About

Wednesday 18 January 2017

पुतळ्याचे एकांगी कवित्व

गडकरी पुतळा प्रकरणावरचे शेवटचे पोस्ट...

-गडकरीच्या पुतळा प्रकरणाचे 15 दिवस कवित्व सुरु आहे. सगळ्या वाहिन्यांनी यावर पूर्ण एकांगी चर्चा आयोजित केल्या. संभाजी ब्रिगेडवर टोकाची टीका केली. पत्रकारीतेेचा अत्यंत खालचा स्तर गाठत पुतळा हटवाणाऱ्या मुलांना गुंड म्हणून संबोधले. आम्ही पुतळा पुन्हा बसवु अश्या राणा भीमदेवी थाटात गर्जना करून झाल्या.

पण गडकरी यांनी राजसंन्यास या नाटकात शंभु राजांची बदनामी केली आहे का ? केली असेल तर का केली ? गडकरीचा पुतळा मुद्दामहुन नेमका संभाजी उद्यानातच बसवण्याचे काय कारण होते ? या प्रश्नांच्या अनुषंगाने किमान एखादी तरी चर्चा आयोजित करावी अस एकाही चॅनेलला वाटले नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे. वस्तुस्थिती दाखवणे, न्यूज दाखवणे हे मिडियाचे काम नाही तर न्यूज बनवणे हेच मिडियाचे खरे काम आहे हे या निमित्ताने पुनश्च एकदा अधोरेखित झाले.

चिटनीस बखरीत शंभु राजांची विपर्यस्त प्रतिमा होती त्या आधारे गडकरी यांनी लेखन केले हा युक्तिवाद मान्य केला तरीही रंडीबाज, छकटा, दारूबाज अशी टोकाची विशेषणे गडकरी यांना का वापरावीशी वाटली असावीत ? तुळसा हे पात्र जी नात्याने शंभु राजांची चुलत बहिण लागत होती त्यांचे प्रेम कल्पुन बीभत्स श्रृंगार वर्णने गडकरीना का रंगवावीशी वाटली ? हे गलिच्छ लेखन वाचुन गडकरी हे शेक्सपियर नसून सेक्सपियर आहेत की काय ? असे प्रश्न एकाही विचारवंताला पडू नयेत ही खरोखर आश्चर्यकारक बाब आहे. मी पैज लावायला तयार आहे की यावर हिरीरीने चर्चा करत गडकरीची बाजू लावून धरणाऱ्या बहुसंख्य विचारवंतांनी / सांस्कृतिक गुंडानी राजसंन्यास हे नाटकच् मुळात वाचलेले नाही.

जाता जाता मराठीचे 'सेक्स'पियर गडकरी महोदयांच्या वैयक्तिक चरित्र, स्वभाव, जीवनाबद्दलही थोडीफार चर्चा करता आली असती. कारण या सर्व गोष्टिंचा प्रभाव लेखकाच्या लेखनावर पडत असतो. अंतरीचे धावे ..स्वभावे बाहेरी. आचार्य अत्रे यांनी गडकरी हे टोकाचे सनातनी होते असे लिहून ठेवले आहे. तसेच गडकरीनी एकच प्याला लिहिले हे अनेकांना ठाऊक असले तरी स्वतः गडकरी अट्टल दारूबाज मद्यपी होते हे अनेकांना ठाऊक नसेल. आदरणीय भाऊसाहेब खांडेकर जेव्हा आपल्या पाहिल्या वाहिल्या कवितांवर गडकरी यांची प्रतिक्रिया घ्यायला गेले तेव्हा गडकरी यानी दारूच्या नशेत धुत्त असल्यामुळे ती वही दिव्यावर धरुन जाळून टाकली. काय वाटले असेल नवलेखक खांडेकरांना त्यावेळी ? किती यातना झाल्या असतील त्यांना ? गडकरी चरित्रातले असे काही निवडक प्रसंग देखील या निमित्ताने लोकांपुढे आणून या एकंदर प्रकरणाचा समतोल राखता आला असता.

पण सांस्कृतिक क्षेत्रातील नामचीन गुंड विचारवंतांकडून आणि व्हाइट कॉलर गुन्हेगार चॅनेलवाल्यांकडून अश्या निस्पृह, निष्पक्ष पत्रकारितेची अपेक्षा करणे व्यर्थ आहे याची पुनश्च एकदा पक्की खात्री पटली.
©सुहास भुसे


2 comments:

  1. एकदम रोख ठोक , गडकरी तर शेक्सपिअर नव्ह तर सेक्सपिअर होते कारण अशाच माणसाला असं सुचु शकते.
    माध्यमे तर बौद्धिक वेश्यागिरीचे अड्डे बनत चालले आहेत.
    रा.ग.गडकरींचा पुतळा का तोडला, यामागची भावना काय होती याचा विचार करणे निषेदार्ह संताप व्यक्त करणार्यां गडकरी प्रेमींना महत्वाचे वाटले नाही.कारण शिवभक्तांनी केलेल्या कोणत्याही घटनेला ब्राह्मणद्वेषाचे लेबल लावून त्यातुम निसटणे हा आज लोकप्रिय फ़ंडा झालेला आहे.
    .संभाजी ब्रिगेड ने केलेली प्रत्येक गॊष्ट ब्राह्मणद्वेषाचा शिक्का मारून झाकुन ठेवायची ही हिंदुत्ववाद्यांची जुनी खोड आहे, म्हणुनच की काय जेम्स लेन प्रकरणावेळी संभाजी ब्रिगेडने जिजाऊ मातांच्या अपमानाचा तिव्र संताप आणि निषेद व्यक्त केल्यावर हिंदुत्ववाद्यांनी मात्र शांत राहाणंच पसंत केलं होतं.तोच स्थायी स्वभाव त्यावेळीही त्यांनी अबाधित ठेवला आहे.

    ReplyDelete