूप लक्षात घेतले असता कुंतीला पुत्र कसे झाले असावेत याचा तर्क करता  येतो. पांडूचा शाप म्हणजे पांडूचा षंढपणा लपवण्यासाठी केलेली मिथककथा आहे. मग कुंतीला आपल्या सासूने व आजेसासूने जो नियोग विधीचा मार्ग अवलंबला त्या मार्गावरून जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. आणि हे त्याकाळी वैदिक धर्मसंमत व समाजमान्य होते हे ही ध्यानात घ्यावे. वनात असताना त्याकाळी हिमालयात वास्तव्य असणाऱ्या उंच, धिप्पाड, गौर, पितकेशी व शूर असणाऱ्या जमातीतील काही पुरुषांपासून तिला हे वीरपुत्र झाले. या निरोग विधियुक्त संभोगात इतर पुरुषांचा वापर झाला. अर्थात कुरु घराण्यातील व्यक्तीचा नाही.  नियोग पद्धती वैदिक धर्माला मान्य असली तरी पांडव हे आपल्या रक्ताचे नाहीत म्हणजे कुरु नाहीत म्हणून दुर्योधन त्यांना विरोध करत असे हा ही संदर्भ महत्वाचा.

     नंतरच्या काळात धर्मकल्पना विवाह पद्धती बदलल्यानंतर ही कुंतीची कथा काही लोकांना व्यभिचार कथा वाटू लागली व हे टाळण्यासाठी या कथेला देवाहुती मंत्राचे व दैवी वरदानाचे अभेद्य कवच देण्यात आले.

     आता राहिला कर्णाचा विषय. सुमारे एक वर्ष दुर्वासाची रात्रंदिवस सेवा केल्यावर दुर्वास गेल्यावर लगेच कुंतीचे गर्भवती होणे व पुढे कुमारी असताना कर्णाला जन्म देणे हे कर्ण हा कुंतीला दुर्वासापासून झालेला पुत्र होता हे कळण्यासाठी फार खोलात जाण्याची गरज पडत नाही.

( संस्कृतीरक्षकांसाठी विशेष टीप – सदर लेख फक्त सत्य व कुंतीच्या वरदानाच्या मिथकाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी आहे. यात कुंतीची बदनामी करण्याचा हेतू नाही. )

-सुहास भूसे


Friday 7 August 2015

वादग्रस्त इतिहासकार पुरंदरे : अनुत्तरित प्रश्न व आक्षेप भाग 1

     ब मो पुरंदरे यांना जो विरोध होता व होत आहे तो जेम्स लेन प्रकरणापासून अधिक तीव्र झाला आहे. तो आजचा नाही तर मागील अनेक वर्षांपासून होत आहे. महाराष्ट्राच्या समतेच्या सामाजिक चळवळीत अग्रणी असणाऱ्या जवळ जवळ सर्व विचारवंतानी ब मो पुरंदरे यांच्यावर टीका केली आहे. अनेक इतिहासकरांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. अश्या काही निवडक लोकांची यादी त्यांची वक्तव्ये संदर्भांसहित पाहू . म्हणजे हा विरोध मंबाजी ब्रिगेडवाले आवई उठवत आहेत त्याप्रमाणे फक्त काही मुठभर लोक आणि जितेंद आव्हाड करत आहेत की सर्वच स्तरातून त्यांना सर्वंकष विरोध आहे हे ध्यानात येईल.

बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांच्याबद्दल विविध मान्यवरांचे  मत

1) त्र्यं. श. शेजवलकर यांनी 'ब मो पुरंदरेचे राष्ट्रीय स्वयंसेवकी विचार ' हा लेख लिहून पुरंदरेच्या मानसिकतेवर प्रकाश टाकून त्यांच्या हेतू बद्दल शंका व्यक्त केली आहे.(सं.- शेजवलकर त्र्यं. श.पूर्वोक्त पान ५०३)

