About

Monday 11 January 2016

आ ह साळुंखे सरांच्या अमृतवर्षावात

आ ह साळुंखे सरांच्या सानिध्यात एक अविस्मरणीय दिवस घालवला ती आठवण शेयर करायची लांबली थोडी.
निमित्त होते इतिहास चिंतन शिबिराचे .

स्थळ होते.
जिजाऊ ज्ञान मंदिर प्रशाला, कोंडी.
सोलापूर जिल्ह्यातील आम्ही एक निवडक 50 60 लोक होतो.

सकाळच्या सत्रात मनमोकळया गप्पा झाल्या. आ ह सरांनी प्रत्येकाची विचारपूस करत सर्वांना बोलते केले. अनेकांनी आपले मौलिक अनुभव सांगितले.

जेवणानंतरच्या दुपारच्या सत्रात आ ह सरांनी सर्वांना मार्गदर्शन केले. एक विद्वान प्रचंड अभ्यासक व्यक्ती आपल्या चिरपरिचित ऋजु शैलीत बोलत असल्याने सगळेच कानात प्राण आणून ऐकत होते. आ ह सरांचे प्रदीर्घ भाषण सर्वांच्या मनावर कोरले गेले. सगळे इथे ऊध्रुक्त करणे शक्य नाही. पण काही निवडक वेचक मुद्दे ..स्फुट स्वरुपात ..आ हं च्या शब्दात.

" ** मराठा म्हणजे मोड़ेन पण वाकणार नाही. असा गर्व. कुणी शिकवले हे ? हे कुठून आले ?
छत्रपतींनी मोडेन पण वाकनार नाही निती वापरली नाही.
अस म्हणणे म्हणजे एक खच्चीकरण नितीच होय

** सामाजिक चळवळ 2 पद्धतीने पुढे न्यावी

1. ज्यांनी इतिहास चुकीचा लिहिला त्यांचे माप पदरात घालणे योग्यच...
पण 365 दिवस तेच करने योग्य नाही.
FTI , NSOD मध्ये किती मराठा किंवा बहुजन मुले आहेत? चित्रपट नाटके कला यात प्रवेश कसा करावा त्यात करियर कसे करावे याचे मार्ग याचे प्रबोधन हवे. ते जास्त गरजेचे आहे.

2 तपासल्याशिवाय काही घ्यायच नाही अस बुद्धांनी सांगितले आहे.
प्रबोधनाचा प्रवास डोक्यापासून ह्रदयाकडे नव्हे तर ह्रदयाकडून डोक्याकडे झाला पाहिजे

** बुद्धांनी ज्यासाठी हयात झिजवली  त्याच साठी आज ही भांडतोय आपण
समता स्वातंत्र्य. म्हणजे परिस्थिति जैसे थे आहे.

**व्यूह रचना करा.
जनसामान्यांच्या मनामध्ये जागा निर्माण करा.
समाजात 10 ℅शोषक 90 ℅ शोषित आहेत.
त्यातले 89 ℅ देवांवर श्रद्धा ठेवणारे आहेत.
जर तुम्ही कपाळावर मी ईश्वर मानत नाही अस लिहून प्रबोधन करायला गेलात तर त्यांच्या घराचेच नव्हे तर मनाचेे ही दरवाजे आपल्याला बंद होतात.

**चळवळी का फसतात ?
थेट हल्ला नको.
एखादा वर्षात 6 सत्यनारायण घालतो. तुमच्या प्रबोधनाने त्याने प्रमाण कमी केले व तो आता 2 सत्यनारायण घालतो. तर ते चळवळीचे यश माना. बदल एका रात्रीत होत नाहीत.

**बाहेरून लादलेल् गोंदण हे बाहेरच असल तरी खरवडुन काढताना यातना होतातच.
आपण व्यूह रचनेत कमी पडतो.

** मुकाट नसावे तसेच मोकाट ही नसावे.
** प्रश्न विचारनारांवर हल्ले करु नयेत. त्यांचे समाधान होईपर्यन्त शांतपणे उत्तरे द्यावित्.
** जिभेच्या खेळाने संस्कृती उभी राहत नाही.

सरांच्या विचारांच्या धबधब्यात सगळे श्रोते चिंब होत होते. मनातल्या अनेक शंकांची पुटे दूर होत होती. सर बोलत राहावेत आपण ऐकत राहावे असेच वाटत होते. पण वेळ मर्यादा होती.

शेवटी सरांनी सर्वांचा निरोप घेतला. बाहेरच्या पुस्तकांच्या स्टॉल वर सर्वांनी आ ह सरांची पुस्तके घेतली. मी ही जी माझ्याकडे नव्हती ती पुस्तके घेऊन कोटा पूर्ण केला. बळीवंश च्या प्रतिवर खुद्द आ ह सरांची स्वाक्षरी घेऊन ती प्रत आणखीच पावन केली.
..
आणि एका अविस्मरणीय दिवसाच्या आठवणी मनात घोळवत आम्ही सर्व आपापल्या मुक्कामी परतलो.




No comments:

Post a Comment