About

Monday 24 September 2012

हिंदू धर्म : एक सांस्कृतिक विचारधारा

प्रास्ताविक :-


हिंदू धर्म, धर्मावर केली जाणारी टीका, आपल्या प्राचीन परंपरांचे केले जाणारे विकृतीकरण किंवा विडंबन , वर्षानुवर्षे बोकाळलेला जातीयवाद, अंधश्रद्धा  अश्या अनेक गोष्टींमुळे अनेक सर्वसामान्य हिंदू संभ्रमित असलेले दिसतात.  खरच आपले मूळ काय आहे, कोण आहे मी ? हा सनातन प्रश्न आजही अनेकांना भेडसावत असलेला पाहायला मिळतो. या विषयावर अनेकांचे लिखाण वाचण्याचा योग आला. " मी हिंदू नाहीच कारण असा कोणता धर्मच अस्तित्वात नाही" अश्या शीर्षकांचे काही लेख हि वाचनात आले. अशा लोकांनी हिंदू धर्माच्या मुळावरच घाव घालण्याचे उद्योग सुरु केले आहेत. साधारणतः अश्या लोकांचा राग हा हिंदू धर्मावर नसून हिंदू धर्मातील वर्चस्ववाद्यांवर ज्यांनी या प्राचीन धर्माचे अपहरण केले आहे त्यांच्यावर आहे हे उघड आहे. अश्या लोकांनी हिंदू धर्माचे सत्य, तरल, सुंदर व शुद्ध रूप जाणून घेणे गरजेचे आहे.


धर्म म्हणजे काय ?


धर्म म्हणजे काय ? या मुलभूत प्रश्नापासून सुरवात करू. अनेक तत्वज्ञानी धर्माच्या अनेक व्याख्या केल्या आहेत.माझ्या मते हिंदू विचारधारेनुसार धर्म म्हणजे एका चिरंतन अशा सत्याचे ज्ञान आणि धर्माचरण म्हणजे या सत्याचा घेतलेला शोध.


अपाणणिपादोहम्चिन्त्यशक्ति:पश्चाम्य्चक्षु: स श्रॄणोम्यकर्णः
अहं विजानामि विविक्तरुपोन चास्ति वेत्ता मम चचित्सदाहम २१

अर्थात

मला हात आणी पाय नाहीत। मी डोळे नसतानाही पाहतो आणि कान नसतानाही ऐकतो. मलाच सर्व ज्ञान आहे पण माझे अस्तित्व (ज्ञान) कोणालाही नाही कारण मी च ते पवित्र ज्ञान वा अंतिम सत्य आहे.

" याच अंतिम सत्याचे ज्ञान म्हणजेच धर्म "



हीच व्याख्या प्रमाणभूत मानून मी हिंदू धर्माविषयी मुक्त चिंतन रूप विचार मांडणार आहे.



हिंदू धर्म एक सांस्कृतिक विचारधारा 


हिंदू हा एक धर्म कमी आणि एक सांस्कृतिक विचारधारा जास्त आहे अस मला वाटत. आपल्या देशाला खूप पुरातन आणि समृद्ध असा सांस्कृतिक वारसा आहे. जेव्हा इतर देशातील लोक जंगलात कंदमुळे खात रानटी संस्कृतीत जगत होते तेव्हा आपल्या देशात समृद्ध अशा नागरी संस्कृती नांदत होत्या. सुमारे ५००० वर्षांपूर्वी जर्मनीतील कोकेशियस पर्वतातून आर्य भारतात आले असे काही तज्ञांचे मत आहे. तर काही तज्ञांचे मत आहे कि आर्य मुळचे इथलेच. सत्य काय आहे हा आता एक संशोधनाचा आणि इतिहासातील नोंदींचा भाग बनला आहे. तथापि आपण आपल्या संस्कृतीचे सुक्ष्म निरीक्षण केले असता इथ अनेक वेगवेगळ्या संस्कृतींचा मिलाफ झाल्याचे दिसून येईल. दक्षिण भारत, मध्य भारत, पूर्व आणि पश्चिम भारत, उत्तर भारत या भागात अनेक प्रथा परस्परांपेक्षा भिन्न असलेल्या दिसून येतात. आणि अनेक प्रथा आणि परंपरामध्ये समानतेचा धागा देखील दिसून येतो. या सर्व वरवर भिन्न वाटणा-या प्रथा, परंपरा, लोकजीवन आणि त्यातून वाहणारी एकच जीवनसरिता हीच पुढे इथली जीवनपद्धती बनली तिच इथल्या लोकांची विचारधारा बनली आणि तोच या लोकांचा धर्म बनला. माझा प्रिय हिंदू धर्म .....!! हेच कारण असाव कि अनेक विद्वानांना हिंदू या शब्दाचा उगम अर्वाचीन आहे असे वाटते.