2) "शिवाजी महाराजांसोबत नुर बेग ,दौलतखान, सिद्दी हीलाल, मदारी मेहतर, इब्राहीम खान ही मंडळी होती. मात्र बाबासाहेब पुरंदरेच्या तोंडात यांचे कधी नाव आलेच नाही. पैसे मिळतील म्हणून जसा मुद्रांक छापायचा प्रकार जसा त्याला संरक्षण देणाऱ्याच्या अंगावर उलटला इतिहास लेखनात झालेले प्रकारही असेच उलटतील शिवाजी महाराजांचा केवळ हिंदुत्ववादी म्हणून प्रचार केला गेल्याने इतिहासकारांनी तिरप्या पद्धतीने बांधलेली हि चुकीची भिंत आता त्यांच्यावरच कोसळत आहे, अशा गोष्टी दूर केल्याशिवाय आता आपल्याला महासत्ता होता येणार नाही. "
- ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त भालचंद्र नेमाडे( सं.- ‘चुकीचा इतिहास लिहिणाऱ्यावर भिंत कोसळत आहे 'लेख दैनिक लोकसत्ता ,दिनांक १ जाने 2004)

3) "आता मला लोक विचारतात, काय हो पुरंदरेच्या शिवचरित्र बद्दल तुमचे काय मत आहे ? त्याला मी एकच उत्तर देतो. पुरंदरे स्वतः म्हणतात कि 'हे शिवचरित्र म्हणजे इतिहास न्हवे. ऐतिहासिक साधनावर आधारलेली बखर आहे, आणि मी शाहीर आहे .' असे असून सुद्धा आपण त्यांच्या मागे लागतो इतिहाससंशोधक काय म्हणतात म्हणून . हा त्यांच्यावर अन्याय आहे " अश्या शब्दात सेतू माधवराव पुरंदरेंचा उपहास करतात.
-सेतू माधवराव पगडी (सं.- पगडी सेतू माधवराव पूर्वोक्त पान 11)

4) "एका बाजूला शिवाजी महाराजांना डोक्यावर घेवून भाबड्या शुद्रातीशुद्राना नादाला लावायचे आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराजांना बदनाम करायचे. यात सर्वात वाकबगार शिवशाहीर पुरंदरे आहेत "
-प्राच्यविद्यातज्ञ कॉ. शरद पाटील (सं. -शिवाजीचे पितृत्व व अब्राम्हनी विमोचन संघर्ष शोधनिबंध पान ५)

5) पुरंदरेचे शिवचरित्र हे भटी शिवचरित्र आहे.
-प्रबोधनकार ठाकरे
शिवाय बाळासाहेब ठाकरे यांचा देखील पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण देण्यास विरोध होता. त्यांनी पुरंदरेंची खिल्ली उडवलेले वीडियो यु ट्यूब वर उपलब्ध आहेत.

6) जिजाऊचे चारित्र्यहनन करणाऱ्या जेम्स लेन ने आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत बाबासाहेब पुरंदरे यांचे आभार मानले आहेत मात्र तरीही पुरंदरे यांनी त्यावर आक्षेप घेतलेला नाही. त्यामुळे पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण देण्यात येऊ नये.
-डॉ जयसिंगराव पवार (सं.- म टा वृत्त १४ जून १५ )

 7) पुरंदरे यांना पुरस्कार देणे म्हणजे पुरंदरेलिखित विकृत इतिहासाला अधिकृत करण्याचा प्रकार आहे. यासारखा दुसरा राष्ट्रीय गुन्हा नाही.
-जेष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव(सं.- म टा वृत्त १४ जून १५ )

8)शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा इतिहासकारांनी बाजार मांडला असून त्यांनी इतिहासाचेच विकृतीकरण केले आहे.बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्राच्या इतिहासाचा गळा घोटला आहे.
-रघुनाथराजे निंबाळकर

 (पैकी काही माहिती संकलन साभार प्रकाश पोळ यांच्या ब्लॉगवरून )

     या सर्व मान्यवरांच्या प्रतिक्रिया शांतपणे वाचल्या तर पुरंदरे यांचा वकूब व वृत्ती कळून येईल. आणि हा लढा एकट्या जितेंद्र आव्हाड यांचा नाही हे ही पटेल.

बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांच्यावरचे आक्षेप 

     पुरंदरे यांच्यावर अनेकांनी अनेक आक्षेप घेऊन त्यांच्या विकृतीबद्दल निषेध नोंदवला आहे. माझ्यामते त्यातले निवडक व महत्वाचे आक्षेप पुढील प्रमाणे आहेत.

१ . शिवरायांच्या जन्मतारखेबाबत मुद्दाम हेतूपुरस्पर घोळ घालणे.
२ . शिवरायांना नसलेली गोब्राह्मण प्रतिपालक ही बिरुदावली चीटकवणे
३ . जेम्स लेन ला मदत करणे कौतुक करणे .
४ . राजमाता जिजाऊची बदनामी करणे
५ . रामदासाला स्वराज्यप्रेरक व गुरु दाखवणे.
६ . दादोजी सारख्या सामान्य आदिलशाही चाकराला प्रचंड वलय प्राप्त करून देऊन त्यांनाही शिवरायांचे गुरुपद चिटकवने
७ . मराठा सरदारांचे चुकीचे एकांगी चित्र रंगवून त्यांच्यावर विकृत टीका करणे.
८ . शहाजीराजांच्या स्वराज्यप्रेरक या भुमिकेकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष करणे.

     यातल्या एकेका मुद्द्याची इथे सविस्तर चर्चा करू .

१ . शिवरायांच्या जन्मतारखेबाबत मुद्दाम हेतूपुरस्पर घोळ घालणे

     महाराष्ट्राच्या  इतिहासात ज्यांच्या जन्मतारखेविषयी वाद आहेत असे किती महापुरुष दाखवता येतील ?
छत्रपती शिवाजी महाराज सोडले तर एकही नाही. ठीक आहे . काही कारणाने हा वाद निर्माण झाला. पण महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या एका प्रथितयश इतिहासकारांच्या समितिने निर्विवादपणे साधार एक तारीख जाहिर केल्यावर तर हा वाद मिटायला काही हरकत नव्हती. पण पुरंदरे बेडेकर मेहेंदळे यांनी मुद्दाम हा वाद मिटू दिला नाही..आणि शिवप्रेमी मावळ्यांमध्ये फुट पाडण्याचा जघन्य अपराध केला.
अनेक दिवस सुरु असलेला हा वाद एकदाचा संपवुन टाकावा म्हणून महाराष्ट्र शासनाने १९६६-६७ साली वा. सी. बेंद्रे, न. र. फाटक, ग. ह.खरे, द. वा. पोतदार, डॉ. अप्पासाहेब पवार, ब.मो.पुरंदरे यांची एक समीती स्थापन केली. शिवजयंतीची तारीख निश्चीत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली. या समितिने या कामाला किती वेळ घ्यावा..अंदाज करा...तब्बल 33 वर्षे. 33 वर्षानी  शेवटी त्यांनी १९ फेब्रुवारी १६३० ही तारिख शासनाला सादर केली. १९ फेब्रुवारी ही तारिख जाहीर झाली रे झाली की लगेच कालनिर्णयवाले जयंत साळगांवकर यांनी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करावी असे आवाहन केले.त्यासाठी वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या.त्यांनी तिथीचा आग्रह धरताच पुरंदरे, बेडेकर, मेहेंदळे यांनी तिथी समर्थनार्थ साळगांवकरांना पत्रे दिली.

ब मो पुरंदरे यांचा माफीनामा

पंढरपुर येथे अमरजीत पाटील यांच्या आंदोलनानंतर हा गुन्हा आपण केला आहे व तारीख आणि तिथी यात शिवभक्तांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे अशी कबूली देऊन स्व हस्ताक्षरात पुरंदरे यांनी माफीनामा लिहून दिला. पण वाद पेटला तो पेटलाच..आज ही हा वाद सुरूच आहे.

