असीम त्रिवेदी.......साधारण ८-१० दिवसांपूर्वी
फारस कोणाला माहितही नसलेलं नाव. पण गेल्या काही दिवसांतील घटनाक्रमाने असीम या
देशातील युवकांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. सिस्टीम वर वैतागलेल्या युवा पिढीचा आयडॉल
बनला आहे. त्याची कार्टून्स, त्याची अटक आणि सुटका यावर विविध राजनीतिज्ञ आपली
मतमतांतरे मांडण्यात गर्क आहेत. मांडोत बापडे, पण माझ्यासारख्या सर्व सामान्य आणि
राजकारणाच्या गटाराला वैतागलेल्या युवकाला मात्र तो हिरो वाटत आहे.

या युवकात एक आग आहे. एक जोश आहे . तत्वासाठी झोकून देण्याची वृत्ती आहे. स्वत:च्या विचारांवर त्याची श्रद्धा आहे. त्यासाठी सर्वस्व पणाला लावायची त्याची तयारी आहे. आणि अशी ध्येयवेडी माणस अख्ख्या दुनियेला आपल्यापुढे झुकायला पाडतात हे त्याने परत एकदा सिद्ध केले आहे. फक्त २४ वर्षाच्या या युवकाच्या राजकीय जाणीवा मात्र अत्यंत प्रगल्भ आहेत. खूप दिवसांपासून तो व्यंगचित्रे काढत आहे. इंटरनेटच्या सेंसरशिप विरुद्धचे आंदोलन असो वा अण्णांचा लोकपाल विधेयकासाठीचा लढा असो प्रत्येक ठिकाणी या युवकाने झोकून देऊन काम केले आहे. गेल्या मार्च महिन्यात १ एप्रिलला ‘ फूल्स डे ’ म्हणून घोषित करून नेटीझन्स चे आवडते नेते कपिलबाबा सिब्बल यांना हा दिवस समर्पित करण्याची मोहीम असीम ने आपल्या मित्रमंडळींसोबत छेडली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तो फार मोठा पुरस्कर्ता असल्याचे त्याच्या या कारकिर्दीवरून वाचकांच्या लक्षात आलेच असेल.
आधीच मनमोहनजींच्या सरकारची स्थिती आभाळच फाटल आहे त्यात ठिगळ तरी कुठ कुठ लावणार अशी आहे. असीमच्या खटल्याने एकंदर सरकारची सर्वच आघाड्यांवर नाचक्की केली आहे. मुळात जे देशद्रोहाचे कलम असीम ला लावले होते त्याची थोडी माहिती पाहू
-----------------------------------------------------------------------------------------

काय आहे नेमका हा देशद्रोह कायदा ?
सैडीशन लॉ म्हणजे देशद्रोह कायदा हा एक उपनिवेषीय
कायदा आहे. हा कायदा ब्रिटिशांनी १२५ वर्षांपूर्वी बनवला होता. भारतीय संविधानाने
तो न बदलता जसाचा तसा स्वीकारला. भारतीय दंडसंहिता कलम १२४ अ नुसार जी देशद्रोहाची
व्याख्या दिली आहे ती अशी आहे . “ कोणताही व्यक्ती जो सरकारविरोधी लिखाण करतो
किंवा बोलतो किंवा अशा लिखाणाचे वा वक्तव्याचे समर्थन करतो त्याला आजीवन कारावास
किंवा तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते.” अर्थात हा कायदा ब्रिटीश घटनेने आता रद्द
केला आहे पण भारतीय संविधानात तो अजूनही आहे.
या कायद्याचा उपयोग ब्रिटीश काळात अनेक स्वातंत्र्य
योद्ध्याविरुद्ध केला गेला आहे. तर स्वातंत्रोत्तर काळात या कायद्याचा तडाखा
अरुंधती रॉय, विनायक सेन यांना बसला आहे. भारतीय संविधानाने नागरिकांना एकीकडे
अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे तर दुसरीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारा
हा विवाद्य कायदा आहे.
असे जुलमी कलम आपल्याला लावले, ते रद्द करावे
म्हणून असीम ने प्रथम जामीन घ्यायला नकार देऊन सरकारची चांगलीच गोची केली. त्याचा
हा निर्णय त्याच्या कार्याला एक वेगळीच झळाळी देऊन आणि त्याला चर्चेचा केंद्रबिंदू
बनवून गेला. तथापि नंतर न्यायव्यवस्था आणि गृहमंत्र्यांच्या आश्वासनाचा मान ठेवण्यासाठी
त्याने जामीन स्वीकारला. सरकारला एका अर्थाने त्याने गुडघे टेकायला भाग पाडले. काय
आहे या असीम जवळ ?? फक्त एक या भ्रष्ट सिस्टीमविरुद्ध काळजात भडकणारी आग आणि तत्वांवरची
अविचल निष्ठा. एवढ्याच भांडवलावर त्याने आज देशातील अनेक तरुणांना प्रेरणा
देण्याचे कार्य केले आहे.
असीम त्रिवेदीची कार्टून भलेही काहीजणांना
वादग्रस्त वाटतात. आम्हाला मात्र ती फक्त सामान्य माणसाचा प्रशासनावरचा संताप
व्यक्त करणारी, भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार याविषयी चीड व्यक्त करणारी प्रातीनिधीके
वाटतात. उसका तरीका गलत हो सकता है लेकिन इरादा नेक था ....असीम आगे बढो .....हम आपके साथ है .....!!
-----------------------------------------------------------------------------------------