About

Friday 14 September 2012

युवा मनातील ‘ असीम ’ शक्तीचा धगधगता अविष्कार

असीम त्रिवेदी.......साधारण ८-१० दिवसांपूर्वी फारस कोणाला माहितही नसलेलं नाव. पण गेल्या काही दिवसांतील घटनाक्रमाने असीम या देशातील युवकांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. सिस्टीम वर वैतागलेल्या युवा पिढीचा आयडॉल बनला आहे. त्याची कार्टून्स, त्याची अटक आणि सुटका यावर विविध राजनीतिज्ञ आपली मतमतांतरे मांडण्यात गर्क आहेत. मांडोत बापडे, पण माझ्यासारख्या सर्व सामान्य आणि राजकारणाच्या गटाराला वैतागलेल्या युवकाला मात्र तो हिरो वाटत आहे.




या युवकात एक आग आहे. एक जोश आहे . तत्वासाठी झोकून देण्याची वृत्ती आहे. स्वत:च्या विचारांवर त्याची श्रद्धा आहे. त्यासाठी सर्वस्व पणाला लावायची त्याची तयारी आहे. आणि अशी ध्येयवेडी माणस अख्ख्या दुनियेला आपल्यापुढे झुकायला पाडतात हे त्याने परत एकदा सिद्ध केले आहे. फक्त २४ वर्षाच्या या युवकाच्या राजकीय जाणीवा मात्र अत्यंत प्रगल्भ आहेत. खूप दिवसांपासून तो व्यंगचित्रे काढत आहे. इंटरनेटच्या सेंसरशिप विरुद्धचे आंदोलन असो वा अण्णांचा लोकपाल विधेयकासाठीचा लढा असो प्रत्येक ठिकाणी या युवकाने झोकून देऊन काम केले आहे. गेल्या मार्च महिन्यात १  एप्रिलला ‘ फूल्स डे ’ म्हणून घोषित करून नेटीझन्स चे आवडते नेते कपिलबाबा सिब्बल यांना हा दिवस समर्पित करण्याची मोहीम असीम ने आपल्या मित्रमंडळींसोबत छेडली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तो फार मोठा पुरस्कर्ता असल्याचे त्याच्या या कारकिर्दीवरून वाचकांच्या लक्षात आलेच असेल.





आधीच मनमोहनजींच्या सरकारची स्थिती आभाळच फाटल आहे त्यात ठिगळ तरी कुठ कुठ लावणार अशी आहे. असीमच्या खटल्याने एकंदर सरकारची सर्वच आघाड्यांवर नाचक्की केली आहे. मुळात जे देशद्रोहाचे कलम असीम ला लावले होते त्याची थोडी माहिती पाहू




    

        


काय आहे नेमका हा देशद्रोह कायदा ?


सैडीशन लॉ म्हणजे देशद्रोह कायदा हा एक उपनिवेषीय कायदा आहे. हा कायदा ब्रिटिशांनी १२५ वर्षांपूर्वी बनवला होता. भारतीय संविधानाने तो न बदलता जसाचा तसा स्वीकारला. भारतीय दंडसंहिता कलम १२४ अ नुसार जी देशद्रोहाची व्याख्या दिली आहे ती अशी आहे . कोणताही व्यक्ती जो सरकारविरोधी लिखाण करतो किंवा बोलतो किंवा अशा लिखाणाचे वा वक्तव्याचे समर्थन करतो त्याला आजीवन कारावास किंवा तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते. अर्थात हा कायदा ब्रिटीश घटनेने आता रद्द केला आहे पण भारतीय संविधानात तो अजूनही आहे.
या कायद्याचा उपयोग ब्रिटीश काळात अनेक स्वातंत्र्य योद्ध्याविरुद्ध केला गेला आहे. तर स्वातंत्रोत्तर काळात या कायद्याचा तडाखा अरुंधती रॉय, विनायक सेन यांना बसला आहे. भारतीय संविधानाने नागरिकांना एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे तर दुसरीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारा हा विवाद्य कायदा आहे.