       इथ जाता जाता एक गोष्ट नमूद करण्याचा मोह आवरत नाही. इतर धर्म आणि हिंदू धर्म यात एक फार मोठा फरक आहे. इतर बहुतेक धर्मांचा कोणीतरी प्रेषित आहे. त्याने सांगितलेले त्या त्या धर्माचे अंतिम तत्वज्ञान आहे. त्यावर कोणताही प्रतिवाद होऊ शकत नाही. हिंदू धर्माचा असा कोणताही उदगाता नाही. हिंदू धर्म अशी कोणतीही चौकट मानत नाही.बहुतेक धर्म एकेश्वर वादी आहेत. एकच देव, एकच धर्मग्रंथ, एकच उपासना पद्धती, एकच विचारसरणी . पण हिंदू धर्म मात्र सर्वथैव भिन्न आहे . इथ कोणी एकच देव नाही, एकच धर्मग्रंथ नाही, एकच उपासना पद्धती नाही, एकच विचारधारा नाही. हिंदू धर्म हे त्याच्या पाईकांसाठी एक प्रकारचे मुक्त प्रांगण आहे. इथे कोणतीही विचारधारा निषिद्ध मानली गेलेली नाही. कि अमुकच एका देवाच्या भक्तीचा आग्रह नाही उपासना पद्धतीचे मुक्त स्वतंत्र इथे आहे. कोणतेही कर्मकांड इथे सक्तीचे नाही. ज्याला जे हव, जे पटत, ते त्याने कराव, आचराव.   हिंदू धर्मात जितके पंथ आहेत तितके अन्य कोणत्याही धर्मात नाहीत.  देव मानणाऱ्या अन्य पंथांच तर सोडाच पण दार्शनिकांच्या मीमांसा, न्याय, सांख्य, लोकायत  अशा वेद प्रामाण्य नाकारणा-या, देवाचे अस्तित्वच अमान्य करणा-या विचारधारांनादेखील या विशाल अंत:करणाच्या धर्माने आपल्यात सामावून घेतल आहे. यातील निवडक दार्शनिक विचारधारांविषयी या लेखमालेत लिहिणारच आहे. तूर्त आटोपते घेतो.  







9 comments:

  1. शैविक आणि वैष्णविक, या गोष्टींचा अभ्यास झाला , तर कदाचित हा विशाल धर्म योग्य दिशेने पुन्हा वाटचाल करू लागेल , शैविक म्हणजे एक इश्वर , शिव जो अनादी आणि अनंत आहे , शैविक साधू कुंभ मेळ्यात मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात , आशा आहे आपण आपल्या पुढील लेखमालेत , या विषावर भर टाकून काही द्याल , जर शिव हेच एक दैवत मानून आपण पुढे आलो, तरी हा समाज एकरूप व्हायला वेळ लागणार नाही .

    ReplyDelete
  2. Replies
    1. धन्यवाद अरुणजी ....................!!!

      Delete
  3. अनामिक मित्र
    नक्कीच ...मी शैव पंथाविषयी लिहिणार आहेच . ती एक महत्वाची आणि विश्वव्यापक अशी विचारधारा आहे हिंदू धर्माची .
    ..
    आणि अरुण पोफळे जी
    धन्यवाद ..
    या लेखमालेतील आगामी लेख हि वाचत राहा .