२ शिवरायांना नसलेली गोब्राह्मण प्रतिपालक ही बिरुदावली चिटकवणे 

     छत्रपती शिवाजी महाराज म्हटल की सामान्य माणसाच्या तोंडात पहिली आपसूक गोब्राह्मण प्रतिपालक ही बिरुदावली येते. इतका ग्लोबेल्सप्रचार या गोब्राह्मण प्रतिपालकचा झाला आहे. वस्तुतः एकाही ऐतिहासिक कागदपत्रात शिवाजी महाराज स्वत:ला गोब्राह्मण प्रतिपालक म्हणवून घेतात असा पुरावा नाही. या बिरुदावलीसाठी पुरंदरे जो पुरावा देतात ( कागदपत्रे ५३४ व ५३७ ) त्यापैकी ५३७ मध्ये तर गोब्राह्मण प्रतिपालक हा उल्लेखच नाही. याचा अर्थ असा की याचा खोटा संदर्भ उगीच ढापून दिला आहे. आणि कागदपत्र ५३४ मध्ये जो उल्लेख आहे त्यात शिवाजी महाराज अस स्वत:ला म्हणवून घेत नाहीत तर त्यांच्याकडे दक्षिणा मागायला गेलेला एक ब्राह्मण त्यांना गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणत आहे. इतरांनी म्हणणे आणि महाराजांनी स्वत:ला तसे म्हणवून घेणे यात फरक आहे. पुरंदरे शाहीर नसताना स्वत:ला शिवशाहिर म्हणवुन घेतात.  सर्वच जण अस करतात अस नाही :)

३ . जेम्स लेन ला मदत करणे कौतुक करणे .

     यावर खुप लिहिल गेल आहे. पण यात चार महत्वाच्या गोष्टी आहेत.

* पुरंदरे यांना लेन पुस्तकासंदर्भात माहिती घेण्यासाठी भेटला होता.
* पुस्तकाच्या शेवटी लेन ने पुरंदरेंचे आभार मानले आहेत.
* पुरंदरे यांनी 2003 साली सोलापूर जनता बँक व्याख्यानमालेत जेम्स लेनच कौतुक केल होत.
* आजवर एकाही व्यासपीठावरून इतके वाद होत असताना पुरंदरे यांनी लेन चा जाहिर निषेध केलेला नाही.


     पुरंदरे भक्त यावर दोन डिफेन्स देतात. एकतर त्यांनी लेन च पुस्तक प्रसिद्ध करु नये म्हणून ऑक्सफर्ड प्रेस ला लिहिलेल पत्र ..पण त्यात फारसा दम नाही. लेनच ज्या अर्थी ते कौतुक करतात त्याअर्थी हे पत्र म्हणजे प्रकरण अंगावर शेकल्यावर किंवा शेकु नये म्हणून घेतलेला सावध पवित्रा आहे हे लगेच कळुन येते.

     दूसरा डिफेंस असा की म्हणे ब्रिगेडनेच याची जास्त प्रसिद्धि करून बदनामी केली. हा हास्यास्पद युक्तिवाद आहे. ते पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर कधी न कधी त्यातील प्रक्षोभक मजकूर बाहेर येनारच होता. हे म्हणजे असे झाले एकजण खून करणार ..दूसरा त्याला हत्यार पुरवणार आणि तिसऱ्याने बोंब ठोकली म्हणून त्या तिसऱ्यालाच तुम्ही फासावर लटकवणार...

      क्रमश:
    -सुहास भुसे. 