असे जुलमी कलम आपल्याला लावले, ते रद्द करावे म्हणून असीम ने प्रथम जामीन घ्यायला नकार देऊन सरकारची चांगलीच गोची केली. त्याचा हा निर्णय त्याच्या कार्याला एक वेगळीच झळाळी देऊन आणि त्याला चर्चेचा केंद्रबिंदू बनवून गेला. तथापि नंतर न्यायव्यवस्था आणि गृहमंत्र्यांच्या आश्वासनाचा मान ठेवण्यासाठी त्याने जामीन स्वीकारला. सरकारला एका अर्थाने त्याने गुडघे टेकायला भाग पाडले. काय आहे या असीम जवळ ?? फक्त एक या भ्रष्ट सिस्टीमविरुद्ध काळजात भडकणारी आग आणि तत्वांवरची अविचल निष्ठा. एवढ्याच भांडवलावर त्याने आज देशातील अनेक तरुणांना प्रेरणा देण्याचे कार्य केले आहे.
असीम त्रिवेदीची कार्टून भलेही काहीजणांना वादग्रस्त वाटतात. आम्हाला मात्र ती फक्त सामान्य माणसाचा प्रशासनावरचा संताप व्यक्त करणारी, भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार याविषयी चीड व्यक्त करणारी प्रातीनिधीके वाटतात. उसका तरीका गलत हो सकता है लेकिन इरादा नेक था ....असीम आगे बढो .....हम आपके साथ है .....!!      


-----------------------------------------------------------------------------------------     





  असीम ची काही व्यंगचित्रे



























































 ---------------------------------------------------------------------------------------------------

  आणि असीम चा राष्ट्र द्रोह .....मग हे काय आहे ??






-------------------------------------------------------------------------------------




--------------------------------------------------------------------------------------------------


 

13 comments:

  1. अप्रतिम Suhas Bhuse Ur just Gr8 Writer i always love read ur blog :) Keep it up

    ReplyDelete
  2. धन्यवाद अमित
    तुझ्या प्रतिक्रियेने लेखनास नवे बळ मिळाले .....!!

    ReplyDelete
  3. hmm - 125 varshancha juna kayda - pan sagale aambedkari tar amhala sangatahet keee aambedkaranni "ekatyane" athank parishram geun sagali ghatana parat lihun kadhali. chyayla - ambedkaranni britishanchya ghatanechi copy keli kee kay?

    baki chan ahe tuza lekh.

    ReplyDelete
  4. बराचसा म्हणजे जवळ जवळ ८० % फौजदारी कायदा आपण ब्रिटीश घटनेतून जसाचा तसा उचलला आहे . तरी आपण बाबासाहेबांच घटनानिर्मितीतल योगदान नाकारू शकत नाही . असो आपला विषय तो नाही .
    धन्यवाद अनामिक मित्र ..

    ReplyDelete
  5. एकाद्या घरात खून झाला किवा त्या घरात एखदा खुनी राहतो तर त्यात त्या घराचा दोष नसतो.त्याचप्रमाणे आमच्या देशात भ्रष्टाचारी तयार झाले त्यात घटनेचा दोष नाही.घटनेची अंमलबजावणी करणारे गाढव असतील तर ती घटना यशस्वी होऊ शकत नाही हे बाबासाहेबांनी सांगितले होते.देश स्वतंत्र होऊन सहा दशके होऊन घटना पूर्णपणेजसिच तशी अजूनही लागू केलेली नाही आपल्या घटनेला जगात तोड नाही.संविधान लाथाडून हे हरामी लोक खाजगीकरण करून राहिले तसेच विदेशी लोकांना बोलाऊन राहिले स्वार्थासाठी.हे घोटाळे खाजगीकरणाचाच परिणाम आहे.असीम ब्राह्मणवाडी असल्याने त्याने हे काम केले कारण संविधानाने ब्राह्मन्र राज संपुष्टात येईल याची त्यांना भीती आहे .सारेच ब्राह्मण संविधानाचा अपमान करीत असतात.असिम्ला हिरो करण्याचे काम या ब्राह्मणी मिडिया नेच केले आहे .तुम्ही तुमच्या लिखाणावरून असे वाटते कि नक्कीच ब्राह्मण आहात.

    ReplyDelete
  6. अनामिक मित्र
    तुझी शंका अगदीच निराधार आहे .
    मी कट्टर ९६ कुळी मराठा आहे .
    असीम विषयी मी म्हटलंच आहे कि त्याचा " इरादा नेक था लेकिन तरीका गलत था "
    मला आवडली ती त्याच्यातली आग , भ्रष्टाचाराविषयीचि चीड .

    ReplyDelete
  7. हि भ्रष्टाचार विरोधी आग नसून संविधान विरोधी आग म्हणावी लागेल.

    ReplyDelete
  8. अनामिक
    आपण बहुधा त्याने घटनेच्या काढलेल्या व्यंग चित्रा संदर्भात बोलत आहात .
    तथापि त्याने फक्त घटनाच नाही तर संसद , राष्ट्रीय पेय , राष्ट्रीय पक्षी , राष्ट्रचिन्ह यावर देखील व्यंग चित्रे काढली आहेत .
    त्यामुळे आपले ही आग संविधान विरोधी आहे असे म्हणणे दुराग्रही ठरेल .

