About

Wednesday 22 August 2012

राज, राजकारण आणि हिंदुत्व


राज ठाकरे यांनी काढलेला विराट मोर्चा आणि राजजींनी घेतलेली पोलीस आणि माध्यमांचे मनोबल वाढवणारी भूमिका यांचे सर्व थरांतून कौतुक होत आहे. मुंबई दंगली आणि त्याला जबाबदार असणार्या समाजविघातक प्रवृत्तीबाबत सर्वच राजकीय पक्ष आणि नेतेमंडळी मुग गिळून गप्प असताना राजजींनी मांडलेली भूमिका आणि त्यांना जनतेचा मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद निश्चितच स्तुत्य आहे. मरगळलेली शिवसेना, अंतर्गत कलहात गुरफटलेला भा ज प आणि त्यांनी केलेले मुंबई दंगलींमुळे हिंदू समाजात निर्माण झालेल्या प्रचंड असंतोशाकडे दुर्लक्ष यामुळे जी एक रिकामी जागा तयार झाली होती ती निश्चितच राज आणि मनसे ने भरून काढली आहे कालच्या मोर्चामुळे.

मलाही या मोर्च्याबद्दल आणि राजसाहेबांच्या भाषणाबद्दल मोठे औस्तुक्य होते. एरव्ही तास तास अशा सभांमधून गर्जणाऱ्या राज नी भाषण १५ मिनिटातच आटोपले हि गोष्ट काहीशी खटकली. पण त्याहून खटकली ती त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला दिलेली बगल. तसा मनसेच्या पक्ष घटनेतच धर्मनिरपेक्षता हा मुद्दा आहे. त्यामुळे खर तर या गोष्टीचा विषाद वाटायचे काही कारण नव्हते. पण माझ्या कट्टर हिंदुत्ववादी मनाला उगीच एक आशा होती कि आपला आवडता नेता बाळासाहेबांची हिंदुत्वाची पताका खांद्यावर घेऊन त्यांच्याच शैलीत गर्जेल. पण माझा काहीसा भ्रमनिरास झाला.

अर्थात आज सर्वच हिंदुत्ववादी पक्षांना हिंदुत्व हा मुद्दा अडचणीचा वाटत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सत्ता खेचून आणता येत नाही हे लक्षात आल्यानंतर या पक्षांची हिंदुत्वाची धार काहीशी बोथट झाली आहे. हे मतांच्या जोगव्याचे राजकारण आहे असे मी म्हणणार नाही. शेवटी कोणत्याही राजकीय पक्षाचे सत्ता हे ध्येय असणे काही चुकीचे नाही. हा सर्व दोष मी उलट परंपरागत हिंदू मानसिकतेला देईन. का या देशात ..या हिंदुस्तानात हिंदुत्ववादी पक्षांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सत्ता मिळत नाही ? मुस्लीम समाज जसा त्यांचे लांगुलचालन करणाऱ्या तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांच्या मागे आपली ताकद एकजुटीने उभी करतो हे हिंदूंना का अशक्य आहे ? जिथल्या जनतेतील ८० % लोकांचा धर्म हिंदू आहे त्या देशात हिंदुत्वाचा मुद्दा अस्पृश्य व्हावा यापेक्षा हिंदूंसाठी लाजिरवाणी गोष्ट ती कोणती ?

आणि जर एखाद्या नरेंद्र मोदींसारख्या नेत्याने आपल्या पोलादी हिंदुत्वाची एखादी झलक जगाला दाखवली तर ते मोदी अनेकांच्या टीकेचे लक्ष होतात. अमेरिकेने व्हिसा नाकारण्यासारख्या भयंकर अपमानाला त्यांना सामोरे जावे लागते. मुस्लीम दंगली घडवून आणत असताना मुग गिळून गप्प बसणारे मिडीया आणि मानवाधिकारवाले मोदींवर मात्र तुटून पडतात. देशाच्या पंतप्रधानपदासाठी भडक प्रतिमा असणारा नेता म्हणून त्यांना स्वत:च्या पक्षातूनच विरोध होतो. अशा पार्श्वभूमीवर राजजी सारखा बाळासाहेबांच्या तालमीत वाढलेला, नसानसात हिंदुत्व खेळत असलेला नेता जर धर्मनिरपेक्ष भूमिका तीही दंगलींच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्च्यात घेत असेल तर दोष कोणाचा ? त्यांचा कि जनतेच्या गुळमुळीत आणि पर्यायाने धर्मद्रोही मानसिकतेचा ??   


                                            सुहास भुसे 
                                          (२२-८-२०१२ )  

2 comments:

  1. माझा हि भ्रमनिरास झाला , पण सत्तेवर येण्यासाठी त्यांना आत्ताच हिंदुत्त्वाचा मुद्दा पकडून चालणार नाही असे मला वाटते, सध्या हिंदू स्व्ठाच धर्मनिष्ठ नसताना त्यांनी हा मुद्दा पकडून राजकरण केले तर बहुदा अपयश पदरी पडण्याची शक्यता आहे, कारण हिंदुत्त्व्वाद्यंची मतं भाजपा, शिवसेना या पक्षांमध्ये विभागली आहेत, आणि पुन्हा या शर्यतीत मनसे उतरली तर मला वाटतंय हे झाड बहरण्यापूर्वीच कोमेजून जाऊ शकते .
    सर्वस्वी दोष हा धर्माचा अभिमान नसलेल्या आपल्याच लोकांचा

    ReplyDelete
  2. तुषार
    ..
    आज आपला देश अगदी रसातळाला गेला आहे
    यातून देशाला जर कोणी तारू शकत असेल तर तो आहे कट्टर हिंदुत्ववाद
    आता हिंदुत्ववाद म्हणजे काही नाझी वाद नाही कि आपण इतरधर्मियांना कापत सुटू
    मग याला अस्पृश्य का समजले जाते हि माझ्या अंतरीची वेदना आहे.

    ReplyDelete