बाळासाहेब ठाकरे
डॉ जयसिंगराव पवार
रघुनाथराजे निंबाळकर

Thursday 6 August 2015

बळवंत पुरंदरे आणि महाराष्ट्र भूषण




     वादग्रस्त कादंबरीकार बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांच्या महाराष्ट्रभूषण पुरस्कारावरून सुरु असलेला वाद आता टिपेला पोहोचला आहे. महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण ढवळून निघत आहे. दोन उभे तट जवळ जवळ पडलेच आहेत. समस्त विचारी बहुजनवर्ग पुरंदरेना हा पुरस्कार मिळू नये या मताचा आहे. तर समस्त ब्रम्हवृंद पुरंदरेंच्या कळपात आहे. खेद याचा वाटतो की इतके दिवस स्वत:ला जातनिरपेक्ष पुरोगामी म्हणवणारे ब्राह्मण...शेवटी ब्राह्मणच आहेत असे सिद्ध करत शिंगे मोडून पुरंदरेंच्या कळपात शिरत आहेत. एकूणच सन्माननिय अपवाद वगळता( ही पाॅसिबिलीटी असते म्हणून अन्यथा तसे कोणी माझ्या पाहण्यात नाही ) बहुतांश ब्राह्मण समुदायाच केवळ जात या मुद्द्यावर पुरंदरे यांना समर्थन आहे अस दुर्दैवी चित्र दिसत आहे. आणि ज्यांच्यासाठी हा सर्व तमाशा सुरु आहे ते महाशय काय करत आहेत ?

     मला पुरंदरे यांच्याविषयीचे आक्षेप, त्यांचा विकृत इतिहास व त्याचे खंडन मंडण याहीपेक्षा हा मुद्दा गूढ वाटतो. 31 सप्टेंबर 2003 रोजी झालेल्या जनता बँक व्याख्यानमालेत ब मो पुरंदरे यांनी जेम्स लेन चे कौतुक करून जे एकदा तोंड बंद केले ते थेट परवा त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला तेव्हाच उघडले.


     हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ब मो पुरंदरे यांची प्रतिक्रिया पहा, “ महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाल्यामुळे खरोखरच खूप आनंद झाला. त्यामुळे आनंद ...आनंद ...आणि फक्त आनंद. या शब्दांशिवाय आता माझ्याकडे दुसरे शब्दच नाहीत. पुरस्कारामुळे मनापासून बरे वाटले.”

     ( बळवंत पुरंदरेना पुरस्काराचा मोह नाही म्हणनारांना इतक्या विरोधाच्या पार्श्वभुमीवर ही आनंदी आनंद गडे प्रतिक्रिया काहीशी विकृत वाटत नाही का ? )

   आणि झाले...ही जी प्रतिक्रिया दिली त्यानंतर हा चाललेला तमाशा पाहत ही गुप्पचिळी कायम आहे. जेम्स लेन प्रकरणापासून दादोजी कोंडदेव, रामदास इ. आक्षेपार्ह्य संदर्भातील आपली भूमिका मांडण्यासाठी अनेकदा ब मो पुरंदरे यांना अनेक संस्थांनी अनेक व्यासपीठावरून खुल्या चर्चेचे निमंत्रण दिले आहे. पण प्रत्येक वेळी ती निमंत्रणे धुडकावून लावत पुरंदरे यांनी या विषयावर बोलणे, किंवा आपली भूमिका स्पष्ट करणे सपशेल टाळले आहे. मला तर या पलायनवादाच्या तीन शक्यता वाटतात.

     1. आमच्या गावाकडे एक म्हण वापरली जाते. मला दोन हाणा पण पाटील म्हणा. तस जे चाललय त्याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही. कितीही वातावरण दुषित होवो. माझ्याविरुद्ध कितीही जनमत प्रक्षुब्ध होवो. मला दोन हाणा पण महाराष्ट्रभूषण म्हणा. असा काहीसा नूर ब मोंच्या आनंदी आनंद गडे वक्तव्यावरून दिसतो.

     2. दुसरी शक्यता पुरंदरे यांना पुरावे वगैरेंचे वावडे आहे. जेम्स लेन प्रकरणापासूनच ते पुरावे वगैरे उल्लेख तरी करतात. तत्पूर्वी अनेकदा त्यांना अश्या चर्चेत धोबी पछाड मिळाली आहे.  त्यांचा हा वकूब ध्यानात घेऊनच त्यांच्या कडेचे जे सनातनी कोंडाळे जे ब मों ना वापरू इच्छिते ते त्यांना बोलण्यापासून, प्रतिवाद करण्यापासून रोखत असावेत.

     3. तिसरी शक्यता अशी की आपली लबाडी पूर्णपणे उघडी पडली आहे याची पुरंदरे यांना पुरेपूर जाणीव झाली असावी. परंतु आता इतका सन्मान संपत्ती त्यासाठी उपभोगल्यानंतर तसे कबूल करणे त्यांच्या मूळ वर्चस्ववादी मानसिकतेला पचनी पडत नसावे.