    ReplyDelete
  9. भ्रष्टाराचे समर्थन खरा भारतीय करूच शकत नाही परंतु असिमचा भ्रष्टाचाराचा सहारा घेऊन भारतीय संविधान टार्गेट होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.या ब्राह्मणांचा हाच डाव आहे.त्यांना दाखून द्याचे आहे कि भारतीय संविधान कसे कुचकामी ठरत आहे,त्यामुळे साम्विधानावरून भारतीयांचा विश्वास उठेल त्यानंतर ब्राह्मणांच्या मनाप्रमाणे हळूहळू कायदे लागू करायचे आणि परत मानुस्मृतीप्रमाणे भारतीयांवर राज्य करायचे.आपल्या संविधानाची पूर्णपणे अंबलबजावणी अजूनही केल्या गेली नाही ,तर त्या विरोधीच अनेक कृती चालू आहेत परंतु त्याचे खरे कारण आपल्यापर्यंत ब्राह्मणी मिडिया पोहचूच देत नाही.हा भ्रष्टाचार वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे खा.उ.जा.(खाजगीकरण,उदारीकरण,जग्तीकरण)धोरनांचा सर्रास अतिरेक होत आहे,हे संपूर्ण घटने विरोधी आहे ,हेच नाही तर बरोबर अभ्यास केला तर सर्रास घटनेच्या विरोधी सरकार चालत आहे हे लक्षात येईल.परंतु भारतात विरोधी पक्षच अस्तित्वात नसल्याने याचा विरोध कोणीच करीत नाही.कारण बीजेपी हा पक्ष कॉंग्रेसनेच स्थापन केलेला आहे.त्यामुळेच बीजेपी कॉन्ग्रेस्स्व्यातीरिक्त कोणालाही सत्तेवर येऊ न देण्याच्याच प्रयत्नात असते.बीजेपी सत्तेवर न राहताही सत्तेचाच उपभोग घेत असते.परंतु हे दोघे मिळून भारतावर राज्य करीत आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.बीजेपी चा मुस्लिमांना आणि दलितांना धाक दाखवायचा आणि कॉंग्रेसने त्यांना जवळ घेण्याचे नाटक करायचे.हे यांचे डाव आहेत हे समजून घेतले पाहिजे.दलित आणि मुस्लीम मतांशिवाय कोणताही पक्ष सत्तेवर येउच शकत नाही.कॉंग्रेस सर्वांना सामावून घेण्याचे नाटक करीत असते.परंतु भारतीयांच्या आणि संविधाना विरोधी षडयंत्र करीत असते.का नाही असिम्ने मंदिरातील भ्रष्टाचाराविशयी चित्र काढले .हा भ्रष्टाचार तर जगातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे.का नाही त्यांनी एफ.डी.आय.आणि खाजगीकरणाचा विरोध केला ज्यामुळे भ्रष्टाचार तर वाढतच आहे परंतु समोरील सामान्य भारतीय पिढ्यांचे अतिशय हाल होणार आहे.का नाही त्याने सेझ चा विरोधी चित्र काढले ज्यामुळे आज आदिवासी बेघर झाले आहेत आणि नक्षलवादी म्हणून जगत आहेत(मरत आहेत)आणि शेतकरी देशोधडीला मिळत आहेत.अहो असिम्ला हिरो बनवून ह्या ब्राह्मणी मिडीयाला संविधानाविषयी द्वेष निर्माण करायचा आहे.ह्या डावात मिदियाचाच सर्वात मोठा हिस्सा आहे हे लक्षात घ्यावे.खरच संविधानाचा बरोबर वापर केला असता तर आतापर्यंत भारत जगात शक्तिशाली आणि श्रीमंत देश बनला असता.तसा भारत काही गरीब देश नाही परंतु पैसा मोजक्याच लोकांच्या तिजोरीत जात आहे.....