    ReplyDelete
  4. हिंदू हा धर्म नसून एक पद्धती आहे ,तसेच ती मोगलांनी दिलेली शिवी आहे ,हिंदू धर्मात वेद हि एकाच वर्गाची मालमत्ता आहे ,हा धर्म उच्च निश्चते वर आधारलेला आहे ;या धर्मात स्त्रियांना पशूपेक्षाही हीन मानले.हिंदू देवता काल्पनिक आधारावर बनवलेल्या आहेत.ह्या देवता जगात इतर कुठेही हीन म्हणून मानतात,व हसतात.ह्या धर्मात एकाच समाजाला मनाचे स्थान आहे व बाकीचे हीन मानले आहे.ह्या देवतांनी राक्षसांवर नेहमीच अन्याय केलेला आहे कारण ते येथील मुलनिवासी होते .हिंदू धर्माला विद्न्यानाच जराही आधार नाही.हिंदू धर्माला कंटाळून कित्त्येक लोकांनी वेगळे धर्म स्थापन केले.हिंदू धर्मात फक्त ब्राह्मणांचीच प्रगती आहे बाकीच्यांची अधोगती आहे .म्हणूनच फुले,शाहू,आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडले व त्यावर कठोर टीका केली.यांनीच नाही तर कित्त्येक विद्वानांनी यावर कठोर टीका केलेली आहे.हिंदू धर्म भारतीयांवर बळजबरीने लादला आहे.भारतीयांचा बौद्ध हा धम्म होता.परंतु ब्राह्मणांनी तो संपवला.मला जराही गर्व नाही कि मी हिंदू धर्मात जन्मलो.

    ReplyDelete
  5. अनामिका ..
    माझा हा लेख हिंदू धर्माविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठीच आहे .आपण वाचलात आनंद वाटला .
    आपण वाचत राहा . आपल्या सर्व शंकांची उत्तरे मिळतील .
    जातीभेदाविषयीचि आपली टिपण्णी रास्त आहे.
    पण त्याचे दोषारोपण हिंदू धर्मावर करणे चूक आहे .
    हिंदू धर्माने कधीच जातीभेदाला प्रोत्साहन दिले नाही .
    हिंदू धर्म ही कोणाच्या बापाची खाजगी मालमत्ता नसताना त्याचा तसा वापर झालेला आहे .
    पण आज काळ बदलला आहे . आम्ही हिंदू धर्माचे पाईक शिक्षित झालो आहोत . आमच्या धर्माचा अर्थ सांगण्यासाठी ( तोही चुकीचा ) आम्हाला आता कोणा धर्ममार्तंडांची गरज उरलेली नाही .तथापि
    काही धर्ममार्तंडांच्या कृतीचा दोष आपण पूर्ण धर्माला देऊ शकत नाही . हिंदू धर्म या धर्माच्या स्वयंघोषित ठेकेदारांनी पाहिजे तसा वळवला आहे . लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन शोषण केले आहे . हिंदू धर्माचे विशुद्ध रूप पुढे आणण्याचा आणि हिंदू धर्मात घुसडलेल्या अव्यवस्था पसरवना-या गोष्टींविषयी लोकांत जागृती निर्माण करण्याचा या लेखमालेचा एक प्रमुख उद्देश आहे .
    आपण वाचत राहा गोष्टी क्लिअर होत जातील .

    ReplyDelete
  6. shivdharma is best. sarva bahujan lokanni ektara yeun shivdharmat jaave. hindu sodun dyaava

    ReplyDelete
    Replies
    1. हा लेख हिंदू धर्माची ध्वजा उंच लहरवण्यासाठी साठी खास लिहिला गेला आहे .
      हिंदू धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म आहे .
      फक्त स्वत:ला हिंदू धर्माचे स्वघोषित मालक समजणा-या
      लोकांनी परस्पर साहचर्य आणि सामंजस्याचे वातावरण दुषित केले आहे
      त्याचा परिणाम म्हणजे आपली हि कमेंट .

      Delete
  7. Shriभुसेजी,
    आपले लेख चांगले व balanced व योग्य मूल्य मापन /सकारात्मक विचाराचे आहेत,पण जे लोक पूर्वग्रह दूषित आहेत त्यांना समजावणे कठीण आहे.

    ReplyDelete