     आता थोडेसे प्रतिवाद करणाऱ्या ब मो समर्थकांकडे वळू. हा जो प्रतिवाद करणारा वर्ग आहे त्याचे खूप मोठ्या काळापासून चर्चा वादविवाद खंडन मंडण हेच प्रमुख काम राहिले आहे. त्यामुळे समोरची बाजू खरी असेल तरी त्यात लूप होल्स शोधून त्यांच्यावरच चर्चा केंद्रित करून मुख्य मुद्द्यांतील हवा काढून घेण्यात ते तरबेज आहेत. यांचे दुसरे कसब म्हणजे विरोध करणारांना बदनाम करून नामोहरम करणे. सोशल मिडियावर चालणाऱ्या अनेक चर्चांचा शेवट हा ब मो पुरंदरे यांना विरोध करणारे जातीयवादी आहेत, ब्राह्मणद्वेषी आहेत, ब्रिगेडी आहेत असे आरोप करून केला जातो. खेडेकर यांचे हिंसक पुस्तक आणि ब्राह्मणी बनावट इतिहासाला प्रत्त्युत्तर म्हणून दिले जाणारे सवाई खोटा इतिहास रुपी प्रत्त्युत्तर (हे अर्थात अनधिकृत पातळीवर) या दोन मुद्द्यांवरून यांनी संभाजी ब्रिगेड या आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी ब्राह्मणेतर चळवळीला बदनाम केले आहे. व ब्रिगेडी हा शब्द म्हणजे जणू काय शिवी आहे असा वापरायला सुरु केल आहे. ब्रिगेड मध्ये जे वाईट आहे ते आहेच. त्याचे निव्वळ यातीप्रेमापोटी समर्थन न करता तुमच्या खांद्याला खांदा लावून त्याला विरोध करणारे हजारो मराठे व इतर बहुजन दिसतील. पण पुरंदरे चूक आहेत त्यांना महाराष्ट्र भूषण देऊ नका अस ठासून सांगणारा ब्राह्मण आज आपणास शोधून ही सापडत नाही.

     इतरांच्या चुका तुम्ही ठासून सांगणार. पण या इतरांनी मात्र वर्षानुवर्षे यांनी आमच्यावर लादलेला प्रक्षेपित धर्म, वर्णश्रेष्ठत्वाखाली केलेली पिळवणूक, पढवलेला खोटा इतिहास, महापुरुषांची केलेली बदनामी, कोणत्याही ब्राह्मण व्यक्तीची चूक मान्य न करता त्याच्यामागे एकवटत आपल्या आसुरी एकतेचे करत असलेले प्रदर्शन वगैरे सर्वकाही विसरून या सनातनी प्रतिगामी वर्चस्ववाद्यांकडे जातनिरपेक्ष स्वच्छ दृष्टीने पाहिले पाहिजे असा यांचा दुराग्रह असतो.  यांच्या आसुरी एकतेचे व त्या जोरावर हे माजवत असलेल्या सांस्कृतिक दहशतवादाचे एक उदाहरण ...परवाच एका नामचीन थोबाडपुस्तिका समुहात समूहाच्या अड्मीन ने रामदासांवर केवळ एक चिकित्सात्मक पोस्ट टाकली.. ती ही त्या समुहात नव्हे तर त्याच्या वालवर. अत्यंत संयमी व संयंत भाषेत. तर त्याच्यावर जातीयवादाचा आरोप करत लॉबिंग करून अनेकांनी तो समूह सोडला. रामदास ब्राह्मण आहे म्हणजे बरोबर व महानच आहे. त्याची तुम्ही चिकित्सा देखील करता कामा नये हा दुराग्रह या मंबाजी बिग्रेडच्या सांस्कृतिक दहशतवादाचे उत्तम उदाहरण ठरावा. मंबाजी ब्रिगेड हा प्रतिशब्द सनातनी प्रतिगामी लोकांसाठी सध्या सोशल साईटस वर लोकप्रिय आहे.