    ReplyDelete
  10. आपण सामाजजागृतीचे चांगले काम हाती घेतले आहे त्याबद्दल खूप शुभेच्छा परंतु आपले लेख बरेच लोक वाचत असतात व त्यावरून काही शिकत असतात .परंतु आपल्या विचारातून समाजासाठी घातक ठरणाऱ्या गोष्टी जर लोकांपर्यंत पोहचल्या तर त्याचा विपरीत परिणाम घडत असतो.ज्या गोष्टींची ब्राह्मण स्तुती करतात त्या गोष्टी भारतीयांसाठी फार घातक असतात,हे लक्षात घ्यावे.मला आपल्याला काही कमी लेखायचे नाही.परंतु इतिहास साक्षी आहे कि ब्राह्मणांचे ९०% कारवाया ह्या त्यांच्यासाठी फायद्याच्या आणि भारतीयांसाठी घातक ठरलेल्या आहेत.आपण इतिहासात झालेल्या चुका परत केल्या तर इतिहासातून आपण काहीच शिकलो नाही असेच समजावे लागेल.म्हणून जेथे ब्राह्मण आला तेथे आपण जपून पाऊल टाकले पाहिजे..आपण अशा घटनांचा विरोध करायचा नसेल तर कमीतकमी प्रशंसा तरी करू नये.कारण आपण नेता आहात आणि नेत्याचे अनुकरण जनता करीत असते.ठीक आहे तरी काही चुकल्यास माफ करावे.आपलाच मित्र..

    ReplyDelete
  11. ह्याच जागी जर असिमने मंदिरातील चाललेल्या भ्रष्टाचाराव चित्र काढले असते तर त्याला कोणीच प्रसिद्धी दिली नसती आणि खरच त्याने मंदिरावर लघुशंका करणारे चित्र काढले असते का.आणि काढलेच असते तर या मेडिया ने त्याची भानकहि कोनाला लागू दिली नसती व ते प्रकरण दडवले असते.कारण तेथील भ्रष्टाचार हा ब्राह्मणांचा असतो.तसा भारतातील सर्वच भ्रष्टाचाराचे मुळ हे ब्राह्मणांत आहे.या मिडिया वर विश्वास ठेवून कोणाला हिरो आणि कोणाला झिरो ठरवू नये.हा मिडिया जगात सर्वात बोगस आहे.आणि एकत्र मिळालेला आहे.ह्यांना भारतात परत मनुस्मृती आणायची आहे.

    ReplyDelete
  12. आणि हो आपण जे वेगळे चित्र दाखविले ज्या मध्ये आपण म्हणता कि हा देशद्रोह नाही का.पण त्या चित्रातील मला परिचित सर्वच ब्राह्मण दिसतात इतर कोण असतीलहि याबद्दल काही माहिती नाही.परंतु हे लक्षात घ्यावे कि जास्त आणि जाणूनबुजून ब्राह्मणच राष्ट्रीय चिन्हाचा किवा राष्ट्राचा अपमान करीत असतात.कारण त्यांचा हा देश नाही...

    ReplyDelete
  13. अनामिक मित्र
    आपण एकांगी विचार करत आहात .
    मि म्हटलेच आहे कि असीम चा इरादा नेक था लेकिन तरिका गलत था ...!!
    आपण संपूर्ण ब्राह्मण समाजाला टार्गेट करून हा समाजव्यवस्थेचा गाडा सुरळीत चालवू शकत नाही .
    बहुजनांचे ब्राह्मणांनी शोषण करायला आता बहुजन अडाणी राहिले नाहीत ते शिक्षित झाले आहेत .
    त्यामुळे आपण फक्त अनिष्ट प्रवृत्तीवरच हल्ला चढवावा .
    एखादा मोठा समूह म्हटले कि त्यात काही चांगले असायचे काही वाईट ..
    उडदा माजी काळे गोरे ....!!
    ..
    आपण म्हणतात कि
    .
    [ ह्याच जागी जर असिमने मंदिरातील चाललेल्या भ्रष्टाचाराव चित्र काढले असते तर त्याला कोणीच प्रसिद्धी दिली नसती आणि खरच त्याने मंदिरावर लघुशंका करणारे चित्र काढले असते का.आणि काढलेच असते तर या मेडिया ने त्याची भानकहि कोनाला लागू दिली नसती व ते प्रकरण दडवले असते ]
    .
    आपल्या या मतावर मि विचार केला ...आणि मि आपल्याशी सहमत आहे .
    मिडिया निष्पक्ष नाही यात काही शंकाच नाही .
    तरीही असीम मध्ये मला एक या देशातील सिस्टीमवर वैतागलेला एक सामान्य तरूण दिसला .
    परिणामांची पर्वा न करता त्याने स्वत:ला या लढाईत झोकून दिले .
    यातच सामन्य असीम मधले असामान्यत्व मला दिसले म्हणून मि त्याची प्रशंसा केली आहे .
    तो ब्राह्मण आहे वा इतर कोणी याचा विचार केलेला नाही
    हे आपण लक्षात घ्याव ..
    ..
    असो मि आपल्या विचारांचा आदर करतो .
    एखाद्या गोष्टींत चांगल्या मित्रांत देखील मतभेद होऊ शकतात .
    ..
    शेवटी विचारांची देवाण घेवाण महत्वाची ...नाही का ?

    ReplyDelete