     तर या पुरस्कारविरोधी चळवळीत मंबाजी ब्रिगेडने लक्ष केले आहे ते जितेंद्र आव्हाडांना. त्यांना बदनाम करून, धमक्या देऊन, प्रसंगी हल्ले करून गप्प करण्याचे प्रयत्न तर सुरु आहेतच. शिवाय जितुद्धीन, जित्या असे शेलके उल्लेख ( भिडेंना अहो जाहोच बोलले पाहिजे म्हणून हल्ला करणारऱ्या संकृती रक्षकांना स्वत: मात्र कोणत्याही नीच पातळीला जाण्याची मुभा असते ) ..त्यांचे कथित गाझा प्रेम, त्यांच्या वैयक्तिक उखाळ्या पाखाळ्या काढणे असे प्रकार करून मूळ पुरंदरे विरोधाचे जे मुद्दे आहेत त्यांना सोयीस्कर बगल देण्याचा बामणी कावा केला जात आहे. शिवाय असाही भास निर्माण केला जात आहे की पुरंदरे यांना फक्त आव्हाड व थोडेसे संभाजी ब्रिगेडवाले यांचाच विरोध आहे बाकी उभा महाराष्ट्र यांच्याच मागे उभा आहे. अर्थात हे ही तितकेच खरे आहे जितका कि यांनी आमच्यावर थोपलेला इतिहास. जितेंद्र आव्हाड यांच्यावर वैयक्तिक टीका करण्याच्या नादात त्यांच्या मागे एकवटत असलेला जनाधार त्यांना दिसत नाहीये किंवा ते सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत. याचा परिणाम ते तोंडावर सडकून आपटण्यात होणार आहे.

     शिवाय संभाजी ब्रिगेडवर जातीय संघटना म्हणून टीका करताना मंबाजी ब्रिगेडवाले सोयीस्कररित्या विसरतात की भारतातली पहिली जातीय संघटना ही त्यांचीच – ‘ ब्राह्मण सभा.   ‘ स्थापन करावी ब्राह्मण मंडळी ' असे सांगणारे रामदास हे स्वराज्याचे प्रेरक या दाव्याच्या चिंधड्या उडाल्या असल्या तरी या ब्राह्मण सभेचे मात्र ते प्रेरक निश्चितच आहेत . मग याच पावलांवर पाउल टाकत ब्राह्मणेतरांच्याही संघटना निर्माण झाल्या तर कोणत्या तोंडाने त्यांच्यावर टीका करणार ?

     बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांचे ‘महान’ कार्य व इतर मोठमोठ्या लेखकांनी इतिहासकारांनी त्यांचे काढलेले वाभाडे पुढच्या लेखात पाहू ..त्यावरून हा विरोध फक्त मुठभर लोकांचा किंवा जितेंद्र आव्हाड यांचा नाही तर सर्वंकष आहे हे कळून येईल.
क्रमश:
  -सुहास भुसे


Saturday 1 August 2015

अंजली दमानिया एक्सपोज्ड

   
     जय महाराष्ट्र चॅनेलवर आताच एक डिबेट बघत होतो. अंजली दमानिया (नाव ऐकल्यासारखे वाटते ☺) यांनी अजित पवार आणि अनिल गोटे यांच्यावर सिंचन घोटाळ्यासंदर्भात नवीन आरोप केले आहेत. कोणीतरी दमानिया बाईना wts app मेसेज पाठवला त्यानुसार ४५०० हजार कोटींची कंत्राटे अजितदादांनी नातलगांना दिली वगैरे वगैरे. त्या विषयावर डिबेट होती. विलास गायकवाड नी त्यांना प्रथम बोलण्याची संधी दिली त्यांचे सर्व आरोप करून झाले. आणि नबाब मलिक यांनी प्रत्त्युत्तर द्यायला सुरवात केली.

     नबाब मलिक यांनी ओघाने अंजली दमानिया यांची थोडी पार्श्वभूमी सांगितली. त्याचे वडील, आजोबा हे आर एस एस मध्ये होते. त्यांच्या पतीने केलेला ८००० कोटींचा घोटाळा. त्यांनी खोट्या नावाने शेतकऱ्याच्या लाटलेल्या जमिनी...
 
     बस्स ...इतके ऐकून या बाईचा जो पारा चढला म्हणता की ज्याच नाव ते !
   
     2 ते 3 मिनिटे सर्वजण, विलास गायकवाड, नबाब मलिक, चर्चेतले इतरजण, पाहणारे माझ्यासारखे प्रेक्षक थक्क होऊन ऐकत होते आणि बाई थयथयाट करत होत्या.

     “ नबाब मलिक तुम्ही useless आहात( हे साधारण ५० वेळा म्हणाल्या) तुम्ही आणि तुमचा अजित पवार ची माझ्या नवऱ्याचे बूट पुसायची लायकी नाही. तुमचा शरद पवार जेवढा टैक्स भरतो त्यापेक्षा माझा नवरा जास्त भरतो. तुम्ही usless आहात. तुम्ही *** आहात , तुम्ही *** आहात. तुमच्यासारखी usless माणसे चर्चेत आहेत कळाल असत तर मी आलेच नसते ***....................................”  हुश्श !!! बाई आवरतच नव्हत्या.

     आपण एक महिला आहोत( मागाहून हा defence हमखास येतो ) , आपण एका चॅनेलवर live आहोत, लोक ऐकत आहेत, नबाब मलिक सर्वच बाबतील जेष्ठ आहेत, आपल्या बापाच्या वयाचे आहेत, जिची आपण उठता बसता बोंब मारत असतो ती संस्कृती, संस्कार वगैरे दमानिया बाई एका क्षणात विसरल्या. आणि शिवराळ भाषेत एखाद्या गावगुंडासारख अरे तुरे च्या भाषेत तांडव सुरु केले.

     साधी सरळ गोष्ट आहे. तुम्ही दुसऱ्यावर आरोप करता. सोशल मिडिया वृत्तपत्रे इलेक्ट्रोनिक मिडिया यातून त्यांची बदनामी करता. इतकी प्रचंड बदनामी करूनही ती व्यक्ती दुरुत्तरे करत नाही. आणि एक ओळीचा आरोप होताच तुम्ही आपण कुठे आहोत विसरून थयथयाट सुरु करता.

     सिंचन घोटाळा जर झाला असेल... तुम्ही सरकार मध्ये आहात तुमच्या कडे यंत्रणा आहे. तुम्ही आरोप सिद्ध करा. कायदेशीर कारवाई करा. तुम्ही अन्य पक्षात आहात, समाजसेवक (??)  आहात, तुमच्याकडे पुरावे आहेत, तर  योग्य यंत्रणेकडे सादर करा. तपास कामात मदत करा. अस मिडियाबाजी करण्यामागे बदनामी करण्यापलीकडे कोणता हेतू असू शकतो? बर हे ही ठीक आहे. अस मिडियामधून कित्येक वर्षापासून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसविषयी रान उठवले जात आहे. सोनिया गांधी मनमोहन सिंग शरद पवार अजित पवार यांच्याविषयी अश्लील, गलिच्छ फोटोशॉप छायाचित्रे, विनोद केले जात आहेत. पण यावर चिडून कोणी नेत्याने तर सोडाच पण कोणी कार्यकर्त्याने देखील काही दुरुत्तरे, शिवीगाळ, इव्हन तक्रार केल्याचे देखील ऐकिवात नाही.
मग जे लोक आरोप करतात त्यांना थोडस प्रत्युत्तर देखील सहन का होऊ नये ?

     The best defense is good offense.  हे डिबेट चे सार्वत्रिक सूत्र आहे. त्यानुसार नबाब मलिक बोलले तर त्यांचे काय चुकले ? ज्याने कधीच काही पाप केले नसेल त्याने दगड मारावा. तुमचेच हात जर भ्रष्टाचारात बरबटलेले असतील तर इतरांवर आरोप करून त्यांची बदनामी करण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही.

     एकंदर अजित पवारांना expose करायला गेल्या आणि स्वत: च expose होऊन बसल्या अशी अंजली दमानिया बाईंची स्थिती झाली.